अखंड भारताचा उदय होईल, भारत तोडण्याची भाषा करणारेच तुटतील : डॉ. मोहन भागवत

मुंबई : भारत तोडण्याचा विचार करणारे स्वतःच तुटतील; हा १९४७ चा भारत राहिलेला नाही. आगामी २०४७ मध्ये अखंड भारताच्या उदयाची कल्पना आपण सर्वांनी करायला हवी, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. संघाच्या स्थापनेच्या १०० वर्षांच्या निमित्ताने मुंबईत आयोजित ‘नवे क्षितिज’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात ते बोलत होते.


डॉ.भागवत यांनी समाज, राष्ट्रीय एकात्मता, आरक्षण, लोकसंख्या संतुलन, भ्रष्टाचार, तंत्रज्ञान, शेती आणि अर्थव्यवस्था या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. गुंडगिरी ही संपूर्ण समाजाची चूक नसून समाज सजग राहिल्यास विध्वंसक प्रवृत्ती आटोक्यात आणता येतात, असे त्यांनी सांगितले. हिंदू आणि शीख समाजातील नातेसंबंधांवर बोलताना त्यांनी दोन्ही समाजांमध्ये रक्तसंबंध तसेच रोटी-बेटीचे नाते असल्याचे नमूद केले. श्री गुरु ग्रंथसाहिबमध्ये संपूर्ण देशातील संतांची वाणी असल्याचे सांगत हिंदू-शीख वेगळे असल्याचा विचार चुकीचा असून आपण सर्व एकच आहोत, असे ते म्हणाले.


आरक्षणाबाबत बोलताना त्यांनी संविधानानुसार असलेल्या सर्व आरक्षणांना संघाचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. जातीय भेदभाव पूर्णपणे नष्ट व्हायला हवा, असे सांगत, ज्यांनी हजारो वर्षे विषमता सहन केली त्यांच्यासाठी काही काळ सहन करणे हा स्वस्त सौदा असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. आजची राजकीय व्यवस्था ही मतांसाठी चालते, अशी टीकाही त्यांनी केली.भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर केवळ कायदे आणि शिक्षांमुळे भ्रष्टाचार संपणार नाही; संस्कारांमुळेच तो नष्ट होईल, असे ते म्हणाले. लोकसंख्या संतुलनाबाबत विवाह हा संस्कार असून तो जबाबदारीने निभावला पाहिजे, असे सांगत जबरदस्तीचे धर्मांतर आणि घुसखोरी ही असंतुलनाची प्रमुख कारणे असल्याचे त्यांनी नमूद केले. स्वेच्छेने होणाऱ्या धर्मांतराला विरोध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.नवीन तंत्रज्ञान आणि एआयच्या युगात रोजगाराच्या संधी कमी होऊ नयेत, यासाठी योग्य धोरणांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. हाताने काम करणाऱ्यांचा सन्मान वाढवणे आणि अर्थव्यवस्थेचे विकेंद्रीकरण आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.


शेतीबाबत बोलताना सेंद्रिय शेतीमुळे खर्च कमी होतो, असे सांगत साठवणूक व प्रक्रिया सुविधांमुळे शेतकऱ्यांना योग्य दर मिळू शकतील, यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा, असे त्यांनी नमूद केले.या कार्यक्रमाला चित्रपटसृष्टीतील आणि प्रशासकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये अनन्या पांडे, करण जोहर, अभिनेता जॅकी श्रॉफ तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी मिलिंद म्हैस्कर आणि मनीषा म्हैस्कर यांचा समावेश होता.

Comments
Add Comment

Chamoli Tunnel Tragedy : उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात बोगदा दुर्घटना, ७ ठार आणि ३ अद्याप बेपत्ता

चमोली : उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत सात

Road Accident : नैनितालमध्ये टेम्पो ट्रॅव्हलर दरीत कोसळल्यामुळे २० पर्यटक जखमी

नैनिताल : चमोलीत जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यातील दुर्घटनेला २४ तास होण्याआधीच उत्तराखंडमध्ये आणखी एक मोठी

Samay Raina : समय रैनाला मोठा दिलासा; दिव्यांगांवरील असंवेदनशील टिप्पणीप्रकरणी सर्व एफआयआर सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द

नवी दिल्ली : विनोदी कलाकार समय रैना याला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. दिव्यांग व्यक्तींविषयी

Gadchiroli : गडचिरोली जिल्ह्यातील वसतिगृहात सहा मुलींना सर्पदंश, NHRC ने घेतली दखल

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील एका आश्रम शाळेच्या वसतिगृहात अनुसूचित जमातीच्या सहा

PM Vishwakarma Scheme : लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिन सोहळ्यासाठी पीएम विश्वकर्मा योजनेचे लाभार्थी ‘विशेष अतिथी’

नवी दिल्ली : केंद्र सरकारने लाल किल्ल्यावर १५ ऑगस्ट २०२६ रोजी होणाऱ्या ८०व्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला

Gallantry and Service Medal : देशातील पोलीस, अग्निशमन दल आणि नागरी संरक्षण आणि सुधारात्मक सेवांच्या १०५७ जणांना पदके जाहीर

नवी दिल्ली : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिन सोहळ्याचे औचित्य साधून देशातील पोलीस, अग्निशमन, गृहरक्षक, नागरी