ZP and Panchayat Samiti Elections 2026 : राज्यातील १२ जिल्हा परिषदांसह पंचायत समितीसाठी ७,४३८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात…

मुंबई : गेल्या काही काळापासून राज्यात सुरू असलेला निवडणुकांचा धडाका आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. लोकसभा, विधानसभा आणि त्यानंतर पार पडलेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकांनंतर, आता राज्याच्या ग्रामीण राजकारणाची दिशा ठरणार आहे. राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली आहे. या महत्त्वाच्या टप्प्यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, मतदानाची प्रक्रिया पारदर्शक आणि शांततेत पार पडण्यासाठी निवडणूक आयोगाकडून चोख नियोजन करण्यात आले आहे. शहरी भागातील निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर आता गावखेड्यांच्या विकासाची चावी कोणाकडे जाणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या निवडणुकीसाठी आज सकाळपासूनच मतदान केंद्रांवर प्रशासनाचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, मतदारांच्या प्रतिसादाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे निर्माण झालेल्या राजकीय शोककळेनंतर, राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी अखेर आज प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली आहे. ५ फेब्रुवारी रोजी होणारे हे मतदान लांबणीवर पडल्यानंतर आज, शनिवारी सकाळी ७:३० वाजल्यापासून मतदारांनी केंद्रावर गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या ७३१ आणि पंचायत समित्यांच्या १,४६२ जागांसाठी एकूण ७,४३८ उमेदवार नशीब अजमावत आहेत. विशेष म्हणजे, जिल्हा परिषदेच्या एकूण जागांपैकी ३६९ जागा महिलांसाठी राखीव असून महिला शक्तीची मोठी कसोटी या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. रायगड, पुणे, कोल्हापूर, लातूर आणि छत्रपती संभाजीनगरसह १२ प्रमुख जिल्ह्यांमध्ये आज सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत मतदान चालणार आहे. प्रशासनाने मतदानासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला असून २ कोटी ८ लाखाहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. आरक्षणाच्या गणितात अनुसूचित जातींसाठी ८३, जमातींसाठी २५ तर मागासवर्ग प्रवर्गासाठी १९१ जागांचे नियोजन करण्यात आले आहे. आजच्या या चुरशीच्या लढतीचा निकाल ९ फेब्रुवारीला सकाळी १० वाजल्यापासून स्पष्ट व्हायला सुरुवात होईल

Comments
Add Comment

कॅनडाला महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी अनेक संधी - मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : जगात पर्यावरणाचे संवर्धन आणि हवामान बदलाच्या संकटाला सामोरे जात प्रगती साधण्याचे आव्हान उभे आहे.

Israel - Iran War : आखाती देशांतील महाराष्ट्रातील नागरिकांसाठी राज्य शासनाच्या अत्यावश्यक सूचना

इराण–इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मध्य-पूर्व व आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीचा

Thane: अभिनेत्री ज्युनियर कलाकारांना आमिष दाखवून करत होती फसवणूक; सेक्स रॅकेट प्रकरणात अटकेत

ठाणे: ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

Trimbakeshwar Temple Video: त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकाला मारहाण, भाविकांमध्ये संतापाचे वातावरण

नाशिक: होळी, धुलिवंदनाच सण, सलग सुट्ट्यांमुळे नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंग मंदिरात भाविकांची

सचिन तेंडुलकरसोबत क्रिकेटविश्वात पदार्पण, पुढे बॉलिवूड स्टार बनला; कोण आहे हा अभिनेता?

मुंबई: कपिल देव, इरफान पठाण, सुनील गावस्कर, हरभजन सिंग आणि शिखर धवन यांच्यासह अनेक क्रिकेट स्टार्सनी बॉलिवूड

POSH Audit : महाराष्ट्रातील सर्व शासकीय आणि खाजगी कार्यालयांमध्ये ३० दिवसांत 'पॉश ऑडिट करा नाहीतर...; महिला आयोगाचे आदेश

मुंबई: नोकरदार महिलांच्या सुरक्षिततेसाठी असणाऱ्या कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ प्रतिबंध कायदा म्हणजेच पॉश ॲक्टची