Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा पाय आणखीच खोलात; ईडीकडून मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल

मुंबई : अशोक खरात प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत असून, स्वतःला आध्यात्मिक गुरु म्हणवणाऱ्या खरातच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप असलेल्या खरातविरोधात (Ashok Kharat) आधीच १३ गुन्हे दाखल आहेत. आता या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) देखील प्रवेश केला असून, खरातविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


खरातवर (Ashok Kharat) केवळ लैंगिक अत्याचाराचेच नव्हे, तर फसवणुकीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची संपत्ती उभी केल्याचे आरोपही आहेत. नाशिक पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ईडीने आर्थिक गैरव्यवहाराचा सखोल तपास सुरू केला आहे. पोलिसांनी जमा केलेली महत्त्वाची कागदपत्रे ईडीच्या ताब्यात देण्यात आली असून, खरातचे आर्थिक साम्राज्य नेमके कसे उभे राहिले, याचा तपास सुरू आहे.


दरम्यान, या प्रकरणात खरातची (Ashok Kharat) पत्नी कल्पना खरात हिचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) सक्रिय झाले आहे. तिच्या अटकेसाठी नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर या तीन जिल्ह्यांत स्वतंत्र पथके पाठवण्यात आली आहेत.


शिर्डी पोलीस ठाण्यात जमीन व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी कल्पना खरातविरोधात (Ashok Kharat) गुन्हा दाखल आहे. सध्या अशोक खरातची चौकशी सुरू असली तरी त्याची पत्नी फरार आहे. तसेच त्यांचा मुलगा हर्षवर्धन याचाही संपर्क होत नसल्याचे समोर आले आहे.


तपास यंत्रणा या प्रकरणाचा गोपनीय पद्धतीने तपास करत असून, येत्या काळात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



भोंदू अशोक खरात प्रकरणी बड्या महिला अधिकाऱ्याचे 'पोस्टिंग कनेक्शन' उघड?


अशोक खरात या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाच्या (SIT) हाती मोठी माहिती लागली असून, एक वरिष्ठ महिला अधिकारी आता थेट तपास यंत्रणेच्या रडारवर आली आहे. नाशिकमध्ये कार्यरत असताना या महिला अधिकाऱ्याने खरातला प्रशासकीय मदत केल्याचा खळबळजनक आरोप होत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या तत्कालीन महिला अधिकाऱ्याने आणि अशोक खरातने एकमेकांना 'कथीत' सहकार्य केल्याचे समोर येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या महिला अधिकाऱ्याने प्रशासकीय पातळीवर खरातचे काम सुलभ केले आणि त्या बदल्यात अशोक खरातने आपले राजकीय व प्रशासकीय नेटवर्क वापरून या महिला अधिकाऱ्याला त्यांच्या पसंतीच्या ठिकाणी पोस्टिंग मिळवून दिल्याची चर्चा सध्या नाशिकच्या वर्तुळात रंगली आहे. केवळ बदली आणि पोस्टिंगच नाही, तर या महिला अधिकारी आणि अशोक खरात यांच्यात मोठे आर्थिक व्यवहार झाले आहेत का? या दिशेनेही एसआयटीने आपला तपास चक्राकार फिरवला आहे. जर या व्यवहारांचे पुरावे सापडले, तर संबंधित महिला अधिकाऱ्याच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Pune-Mumbai Highway : काळोखात भरधाव कारचा भीषण अपघात; ओढ्यात कोसळून दोन तरुणांचा मृत्यू

लोणावळा : जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी, २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला.

Pune News : 'MH 12' ची जागा आता 'MH 61' ने घेतली; व्हीआयपी नंबरसाठी पुणेकरांची तुफान गर्दी  

पुणे: पुणेकरांच्या अस्मितेचा आणि जिव्हाळ्याचा विषय असलेली 'MH 12' वाहन नोंदणी मालिका संपल्यानंतर पुणे प्रादेशिक

Shilpa Gavare death case : शिल्पा गवारे मृत्यू प्रकरणाचा मुळापर्यंत तपास करा; डॉ. नीलम गोऱ्हेंची मागणी

पिंपरी-चिंचवड :  वाकडमधील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरणाचा मुळापर्यंत जाऊन निष्पक्ष तपास करावा, अशी मागणी विधान

Raksha Bandhan 2026 : रक्षाबंधनाला ग्रहणाचा सावट नाही, पण सकाळचा मुहूर्त चुकला ? जाणून घ्या दुपारी राखी कधी बांधायची!

आज २८ ऑगस्ट रोजी देशभरात भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा आणि पवित्र नात्याचा 'रक्षाबंधन' हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला

Maharashtra Weather Update: हवामानात मोठा बदल! उकाडा वाढला, पाऊस गायब; आज तुमच्या भागात सरी कोसळणार की नाही?

मुंबई :  महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने उघडीप घेतल्याचे चित्र आहे. राज्यातील बहुतांश भागात सध्या हलका ते मध्यम

Pro Govinda Season 4 : प्रो गोविंदा सीझन ४ चा थरार रंगला; विजेत्यांवर बक्षिसांची लयलूट, दहीहंडी ऑलिम्पिकपर्यंत नेण्याचा निर्धार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव यांच्या हस्ते