मुंबई : महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांसाठी मतदान सुरू आहे. मतदानाला सकाळी साडेसात वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान चालणार आहे. मतदानासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात आहे. यावेळी २ कोटी ८ लाखाहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निकाल सोमवार ९ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजल्यापासून जाहीर होणार आहे. मतमोजणी सकाळी दहा वाजल्यापासून सुरू होणार आहे.
जिल्हा परिषदेच्या ७३१ आणि पंचायत समित्यांच्या १,४६२ जागांसाठी मतदान होत आहे. रिंगणात असलेल्या एकूण ७,४३८ उमेदवारांचे भवितव्य राज्यातील तब्बल २ कोटी ८ लाख २० हजार ७०२ मतदार ठरवणार आहेत. ग्रामीण विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या निवडणुकीत मतदारांचा कल कोणाकडे असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, 'सर्व मतदारांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता निर्भयपणे आपल्या मतदानाचा हक्क बजावावा,' असे आवाहन राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केले आहे.
Live Update

- जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांसाठी राज्यात दुपारी साडेतीन पर्यंत ५२.०२ टक्के मतदान
- सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुपारी दीड पर्यंत ४०.१३ टक्के मतदान
- राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी दुपारी १.३० पर्यंत ३७.९४ टक्के मतदान
- भास्कर जाधवांनी सहकुटंब केले मतदान
- चिपळूणमध्ये एक तर गुहागरमध्ये दोन EVM बंद
- आमदार विलास भुमरे यांनी मुलाला सोबत घेऊन बजावला मतदानाचा हक्क
- माजी मंत्री हर्षवर्धन पाटील कुटुंबासह बावडा येथे बजावला मतदानाचा हक्क
- केवळ दोन फूट उंची असलेल्या निकीता गडिया या मुलीने मतदानाचा हक्क बजावला
- चिपळूण सावर्डे पंचायत समिती गण १४ मतदान केंद्रामधील मतदान केंद्रावर मशीनमध्ये बिघाड. सुमारे दोन तास मशीन बंद.
- अकलूजच्या मतदान केंद्रावर लहान मुलाला EVMचं बटण दाबायला लावलं, धैर्यशील मोहित पाटलांच्या चुलत भावाचा प्रताप
- राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी सकाळी ११.३० पर्यंत २२.२६ टक्के मतदान
- राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांसाठी सकाळी ९.३० पर्यंत ७.८० टक्के मतदान
- छत्रपती संभाजीनगर येथील बिडकीन मतदान केंद्रावर पोलीस आणि उमेदवार प्रतिनिधी यांच्यात शाब्दिक चकमक
- रयत क्रांती शेतकरी संघटनेचे आ. सदाभाऊ खोत यांनी मरळनाथपूरमध्ये केलं मतदान
- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोडमधील नायगाव येथील मतदान केंद्रावर भाजप उमेदवाराला धक्काबुक्की
- निवडणुकीत समाधानकारक कामगिरी करू : जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार
- अकलूज : अर्जुनसिंह मोहिते पाटील मतदानावेळी सोबत मुलाला रुद्रराज मोहिते पाटीलला घेऊन आले. मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यानं घेतला आक्षेप. थोडा वेळ तणावाचे वातावरण. वरिष्ठांनी चर्चेतून तोंडगा काढला.
- भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पडळकरवाडीमध्ये केले मतदान
- छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद, पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा फडकणार; संदिपान भुमरे यांना विश्वास
- सोलापुरात मोहिते पाटील कुटुंबियांनी केले मतदान
- आमदार रोहित पवारांनी केले मतदान
- राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क

- दौंडचे भाजप आमदार राहुल कुलनी बजावला मतदानाचा हक्क
- इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी येथील मतदान केंद्रावरती मतदारांच्या रांगा
- शिवसेनेचे खासदार संदिपान भुमरे पाचोड मतदान केंद्रावर, पाचोड जिल्हा परिषद गटातून खासदार भुमरे यांचे पुतणे शिवराज भुमरे आहेत उमेदवार
- करमाळा तालुक्यातील पाथुर्डी येथील २२४ मतदान केंद्रावर EVM बंद
- सोलापूर जिल्ह्यातील कोंडी जिल्हा परिषद गटात उमेदवाराकडून मतदान केंद्राची पूजा
- काही भागात सकाळीच EVM बंद पडल्याने मतदानात व्यत्यय
- कराडमधील चचेगावमध्ये बूथ क्रमांक ७८ चे EVM बंद
- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी बजावला मतदानाचा हक्क : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी सकाळी काटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत जाऊन मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी राज्यातील सर्व नागरिकांना आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी लोकशाहीच्या या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेत मतदान करण्याचे आवाहन केले.

- सकाळी साडेसात वाजल्यापासून महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांसाठी मतदान सुरू