डोंगरी, मांडवी,मोहम्मद अली रोड परिसरात महापालिकेच्या या अधिकाऱ्याची घुसून कारवाई... महापालिकेच्या नवख्या सहाय्यक आयुक्ताने मुंबईकरांची तोंडे केली गप .

मुंबई : मुंबई महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार मुंबईतील काही विभागांमध्ये महापालिकेच्या वतीने अनधिकृत फेरीवाले आणि पदपथांवर करण्यात आलेल्या वाढीव बांधकामांवर कारवाई होत आहे. मात्र ही कारवाई होत असतानाच संपूर्ण मुंबईचे लक्ष ज्या कारवाईने वेधून घेतले आहे,ते आहे डोंगरी, मोहम्मद अली रोड येथील कारवाईने. या भागातील फेरीवाले आणि त्यांच्या अतिक्रमणावर कारवाई करण्याची हिंमत होत नव्हती. पण नवख्या सहाय्यक आयुक्त असलेल्या योगेश देसाई यांनी मुस्लिम बहुल विभागात ही धडक कारवाई करत महापालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त (शहर) यांचा विश्वास सार्थ ठरवला आहे. महापालिकेच्या या कारवाईंमुळे डोंगरी, पायधुनीत जाऊन कारवाई करून दाखवा असे आव्हान देण्याची हिंमत जनतेची होणार नाही.


महापालिकेच्या बी विभागाच्या वतीने सलग चार दिवस कारवाई सुरू असून या कारवाईमध्ये फेरीवाल्यांसह त्यांची वाढीव बांधकामे ही जमीनदोस्त करण्यात आलेली आहे. महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्त यांचं पाठबळ असल्यास सहाय्यक आयुक्त काय करू शकतो हे नवख्या असलेल्या बी विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश देसाई यांनी करून दाखवले आहे. योगेश देसाई यांच्यासारख्या नवख्या सहाय्यक आयुक्तांना बी विभागाची दिल्याने प्रशासनावर तीव्र टीका झाली होती. या विभागात अनुभवी किंवा विभागाच्या कार्यकारी अभियंता यांची प्रभारी नियुक्ती करून जबाबदारी सोपवण्यात यावी असे म्हटले जात होते. पण नवख्या असलेल्या योगेश देसाई यांनी सहाय्यक आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अत्यंत संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या बी विभागातील अनधिकृत बांधकामांची बजबजपुरी माजलेल्या या भागात ही कारवाई करून आपण एक सक्षम सहाय्यक आयुक्त आहोत हे दाखवून दिले आहे.


योगेश देसाई यांच्या चमूने २९ जानेवारीपासून हाती घेतलेल्या या कारवाईत ५ फेब्रुवारी पर्यंत सरदार वल्लभ भाई पटेल रोड. इब्राहिम मोहम्मद अली रोड,युसूफ मेहरली रोड,लोकमान्य टिळक रस्ता आधी ठिकाणी कारवाई करत २५ अनधिकृत स्टॉल, ४० वाढीव बांधकामे,१० बोलार्ड ग्रील तसेच ३५ फेरीवाल्यांवर कारवाई करतानाचा या भागात सखोल स्वच्छता मोहीम राबवून रस्ते आणि पदपथ साफ केले. या विभागात यापूर्वी महापालिकेचे तत्कालीन सहायक आयुक्त उदयकुमार शिरूरकर यांनी अशाप्रकारे धडक कारवाईचा धडाका लावला होता. शिरूरकर हे महापालिकेचे अधिकारी होते आणि परीक्षा देत सहाय्यक आयुक्त बनले होते. त्यामुळे त्यांना महापालिकेच्या कामकाजाचा आणि कार्यपद्धती तसेच भौगोलिक परिस्थितीची कल्पना होती. पण योगेश देसाई यांच्यासारख्या नवख्या अधिकाऱ्याने या संवेदनशील विभागात सातत्यपूर्ण कारवाई करून आपण काही कमी नसल्याचे दाखवून दिले आहे.


कुर्ल्यातील घटनेनंतर मुंबईत फेरीवाले आणि त्यांच्या वाढीव बांधकामांवरोधात सुरू झालेल्या या कारवाईत बी विभागातील ही कारवाई जनतेचा महापालिकेवरील विश्वास वाढवताना दिसत आहे.



मागील पाच ते सहा दिवसातील कारवाई

ठिकाण:
इब्राहिम मोहम्मद अली रोड(नारायण धुरू स्ट्रीट मांडवी)
सरदार वल्लभ भाई पटेल रोड()
इब्राहिम मोहम्मद मर्चंड रोड, मांडवी
संत तुकाराम रोड,
युसूफ मेहरली रोड,
लोकमान्य टिळक रस्ता


कारवाई:
स्टॉल्स :२५
वाढीव बांधकामे :४०
बोलार्ड ग्रील :१०
बेकायदेशीर फेरीवाले: ३५

Comments
Add Comment

Reservation : अनुसूचित जाती उपवर्गीकरणाबाबत निवेदन देण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ

मुंबई : राज्यातील अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या अनुषंगाने निवेदन किंवा अर्ज सादर करण्यासाठी

Nitesh Rane : मत्स्य शेतकऱ्यांच्या उत्पादनांसाठी राज्यात 'क्लस्टर', मूल्यवर्धनासाठी कारखाना उभारण्यावरही चर्चा

मुंबई : राज्यातील मत्स्यव्यवसायाला आधुनिक उद्योगाची जोड देण्यासाठी मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे

Asha Bhosle : ज्येष्ठ गायिका आशा भोसले अनंतात विलीन, मान्यवर आणि चाहत्यांनी घेतले अखेरचे दर्शन

मुंबई : ज्येष्ठ पार्श्वगायिका, पद्मविभूषण तसेच महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित आशा भोसले यांचे १२ एप्रिल

Asha Bhosle : आज स्वर शांत झाले, स्वर समाधी; सूर सम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन

मुंबई : अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि आशा ताईंना शनिवारी तात्काळ मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात

Maharashtra's Energy Capacity : महाराष्ट्राची ऊर्जा क्षमता वाढणार

 पहिल्या कोळसा रेल्वे रॅकचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले स्वागत मुंबई : राज्याच्या ऊर्जा

Minister Pankaja Munde : मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेत शेतकरी गट व वराह पालनाचा समावेश - पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

मुंबई : राज्यात पशुधनावर आधारित उद्योजकता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना घोषित