वांद्रे–वरळी सी लिंक आणि कोस्टल रोडवर हेलिपॅड उभारा

मंत्री आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी


मुंबई : पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावर दोन दिवसांपूर्वी गॅस टँकर उलटून गंभीर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली होती. या घटनेमुळे तब्बल ३६ तासांहून अधिक काळ प्रवासी अडकून पडले होते. या पार्श्वभूमीवर भविष्यातील संभाव्य धोके लक्षात घेता वांद्रे–वरळी सी लिंक, वर्सोवा–वांद्रे–वरळी सी लिंक तसेच संपूर्ण कोस्टल रोडवरील आपत्कालीन व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे याठिकाणी हेलिपॅड उभारावे, अशी मागणी मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.


या महत्त्वाच्या वाहतूक मार्गांवर अपघात, आग किंवा नैसर्गिक आपत्ती घडल्यास तातडीने आणि प्रभावी प्रतिसाद देणे मोठे आव्हान ठरू शकते. विशेषतः कोस्टल रोड हा काही ठिकाणी भुयारी तर काही ठिकाणी समुद्रावरून जाणारा मार्ग असल्याने जखमींना त्वरित रुग्णालयात हलवणे, सुरक्षा यंत्रणांची जलद हालचाल सुनिश्चित करणे तसेच आपत्कालीन सेवा वेळेत पोहोचवणे कठीण होऊ शकते, अशी चिंता शेलार यांनी व्यक्त केली आहे.


या पार्श्वभूमीवर वांद्रे रेक्लेमेशन परिसरात, सी लिंकजवळ हेलिपॅड उभारण्याची तातडीची गरज असल्याची मागणी शेलार यांनी केली आहे. या हेलिपॅडसाठी आवश्यक जागा उपलब्ध असून यासंदर्भात तातडीने निर्णय घेऊन संबंधित यंत्रणांना आवश्यक कार्यवाहीचे निर्देश द्यावेत, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

हेलिपॅडची गरज का?


हेलिपॅड उभारण्यात आल्यास कोस्टल रोड व सी लिंकवरील आपत्कालीन परिस्थितीत जखमींना एअर अँब्युलन्सद्वारे तातडीने हलवणे शक्य होईल. तसेच लीलावती रुग्णालयासह परिसरातील अन्य प्रमुख रुग्णालयांपर्यंत जलद वैद्यकीय सेवा पोहोचवता येईल. यामुळे आपत्ती व्यवस्थापन, पोलीस, अग्निशमन दल, एनडीआरएफ तसेच अन्य यंत्रणांमधील समन्वय अधिक प्रभावी होऊन मुंबईसारख्या दाट लोकसंख्येच्या आर्थिक राजधानीसाठी दीर्घकालीन आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा अधिक मजबूत होईल, असेही आशिष शेलार यांनी नमूद केले आहे.

Comments
Add Comment

Reservation : अनुसूचित जाती उपवर्गीकरणाबाबत निवेदन देण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ

मुंबई : राज्यातील अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या अनुषंगाने निवेदन किंवा अर्ज सादर करण्यासाठी

Nitesh Rane : मत्स्य शेतकऱ्यांच्या उत्पादनांसाठी राज्यात 'क्लस्टर', मूल्यवर्धनासाठी कारखाना उभारण्यावरही चर्चा

मुंबई : राज्यातील मत्स्यव्यवसायाला आधुनिक उद्योगाची जोड देण्यासाठी मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे

Asha Bhosle : ज्येष्ठ गायिका आशा भोसले अनंतात विलीन, मान्यवर आणि चाहत्यांनी घेतले अखेरचे दर्शन

मुंबई : ज्येष्ठ पार्श्वगायिका, पद्मविभूषण तसेच महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित आशा भोसले यांचे १२ एप्रिल

Asha Bhosle : आज स्वर शांत झाले, स्वर समाधी; सूर सम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन

मुंबई : अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि आशा ताईंना शनिवारी तात्काळ मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात

Maharashtra's Energy Capacity : महाराष्ट्राची ऊर्जा क्षमता वाढणार

 पहिल्या कोळसा रेल्वे रॅकचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले स्वागत मुंबई : राज्याच्या ऊर्जा

Minister Pankaja Munde : मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेत शेतकरी गट व वराह पालनाचा समावेश - पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

मुंबई : राज्यात पशुधनावर आधारित उद्योजकता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना घोषित