उपायुक्त आणि सहायक आयुक्तांच्या बदल्या आणि बढती

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेतील सहायक आयुक्त विनायक विसपुते यांना उपायुक्त पदी बढती देण्यात आल्यानंतर त्यांच्याकडील जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्तपद कायम ठेवून मध्यवर्ती खरेदी खाते विभागाच्या उपायुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. विसपुते यांच्याकडील सहायक आयुक्त अतिक्रमण निर्मुलन विभागचा अतिरिक्त कार्यभाराचा पदभार कायम ठेवण्यात आला आहे.


विसपुते यांच्यावर उपायुक्त (मखखा) पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवतानाच या पदाचा कार्यभार सांभाळणाऱ्या संध्या नांदेडकर यांच्यावर परिमंडळ ७चे उपायुक्त पद कायम करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या खांद्यावरील मध्यवर्ती खरेदी खात्याच्या पदभाराची जबाबदारी हलकी करून परिमंडळ सातची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच रुग्णालयांच्या सहायक आयुक्त पदाचा भार सांभाळणाऱ्या महेश पाटील यांच्यावर आता नव्याने स्थापन झालेल्या के उत्तर विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.


उपायुक्त आणि सहायक आयुक्तांवर आता नवी जबाबदारी




  1. संध्या नांदेडकर : उपायुक्त परिमंडळ ७

  2. विनायक विसपुते : सहायक आयुक्त जी उत्तर विभाग(अतिरिक्त कार्यभा उपायुक्त मध्यवर्ती खरेदी खाते)

  3. महेश पाटील : सहायक आयुक्त के उत्तर विभाग (नवनिर्मित विभाग)

Comments

रत्नाकर वडनेरे    February 11, 2026 12:28 AM

मा. विनायक विसपुते यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन

Add Comment

Blue Flag Beach : श्रीवर्धन समुद्रकिनारा ‘ब्लू फ्लॅग बीच’ म्हणून विकसित होणार

मुंबई : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्याचा शाश्वत विकास साधत त्याला ‘ब्लू फ्लॅग बीच’ म्हणून विकसित

Maharashtra : गोदा ते नर्मदा या पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा २०२६ उपक्रमाचा शुभारंभ त्र्यंबकेश्वर आणि चोंडी येथून होणार

मुंबई : "गोदा ते नर्मदा" या पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा २०२६ चा शुभारंभ त्र्यंबकेश्वर आणि चोंडी येथून

Maharashtra : उदंचन जलविद्युत प्रकल्पाद्वारे ऊर्जा निर्मितीत महाराष्ट्र अग्रेसर ठरणार

मुंबई : राज्यातील वीज निर्मितीची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढविण्यात येणार येत उदंचन जलविद्युत प्रकल्पातून एक

Heat Wave : उष्णता लाटेच्या आपत्तीला सामोरे जाण्यासाठी राज्य शासन सज्ज

मुंबई  : वातावरणीय बदलांमुळे राज्यात हवामानात मोठे आणि अनियमित बदल दिसून येत आहेत. मे महिन्यात पाऊस, एप्रिलमध्ये

Reservation : अनुसूचित जाती उपवर्गीकरणाबाबत निवेदन देण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ

मुंबई : राज्यातील अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या अनुषंगाने निवेदन किंवा अर्ज सादर करण्यासाठी

Nitesh Rane : मत्स्य शेतकऱ्यांच्या उत्पादनांसाठी राज्यात 'क्लस्टर', मूल्यवर्धनासाठी कारखाना उभारण्यावरही चर्चा

मुंबई : राज्यातील मत्स्यव्यवसायाला आधुनिक उद्योगाची जोड देण्यासाठी मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे