BMC Mayor Election 2026: मुंबईच्या उपमहापौर पदासाठी शिंदे गटाकडून 'या' दोन महिलांच्या नावाची चर्चा

मुंबई: मुंबई महापालिकेच्या महापौरपदाबाबतची उत्सुकात शिगेला पोहोचली आहे. त्यामुळे आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेना गटाकडून उपमहापौर पदासाठी दोन महिला नगरसेविकांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार; शिंदे गटाकडून उपमहापौरपदासाठी तृष्णा विश्वासराव आणि यामिनी जाधव यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. २०१४ ला तृष्णा विश्वासराव या सभागृह नेत्या होत्या, तर त्याचवेळी महापौरपद हे अनुसूचित जाती जमातीसाठी आरक्षित असताना महापौर पदासाठी यामिनी जाधव यांचेही नाव चर्चेत होते. आता उपमहापौरपदी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणाची नेमणूक करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.



शनिवार ७ फेब्रुवारी रोजी महापौरपदासाठी अर्ज स्विकारले जाणार:


शनिवार ७ फेब्रुवारी रोजी महापौरपदासाठी अर्ज स्विकारले जाणार आहेत. तर बुधवार ११ फेब्रुवारीला मुंबई महापालिकेच्या महापौरपदाची घोषणा करण्यात येणार आहे. त्याच दिवशी म्हणजेच ११ फेब्रुवारी रोजीच दुपारी १२ वाजता विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं असून महापौरपादासाठी अर्ज मागे घेण्याची वेळ सभागृह भरण्याच्या १५ मिनिटं आधी असणार आहे.



८९ नगरसेवकांची स्वतंत्र गटनोंदणी :


सोमवार २ फेब्रुवारी रोजी कोकण भवनात भाजपच्या एकूण ८९ नगरसेवकांची स्वतंत्र गटनोंदणी झाली. तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची एकत्र गटनोंदणी झाली. त्यामुळे महायुतीच्या नगरसेवकांची एकूण संख्या १२१ वर पोहोचली आहे.

Comments
Add Comment

PM Kisan Yojana 23rd Instalment: पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता 'या' महिन्यात मिळण्याची शक्यता

मुंबई: भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे लाखो लोक शेती करतात. त्यांच्यापैकी अनेकांना शेतीतून फारसे उत्पन्न

होर्मुज सामुद्रधुनी पुन्हा खुली करा, भारताची मागणी

ब्रिटनने बोलावलेल्या 60 देशांच्या बैठकीत मांडले मत नवी दिल्ली : पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाच्या

पूर्व काँगोमध्ये आयएसआयएसशी संबंधित बंडखोरांनी केला मोठा हल्ला; ४३ जण ठार

नवी दिल्ली: इस्लामिक स्टेट (IS) या दहशतवादी गटाशी संलग्न असलेल्या बंडखोरांनी पूर्व काँगोमध्ये एक मोठा हल्ला केला

मुंबई-गोवा महामार्गावर बस उलटून भीषण अपघात; ३८ प्रवासी जखमी दोघांचा मृत्यू

नागोठणे : शुक्रवारी ( ३ एप्रिल ) मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका खासगी बसचा मुंबई गोवा महामार्गावर अपघात झाला.

अमेरिका- इस्रायलचा तेहरानच्या सर्वात उंच पुलावर बॉम्ब हल्ला; आठ जणांचा मृत्यू, ९५ जखमी

तेहरान : पश्चिम आशियामध्ये इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धाला एक महिन्याहून अधिक काळ

Pakistan: पाकिस्तानात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या किती रुपयांची वाढ?

नवी दिल्ली: पाकिस्तानने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. पेट्रोलच्या दरात ४३ टक्क्यांनी वाढ करण्यात आली