अमेरिका- इस्रायलचा तेहरानच्या सर्वात उंच पुलावर बॉम्ब हल्ला; आठ जणांचा मृत्यू, ९५ जखमी

तेहरान : पश्चिम आशियामध्ये इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धाला एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. शांतता चर्चांसाठी प्रयत्न सुरू असतानाही दोन्ही बाजूंनी हल्ले कायम आहेत. दरम्यान, गुरुवारी अमेरिका आणि इस्रायलने इराणमधील सर्वात उंच पुल मानल्या जाणाऱ्या बी-१ ब्रिजवर हवाई हल्ला केला. या हल्ल्यात किमान आठ नागरिकांचा मृत्यू झाला असून ९५ जण जखमी झाले आहेत.


इराणी माध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, लष्करी कारवाईचे मुख्य लक्ष्य करज शहरातील बी-१ ब्रिज होते. या हल्ल्यामुळे आसपासच्या भागात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये इराणी प्रवासी तसेच स्थानिक गावकरी यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. हल्ल्यावेळी हे लोक पुलाजवळ उपस्थित होते.वृत्तानुसार, मृतांमध्ये निसर्ग दिन निमित्त त्या परिसरात गेलेली काही कुटुंबेही होती. या दिवशी मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडले होते.


हल्ल्याच्या एक दिवस आधीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला इशारा देत म्हटले होते की, तेहरानने लवकर करार केला नाही तर त्याच्यावर भीषण हल्ले करण्यात येतील. या हल्ल्यांमध्ये ऊर्जा केंद्रे आणि पाणी प्रकल्प लक्ष्य केले जातील, असेही त्यांनी सांगितले होते. बी-१ ब्रिजवरील हल्ला हा त्याच धोरणाचा भाग मानला जात आहे.या पुलावर हल्ला झाल्यामुळे तेहरानचा शेजारील करज शहराशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटला आहे. अमेरिका इराणला कोणत्याही वेळी त्याच्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवर हल्ला करू शकते, हा संदेश देण्याचा प्रयत्न करत असल्याचे मानले जात आहे.


दरम्यान या हल्ल्यानंतर इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियन यांनी अमेरिका आणि इस्रायलविरुद्ध इराण आपल्या संपूर्ण क्षमतेने बचाव करेल, अशी शपथ घेतल्याचे सांगितले. तेहरानने या संघर्षाला विनाकारण आक्रमकतेचे युद्ध म्हटल्यापासून एक महिन्याहून अधिक काळ झाला असताना त्यांचे हे वक्तव्य समोर आले आहे.गुरुवारी अझरबैजानचे राष्ट्राध्यक्ष इल्हाम अलीयेव यांच्याशी दूरध्वनीवर झालेल्या चर्चेदरम्यान पेजेशकियन यांनी या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्यांनी सांगितले की, वॉशिंग्टनने हल्ले आणि बॉम्बहल्ले सुरू केले त्या वेळी तेहरान अमेरिका सोबत अप्रत्यक्ष चर्चेत सहभागी होते.

Comments
Add Comment

Europe Heatwave 2026 : युरोपमध्ये उष्णतेचा कहर! जूनमध्ये १६ हजारांहून अधिक मृत्यू; पुन्हा हीटवेव्हचा धोका

नवी दिल्ली : युरोपमध्ये यंदा तीव्र उष्णतेने मोठे संकट निर्माण केले आहे. जून महिन्यात जवळपास आठवडाभर सुरू

America Iran War : अमेरिका पराभव स्वीकारत नाही तोपर्यंत... इराणचा इशारा

तेहरान : अमेरिका पराभव स्वीकारत नाही तोपर्यंत सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या होर्मुझ सामुद्रधुनीवरील वाहतूक

Indonesia Earthquake : इंडोनेशियात ७.७ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा इशारा, मोठी जीवितहानी

इंडोनेशिया : इंडोनेशियाच्या पूर्व भागातील फ्लोरेस बेटाजवळ शनिवारी पहाटे ७.७ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप (Indonesia Earthquake)

Shehbaz Sharif News : पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची भारताला धमकी, सिंधू पाणी करारावरून पुन्हा एकदा गरळ ओकली

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित 'यादगार-ए-फतह' कार्यक्रमात बोलताना

Major blow in the Iran conflict : अमेरिकेने गमावला ड्रोन ताफ्याचा चतुर्थांश भाग, ४५ 'एमक्यू-९ रीपर' नष्ट

इराणसोबत सुरू असलेल्या संघर्षामुळे अमेरिके

Apache Helicopter Accident : अमेरिकेच्या अत्याधुनिक AH-64 अपाचे हेलिकॉप्टरचा भीषण अपघातात दोन पायलट्सचा मृत्यू

टेक्सास : अमेरिकेतील टेक्सास राज्यात अमेरिकन सैन्याच्या अत्याधुनिक AH-64 अपाचे अटॅक हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला.