होर्मुज सामुद्रधुनी पुन्हा खुली करा, भारताची मागणी

ब्रिटनने बोलावलेल्या 60 देशांच्या बैठकीत मांडले मत


नवी दिल्ली : पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणच्या नियंत्रणात गेलेली होर्मुजची सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्याची भारताने मागणी केली आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी ब्रिटनच्या पुढाकाराने आयोजित बहुपक्षीय बैठकीत ही भूमिका मांडली. या संघर्षात जलमार्गावर आपले नागरिक गमावणारा भारत हा एकमेव देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


ब्रिटनने आयोजित केलेल्या या आभासी बैठकीत 60 हून अधिक देश सहभागी झाले होते. बैठकीचा मुख्य उद्देश होर्मुज सामुद्रधुनीत सुरक्षित आणि निर्बाध जहाजवाहतूक सुनिश्चित करणे हा होता. या संकटामुळे जागतिक तेलाच्या किमतीत मोठी वाढ होत आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनानुसार, मिस्री यांनी आंतरराष्ट्रीय जलमार्गांमध्ये मुक्त नौवहनाच्या तत्त्वावर भर दिला. तसेच या संघर्षाचा भारताच्या ऊर्जा सुरक्षेवर होत असलेला परिणामही त्यांनी अधोरेखित केला.बैठकीत त्यांनी सांगितले की, होर्मुज परिसरातील व्यापारी जहाजांवरील हल्ल्यांमध्ये भारतानेच सर्वाधिक नुकसान सोसले आहे. डायरेक्टोरेट जनरल ऑफ शिपिंगच्या माहितीनुसार, विदेशी ध्वज असलेल्या जहाजांवर कार्यरत किमान तीन भारतीय खलाशांचा मृत्यू झाला असून एक जखमी आहे. काही जहाजे अद्यापही या सामुद्रधुनीत अडकलेली आहेत.


मिस्री यांनी इशारा दिला की, या प्रदेशातील अस्थिरतेचा थेट परिणाम भारताच्या ऊर्जा सुरक्षेवर होत आहे. भारत हा जगातील प्रमुख कच्चे तेल आयात करणाऱ्या देशांपैकी एक असल्याने पश्चिम आशियातील परिस्थितीचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा प्रभाव पडत आहे. या संकटावर तोडगा काढण्यासाठी तणाव कमी करणे आणि सर्व पक्षांमध्ये संवाद व कूटनीती हाच एकमेव मार्ग असल्याचे त्यांनी नमूद केले. भारताने पुन्हा एकदा स्पष्ट केले की व्यापारी जहाजांवरील हल्ले अस्वीकार्य आहेत आणि आंतरराष्ट्रीय जलमार्गांमध्ये मुक्त वाहतूक सुनिश्चित केलीच पाहिजे.


आखाती देशांमध्ये सुमारे एक कोटी भारतीय नागरिक वास्तव्यास आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सर्व भारतीय नागरिक सुरक्षित असून भारतीय दूतावास त्यांच्या सतत संपर्कात आहेत. आतापर्यंत या संघर्षात 8 भारतीयांचा मृत्यू झाला असून एक जण बेपत्ता आहे.

Comments
Add Comment

Pakistan : पाकिस्तानने सीमेवर तैनात केल्या चिनी तोफा, भारत सावध; राष्ट्रहितासाठी योग्य ती कारवाई करू, परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिली माहिती

नवी दिल्ली : पाकिस्तानने भारताशी खेटून असलेल्या सीमेवर चिनी तोफा तैनात करण्यास सुरुवात केली आहे. काही

Foreign Journalists in Pakistan : POK मधील सत्य लपवण्याचा प्रयत्न? पाकिस्तानने परदेशी पत्रकारांसाठी लागू केले नवे नियम

इस्लामाबाद : पाकिस्तानव्याप्त काश्मीर (POK) मधील आंदोलनांवर करण्यात आलेल्या कारवाईवर आंतरराष्ट्रीय स्तरावर

Dubai Explosion : दुबई हादरली! जेबेल अली अन् पाम जुमेराहजवळ भीषण स्फोट? सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्याने उडाली खळबळ

दुबईच्या जेबेल अली औद्योगिक परिसरात बुधवारी पहाटे स्फोट झाल्याच्या चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात

Yemen attack : येमेनजवळ भारतीय मालवाहू जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला; 13 भारतीयांसह सर्व 14 खलाशी सुखरूप

येमेनच्या पश्चिम किनाऱ्याजवळ लाल समुद्रात भारतीय ध्वज असलेल्या मालवाहू जहाजावर झालेल्या क्षेपणास्त्र

Abbas Araghchi : परराष्ट्र मंत्री अराघची यांना हटवण्याची तयारी, इराणमध्ये अंतर्गत संघर्ष तीव्र

तेहरान : इराणच्या सत्ताकेंद्रात मोठ्या राजकीय हालचाली सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. काही खासदारांनी परराष्ट्र

इराणमध्ये महागाईचा आगडोंब; रक्त, केस आणि घरातले सामान विकून जगत आहे नागरिक

तेहरान : इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धाला आता सहा महिने होऊन गेले पण हे यद्ध अजून पूर्णपणे थांबलेले नाही.