Nashik : पंढरपूर वारीतील वारकऱ्यांसाठी दोस्ती फाउंडेशनचा मदतीचा हाथ, भव्य अन्नदान व प्रसाद वाटप

Nashik : पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या लाखो वारकऱ्यांची सेवा हीच पांडुरंगाची सेवा मानत दोस्ती फाउंडेशन गेल्या दहा वर्षांपासून अखंड अन्नदान व प्रसाद वाटपाचा उपक्रम राबवत आहे. यंदा या सेवाकार्याचे दहावे वर्ष असून, आषाढी अष्टमीच्या दिवशी मुक्काम पोस्ट भोसे (ता. पंढरपूर) येथे वारकऱ्यांसाठी भव्य प्रसाद वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.


या उपक्रमांतर्गत यावर्षी ५० हजार बुंदीचे लाडू आणि २ हजार किलो चिवडा प्रसाद म्हणून हजारो वारकऱ्यांना वितरित करण्यात येणार असल्याची माहिती दोस्ती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, क्रेडाई नाशिक मेट्रोचे उपाध्यक्ष तथा परफेक्ट बिल्डकॉनचे संचालक अनिल आहेर यांनी दिली. यावर्षी या सेवायज्ञाची अध्यक्षपदाची धुरा युवा नेतृत्व सुमित पाटील यांनी सांभाळली असून, त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण नियोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्कृष्ट पद्धतीने करण्यात येत आहे.



"वारकऱ्यांची सेवा म्हणजेच श्री विठ्ठल-पांडुरंगाची सेवा" या भावनेतून सुरू झालेला हा उपक्रम आज वारकरी संप्रदायासाठी श्रद्धेचे केंद्र बनला आहे. दरवर्षी हजारो वारकरी भोसे येथे या प्रसादाची आतुरतेने वाट पाहतात. येथे मिळणारा प्रसाद हा श्री विठ्ठलाचा आशीर्वाद मानून अनेक वारकरी तो आपल्या घरी घेऊन जातात. या सेवेमुळे वारीतील भक्तिभाव अधिक दृढ होत असून, वारकऱ्यांकडून दोस्ती फाउंडेशनवर आशीर्वादांचा वर्षाव होत आहे.


या संपूर्ण सेवाकार्यासाठी निग डोळ चे सरपंच शरदभाऊ मालसाने हे विशेष परिश्रम घेत असून, त्यांच्या सातत्यपूर्ण योगदानामुळे हा सेवायज्ञ अधिक व्यापक आणि यशस्वी होत आहे. दहा वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेला हा सेवेचा वसा भविष्यातही अधिक जोमाने सुरू ठेवण्याचा संकल्प दोस्ती फाउंडेशनने च्या वतीने राहुल पिंगळे आणि मच्छिंद्र देशमुख यांनी व्यक्त केला आहे. या सेवायज्ञाला पंचमुखी हनुमान मंदिर, जुना आडगाव नाका, पंचवटी (तपोवन) तसेच तिनो आनी आखाडा व सिंहस्थ कुंभमेळ्याचे प्रमुख पूज्य महंत डॉ. भक्तीचरणदासजी महाराज यांचे मोलाचे मार्गदर्शन व आशीर्वाद लाभत असून, त्यांच्या प्रेरणेतून हे सेवाकार्य अधिक भक्तिभावाने आणि समर्पित वृत्तीने पार पडत आहे.

Comments
Add Comment

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ठराविक वेळेत वाहतूक बंद

मुंबई : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आहे. मुंबई-नागपूर समृद्धी

Pune Ganeshotsav : गणेशोत्सवात ‘प्लाझ्मा साऊंड’ आणि लेझरला बंदी; डेसिबल मर्यादा ओलांडल्यास मंडळांवर कारवाई

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ध्वनिप्रदूषण आणि

Ganeshotsav 2026 Sound Restrictions : गणेशोत्सवात ‘प्लाझ्मा साऊंड’ आणि लेझरला बंदी; डेसिबल मर्यादा ओलांडल्यास मंडळांवर होणार थेट कारवाई

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी महत्त्वाच्या

Samruddhi Expressway Traffic Diversion : टाकळीवाडीत गॅस वाहिनीला गळती; खबरदारी म्हणून समृद्धी महामार्गावरील वाहतूक वळवली

छत्रपती संभाजीनगर : गंगापूर तालुक्यातील टाकळीवाडी येथे गेल कंपनीच्या गॅस वाहिनीला गळती लागल्याने प्रशासनाने

Nepal Flood : नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांचे शर्थीचे प्रयत्न; ४०४ नागरिक सुरक्षित, ३३८ जणांशी संपर्क

मुंबई : नेपाळ येथील महापुरामध्ये अडकलेले महाराष्ट्रातील नागरिक व धार्मिक पर्यटनासाठी गेलेले पर्यटक यांच्या

FSSAI Raid : निकृष्ट दर्जाच्या हिंगावर FSSAIची कारवाई; दोन मोठ्या मसाला ब्रँडच्या विक्रीवर बंदी

मुंबई : ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी, भारतीय अन्न सुरक्षा आणि