मुंबईमध्ये 'श्रीलंका टुरिजम नेटवर्किंग इव्हिनिंग'चे आयोजन

मुंबई : श्रीलंका टुरिजम प्रमोशन ब्युरोने मुंबईमध्ये श्रीलंका टुरिजम नेटवर्किंग इव्हिनिंगचे आयोजन केले होते. श्रीलंका आणि भारत यांच्या दरम्यान पर्यटन, व्यापार आणि सांस्कृतिक संबंध मजबूत करणे हा या उपक्रमाचा उद्देश होता. या कार्यक्रमामध्ये श्रीलंकेच्या प्रवास आणि पर्यटन उद्योगाच्या सदस्यांबरोबरीने भारतातील प्रमुख टूर ऑपरेटर्स, ट्रॅव्हल एजंट्स, बैठका, प्रोत्साहन कार्यक्रम, परिषदा आणि प्रदर्शने (माईस) प्लॅनर्स, कॉर्पोरेट्स, एयरलाईन्स आणि प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींनी भाग घेतला. हा उपक्रम दोन्ही देशांच्या व्यापारी समुदायांदरम्यान संवाद, सहयोग आणि व्यावसायिक विकासाचा एक मजबूत पूल बनला. पर्यटन, व्यापार आणि डेस्टिनेशन वेडिंगसाठी श्रीलंकेची वाढती लोकप्रियता यावेळी ठळकपणे प्रदर्शित केली गेली.


२०२५ मध्ये श्रीलंकेच्या पर्यटन क्षेत्रात मोठी भरभराट पाहायला मिळाली. तिथे २३.६ लाख परदेशी पर्यटकांनी भेट दिली आहे. श्रीलंकेच्या इतिहासातील पर्यटकांची ही आतापर्यंतची सर्वात मोठी, विक्रमी संख्या आहे. या यादीत भारत आघाडीवर असून ५.३१ लाखांहून अधिक भारतीयांनी श्रीलंकेला भेट दिली. हे प्रमाण एकूण पर्यटकांच्या सुमारे २७% असून इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत दुप्पट आहे. ही आकडेवारी भारत आणि श्रीलंका यांच्यातील जुने सांस्कृतिक संबंध आणि दोन्ही देशांमधील सुधारलेली विमान सेवा व मार्केटिंग प्रयत्नांचे फळ आहे.


कार्यक्रमाची सुरुवात भारत आणि श्रीलंकेच्या राष्ट्रगीतांनी आणि पारंपरिक दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर 'श्रीलंका टुरिझम प्रमोशन ब्युरो' आणि 'श्रीलंका एअरलाईन्स'च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपले विचार मांडले. त्यांनी सांगितले की, श्रीलंकेत सुंदर समुद्रकिनारे, प्राचीन संस्कृती आणि जंगलांसोबतच साहसी पर्यटन आणि योग-वेलनेसच्या देखील उत्तम सुविधा आहेत. श्रीलंकेच्या पर्यटनाला पुन्हा उभारी देण्यात भारताचा सर्वात मोठा वाटा असल्याचेही त्यांनी नमूद केले. वाढती गर्दी लक्षात घेता, श्रीलंका एअरलाईन्स आणि भारतीय विमान कंपन्यांनी मुंबई, दिल्ली, चेन्नई, बेंगळुरू आणि हैदराबाद सारख्या प्रमुख शहरांमधून विमान फेऱ्यांची संख्या वाढवली आहे, जेणेकरून पर्यटक आणि व्यापाऱ्यांचा प्रवास अधिक सुखकर होईल.


श्रीलंकेच्या पारंपरिक नृत्य आणि संगीताने या कार्यक्रमाची शोभा वाढवली, ज्यामध्ये तिथल्या समृद्ध कला आणि संस्कृतीची झलक पाहायला मिळाली. कार्यक्रमाचा समारोप शानदार जेवण आणि स्नेहमेळाव्याने झाला. यावेळी उपस्थितांना एकमेकांशी संवाद साधण्याची, सहकार्याच्या नवीन संधी शोधण्याची आणि श्रीलंकेच्या आदरातिथ्याचा अनुभव घेण्याची संधी मिळाली. कार्यक्रमात आयोजित केलेल्या 'राफल ड्रॉ'मुळे संध्याकाळ अधिकच मजेशीर आणि उत्साही झाली.


भारत ही श्रीलंकेसाठी सर्वात महत्त्वाची पर्यटन बाजारपेठ राहिली आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन श्रीलंका टुरिजम प्रमोशन ब्यूरोने भारतासोबतची भागीदारी अधिक दृढ करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. केवळ कौटुंबिक सहलींसाठीच नव्हे, तर कॉर्पोरेट बैठका, विवाह सोहळे आणि वैशिष्ट्यपूर्ण अनुभवात्मक प्रवासासाठी एक उत्तम देश म्हणून श्रीलंकेची ओळख निर्माण करणे, हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे. हे प्रयत्न श्रीलंकेच्या त्या व्यापक धोरणाचा भाग आहेत, ज्याद्वारे २०२६ पर्यंत ३० लाख आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. श्रीलंका सध्या जागतिक स्तरावरील पर्यटकांना आकर्षित करत असून भारतासोबतचे आपले आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक वाढवत आहे.

Comments
Add Comment

Raksha Bandhan AI Prompts : रक्षाबंधन होईल अतिशय खास! फक्त हे सोपे AI Prompts वापरा अन् बनवा भावा-बहिणीचे सर्वात सुंदर फोटो

सध्या सोशल मीडियावर AI फोटो जनरेशनचा मोठा ट्रेंड सुरू आहे. या रक्षाबंधनाला भाऊ आणि बहिणीचे

Nashik : आदिवासी कुटुंबाच्या जमिनीवरून वाद, मनपा अधिकाऱ्यांसह सात जणांवर गुन्हा

Nashik : नाशिकच्या दिंडोरी जकात नाका परिसरात आदिवासी कुटुंबाच्या ताब्यातील जमिनीवरील शेड हटवून जागा बळकावण्याचा

Raksha Bandhan Gifts 2026 : रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला चुकूनही देऊ नका ही गिफ्ट्स; मानली जातात अशुभ!

मुंबई : रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा आणि आपुलकीचा सण आहे. या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते, तर

TVJA Dahi Handi : TVJA गोविंदांचा थरार; पत्रकारांच्या एकतेचे दर्शन घडवत दहीहंडी उत्साहात

मुंबई : दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने टेलिव्हिजन जर्नलिस्ट असोसिएशन (TVJA)च्या सदस्यांनी वरळी येथील NSCI डोममध्ये

UP : उत्तरप्रदेशमध्ये आई-वडिलांशी दुर्व्यवहार करणारी मुले संपत्तीतून बेदखल होणार

लखनऊ : उत्तर प्रदेश (UP) सरकारने ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांना सन्मानाने जीवन जगता यावे

Kuku Kohli : बॉलिवूडचे ज्येष्ठ दिग्दर्शक कुकू कोहली यांना अखेरचा निरोप

मुंबई : ज्येष्ठ बॉलीवूड चित्रपट दिग्दर्शक कुकू कोहली (Kuku Kohli) यांच्यावर बुधवारी मुंबईतील ओशिवरा स्मशानभूमीत