भारतीय शेअर बाजार वधारला, बाजारात उत्साहाचे वातावरण

मुंबई : मुक्त व्यापार करारांच्या बाबतीत भारताची प्रगती उत्साहवर्धक आहे. युरोपियन युनियन सोबतच्या करारामुळे भारताला एकाचवेळी युरोपमधील २७ देशांची महाकाय बाजारपेठ खुली झाली आहे. भारताने EU व्यतिरिक्त निवडक देशांसोबत मुक्त व्यापार करार केले आहेत. या करारांमुळे भारत आता एकट्या अमेरिकेच्या बाजारपेठेवर अवलंबून नाही. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच भारतासोबत लवकरच मुक्त व्यापार करार करत असल्याचे जाहीर केले आहे. भारतावरी आयातशुल्क अर्थात टॅरिफमध्ये कपात करत असल्याचेही ट्रम्प यांनी जाहीर केले आहे. ट्रम्प यांच्या या घोषणांमुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या वातारणाचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारावर दिसत आहे.


बुधवार ४ फेब्रुवारी २०६ रोजी सकाळच्या सत्रात शेअरची खरेदी झाली. प्रामुख्याने तेल व्यापाराशी संबंधित कंपन्या आणि भारतीय तेलशुद्धीकरण कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. भारतात पायाभूत सुविधांची निर्मिती करणाऱ्या कंपन्या आणि देशात कार्यरत संरक्षण क्षेत्रातील कंपन्या यांच्याही शेअरची खरेदी उत्साहाने होत आहे. यामुळे मुंबईचा शेअर बाजार अर्थात सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात निफ्टी 50 यांच्यात मोठ्या प्रमाणात शेअरची खरेदी झाली. सेन्सेक्स आता ८३,८२४.४८ वर तर निफ्टी 50 आता २५,७८२.२० आहे. याआधी मंगळवारी ३ फेब्रुवारी रोजी सेन्सेक्स ८३,७३९.१३ वर तर निफ्टी 50 हा २५,७२७.५५ वर बंद झाला होता.


ट्रम्प यांनी घोषणा केली तरी अद्याप भारत आणि अमेरिका यांच्यात मुक्त व्यापार करार झालेला नाही. करारातील प्रमुख मुद्दे काय असतील या संदर्भात भारत आणि अमेरिका एक संयुक्त प्रसिद्धीपत्रक काढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पण असे प्रसिद्धीपत्रक अद्याप आलेले नाही. अमेरिका काहीही म्हणत असली तरी जोपर्यंत भारतीय कृषी क्षेत्राचे रक्षण करण्याच्या बाबतीत सहमती होत नाही तोपर्यंत या करारावर सही होणार नसल्याचे स्पष्ट संकेत केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी दिले आहेत.


दरम्यान व्हेनेझुएलातील तेल शुद्धीकरणासाठी जगात भारत हाच सर्वोत्तम देश असल्याची जाणीव अमेरिकेला झाली आहे. व्हेनेझुएलातील तेलात सल्फरचे प्रमाण जास्त असते. या पद्धतीच्या तेलाचे शुद्धीकरण करण्यासाठी आवश्यक तांत्रिक कौशल्य आणि क्षमता भारतीय रिफायनरींमध्ये उपलब्ध आहे. याउलट अमेरिकेकडे ही क्षमता फक्त मोजक्याच रिफायनरींकडे आहे. यामुळे व्हेनेझुएलाच्या तेलाचा जास्तीत जास्त वापर करण्याचे स्वप्न बघणाऱ्या अमेरिकेला भारताशिवाय पर्याय नसल्याची जाणीव झाली आहे. याचाही फायदा भारतीय बाजाराला होणार असल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Monsoon Update : महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम! राज्यात आतापर्यंत सरासरीच्या ९५ टक्क्यांहून अधिक पाऊस

- पालघरमध्ये एका दिवसात तब्बल १८३ मिमी पावसाची नोंद मुंबई : राज्यात मान्सून (Maharashtra Monsoon Update) पुन्हा सक्रिय झाला असून

Heart-wrenching incident in Nagpur : शाळेत मधल्या सुट्टीत धावताना अचानक कोसळल्याने ८ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू

नागपूर: नागपूर शहरातील जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका खासगी शाळेत अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावणारी घटना

NITESH RANE : 'नीट'च्या आंदोलनात 'सर तन से जुदा'चे नारे कशासाठी; मंत्री नितेश राणे यांचा सवाल

विद्यार्थ्यांच्या आंदोलनात हिंदू राष्ट्रविरोधी शक्तींची

Nashik : नाशिकच्या 'या' भाजप आमदाराचं WhatsApp हॅक, थेट...

Nashik : नाशिकमधील एका भाजप आमदाराचं WhatsApp हॅक झाल्याची घटना घडली आहे. तुमची शॉपिंग डिलिव्हरी आली आहे. तुमचा पत्ता

Mumbai Local : गर्दीचा मनस्ताप संपणार! सीएसएमटी-कसारा मार्गावर लवकरच धावणार १५ डब्यांची लोकल

मुंबई : मुंबईची जीवन वाहिनी मानल्या जाणाऱ्या मध्य रेल्वेच्या (Central Railway) मुख्य मार्गावरून दररोज प्रवास करणाऱ्या

Nashik : गंगापूर धरणातून विसर्गात वाढ; आता 12,600 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग

Nashik : गंगापूर धरणातून (Gangapur Dam) सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात आली असून, गुरुवार (23 जुलै) सकाळी 11