विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची, आलिशान महालांची भुरळ पडते, त्यामुळे हजारोंच्या संख्येने विदेशी पर्यटक राजस्थानला भेट देतात. असेच राजस्थान फिरण्यासाठी आलेल्या दोन विदेशी पर्यटकांना भारताने त्यांच्या देशात पिटाळले आहे. तर झालं असं राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यातील पुष्कर येथे पॅलेन्स्टाईनच्या समर्थनार्थ आणि इस्त्रायलच्या विरोधात पोस्टर लावल्याने त्यांच्याविरोधात ही कठोर कारवाई करण्यात आली आहे.


लुईस ग्रॅबियल डी ( ३६) आणि त्याची मैत्रीण एम्मा क्रिस्टीन ( ३६ ) हे दोघे राजस्थानात पर्यटनासाठी आले होते. यावेळी त्यांनी राजस्थानच्या अजमेर येथे वेगवेग्ळ्या जागांवर इस्त्रायल विरोधी आणि पॅलेन्स्टाईनच्या समर्थनार्थ पोस्टर चिटकवले. पोलिसांनी हे पोस्टर हटवले आहेत.


स्थानिक पोलिसांनी तपास केला असता ब्रिटिश नागरिकांनी राजस्थानच्या पुष्कर येथे असे आक्षेपार्ह पोस्टर चिटकवले असल्याचे समजले. पुष्करमध्ये मोठ्या संख्येने इस्त्रायली पर्यटक हे येत असतात. आणि सध्या पुष्करमध्ये २००० इस्त्रायली पर्यटक आहेत, त्यामुळे जाणूनबुजून केलेल्या या कृती प्रकरणी भारताने इमिग्रेशन अँड फॉरेनर्स ऍक्ट २०२५ नुसार गुन्हा दाखल करून पोस्टर चिकटवणाऱ्या दोघांवर कारवाई केली आहे. अजमेरच्या गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधीक्षक यांनी ही माहिती दिली.


व्हिसा नियमांनुसार भारतीय भूमीवर असताना इतर राष्ट्रांचा अनादर करण्याच्या कृतींमध्ये सहभागी होणे, हे व्हिसा नियमांचे स्पष्ट उल्लंघन आहे. यामुळेच ब्रिटिश नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Emergency Flight Landing : दुबईहून येणाऱ्या फ्लाइटचे लखनौमध्ये इमर्जन्सी लँडिंग; १५४ प्रवासी सुरक्षित

लखनौ येथे आज म्हणजेच शनिवार ११ एप्रिल सकाळी दुबईहून काठमांडूकडे जाणाऱ्या फ्लाय दुबईच्या फ्लाइटचे (एफजेड-1133)

Voters : एसआयआरमध्ये देशभरात 6.08 कोटी मतदारांची नावे वगळली

नवी दिल्ली : विशेष गहन पुनरावलोकन (एसआयआर) प्रक्रियेनंतर देशातील 9 राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशांच्या

Mathura Accident : मथुरेतील वृंदावनमध्ये यमुना नदीत बोट उलटून १० पर्यटकांचा मृत्यू

मथुरेतील वृंदावन येथे यमुना नदीत पर्यटकांनी भरलेली नौका उलटल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या भीषण अपघातात

Whatsapp Privacy : व्हॉट्सॲपच्या प्रायव्हसीवर मोठा वाद; एलोन मस्क आणि टेलिग्रामचे सीईओकडून प्रश्न उपस्थित

मुंबई : सध्या व्हॉट्सॲप (WhatsApp) च्या प्रायव्हसी आणि सिक्युरिटीबाबत मोठा वाद समोर आला आहे. टेलिग्राम (Telegram) चे सीईओ

Justice Yashwant Verma : जस्टिस यशवंत वर्मांनी दिला राजीनामा, घरात सापडलेल्या जळालेल्या नोटा

अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. न्यायमूर्ती वर्मा

West Bengal : पश्चिम बंगाल निवडणुकीसाठी भाजपचे ‘भरोसा पत्र’ जाहीर

भाजपकडून “सोनार बांग्ला” घडवण्याचा व्यक्त केला निर्धार कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीला अवघे 13 दिवस