मध्यप्रदेशच्या तरुणांनी महापालिकेच्या वाहनतळाचा घेतला ताबा... महापालिकेने उचलले हे पाऊल

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : हुतात्मा चौक येथील वाहनतळाच्याठिकाणी महापालिकेच्यावतीने निशुल्क सेवा दिली जात असतानाच याठिकाणी मध्य प्रदेशमधील दोन तरुणांनी हे वाहनतळ ताब्यात घेवून तिथे अनधिकृतपणे कारपार्किग चालवून वाहनचालकांकडून पैसे वसूल करत असल्याची बाब समोर आली आहे. यानंतर या दोन्ही तरुणांविरोधात महापालिकेने पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.


फोर्ट येथील डिएन रोडवरील हुतात्मा चौक येथील महापालिकेने यापूर्वी चालवण्यास दिलेले वाहनतळ संबंधितांकडून काढून तिथे निशुल्क सेवा सुरु केली होती. परंतु असे असतानाच याठिकाणी दोन व्यक्ती हे खाजगी वाहना चालकांकडून अनाधिकृतरित्या पार्कीगच्या नावाखाली पैसे घेत असल्याचे दिसून आले. या व्यक्तींकडे व्हॅलेट टॅग नावाचे पार्किंग पावती दिसून आली. यापावतीबाबत महापालिकेच्या मुकादमांनी विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. याठिकाणी निशुल्क सेवा असतानाही या व्यक्तींकडून पार्कींगच्या नावाखाली प्रती तास १५० रुपये आकारले जात होते. त्यानंतर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी याची वर्दी पोलिसांमध्ये दिल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांच्या माहितीमध्ये हे दोन्ही तरुण १८ वर्षांचे असून पंजाब ग्रील हॉटेलसमोरील पदपथावर राहतात आणि मध्यप्रदेशमधील सतनामध्ये राहणारे आढळून आले. त्यानंतर माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.

Comments

विनायक    February 4, 2026 02:52 AM

फक्त दख़ल नको, शिक्षा व्हायला हवी

Add Comment

Blue Flag Beach : श्रीवर्धन समुद्रकिनारा ‘ब्लू फ्लॅग बीच’ म्हणून विकसित होणार

मुंबई : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्याचा शाश्वत विकास साधत त्याला ‘ब्लू फ्लॅग बीच’ म्हणून विकसित

Maharashtra : गोदा ते नर्मदा या पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा २०२६ उपक्रमाचा शुभारंभ त्र्यंबकेश्वर आणि चोंडी येथून होणार

मुंबई : "गोदा ते नर्मदा" या पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा २०२६ चा शुभारंभ त्र्यंबकेश्वर आणि चोंडी येथून

Maharashtra : उदंचन जलविद्युत प्रकल्पाद्वारे ऊर्जा निर्मितीत महाराष्ट्र अग्रेसर ठरणार

मुंबई : राज्यातील वीज निर्मितीची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढविण्यात येणार येत उदंचन जलविद्युत प्रकल्पातून एक

Heat Wave : उष्णता लाटेच्या आपत्तीला सामोरे जाण्यासाठी राज्य शासन सज्ज

मुंबई  : वातावरणीय बदलांमुळे राज्यात हवामानात मोठे आणि अनियमित बदल दिसून येत आहेत. मे महिन्यात पाऊस, एप्रिलमध्ये

Reservation : अनुसूचित जाती उपवर्गीकरणाबाबत निवेदन देण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ

मुंबई : राज्यातील अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या अनुषंगाने निवेदन किंवा अर्ज सादर करण्यासाठी

Nitesh Rane : मत्स्य शेतकऱ्यांच्या उत्पादनांसाठी राज्यात 'क्लस्टर', मूल्यवर्धनासाठी कारखाना उभारण्यावरही चर्चा

मुंबई : राज्यातील मत्स्यव्यवसायाला आधुनिक उद्योगाची जोड देण्यासाठी मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे