स्वच्छ सर्वेक्षण २०२६; शहर स्वच्छ करण्यासाठी महापालिकेच्या प्रयत्नांमध्ये सहभागी व्हा, नागरिकांना मुंबई मनपाचे आवाहन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : केंद्र शासनाकडून स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ चा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. यंदाच्या स्वच्छ सर्वेक्षणात बृहन्मुंबईची उत्तम कामगिरी असावी, यासाठी संपूर्ण मुंबई महानगरात स्वच्छता राखून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने केले आहे. तसेच, महानगरपालिकेतील घनकचरा, पर्जन्यजल, मलनिस्सारण प्रचालन, मुंबई सांडपाणी विल्हेवाट प्रकल्प, शिक्षण आदी विभागांनी मुंबई क्षेत्रात स्वच्छ सर्वेक्षणासाठी उत्तम समन्वयातून प्रभावी उपाययोजना कराव्यात. मूल्यमापन व अहवालासाठी आवश्यक असलेली सर्वसमावेशक, अचूक व अद्ययावत माहिती संकलित करावी, असे निर्देशही जोशी यांनी दिले आहेत.


स्वच्छ सर्वेक्षणाच्या अनुषंगाने, महानगरपालिका मुख्यालयात सोमवारी ०२ फेब्रुवारी २०२६ बैठक पार पडली. त्यावेळी त्या बोलत होत्या. उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांच्यासह विविध विभागांतील अधिकारी यावेळी उपस्थित होते. केंद्र शासनाच्या गृहनिर्माण आणि नागरी कार्य मंत्रालयाच्या वतीने शहरांमधील स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि नागरिक सहभागाचे मूल्यांकन करून क्रमवारी लावण्याच्या उद्देशाने दरवर्षी स्वच्छ सर्वेक्षणाचे आयोजन केले जाते. यंदा स्वच्छ सर्वेक्षणाचे दहावे वर्ष आहे. उत्तम स्वच्छता, कचरा वर्गीकरण, संकलन आणि वाहतूक, प्रक्रिया आदी बाबींवर या अंतर्गत मूल्यमापन केले जाते.


स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ साठी केंद्र शासनाकडून ‘स्वच्छता की नई पहल-बढाए हाथ, करे सफाई साथ’ ही मध्यवर्ती संकल्पना मांडण्यात आली आहे. या अंतर्गत, स्वच्छतेसंदर्भात नागरिकांचा अभिप्राय आणि पडताळणीला अधिक महत्व देण्यात आले आहे. यानुसार, संकेतस्थळ आणि अॅप्सच्या माध्यमातून वर्षभर डिजिटल अभिप्राय संकलित केले जातील. उघड्यावर शौच व लघवी करण्यावर प्रतिबंधाच्या अनुषंगाने नवीन मानके निश्चित करण्यात आली आहेत. तसेच, शाळांमधील वर्तन बदल कार्यक्रमांवर भर देण्यात येत आहे. यंदाच्या सर्वेक्षणात किनारपट्टीवरील शहरांसाठी स्वतंत्र मूल्यांकन निकष लावण्यात आले आहेत. पर्यटन / वारसा / धार्मिक स्थळे आणि जास्त वर्दळीची सार्वजनिक ठिकाणे यांच्याशी संबंधित स्वच्छतेच्या निकषांवरही विशेष भर देण्यात आला आहे.


स्वच्छ सर्वेक्षणात या प्रयत्नांचे योग्य मूल्यमापन दिसण्यासाठी प्रभावीपणे उपाययोजना करणे आवश्यक आहे. यासाठी, घनकचरा व्यवस्थापन, मलनिस्सारण प्रचालन व प्रकल्प, मुंबई सांडपाणी विल्हेवाट प्रकल्प, पर्जन्य जलवाहिनी तसेच शिक्षण विभाग आदी विभागांनी समन्वयातून प्रभावी उपाययोजना कराव्यात. मूल्यमापन व अहवालासाठी आवश्यक असलेली सर्वसमावेशक, अचूक व अद्ययावत माहिती संकलित करावी. तसेच, यंदा सर्वेक्षणात नागरिक सहभाग व शाळा-आधारित उपक्रमांवर विशेष भर देऊन नागरिक व विद्यार्थ्यांचा या प्रक्रियेत सहभाग सुनिश्चित करावा. विद्यार्थ्यांमध्ये बालवयातच स्वच्छतेच्या सवयी रुजल्या तर सामाजिक स्तरावर दीर्घकालीन व शाश्वत वर्तनबदल घडतो. यामुळे, नागरी स्वच्छतेला हातभार लागतो. नागरिकांनीही स्वच्छतेला प्राधान्य देत महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. अश्विनी जोशी यांनी यावेळी केले.

Comments
Add Comment

Central Railway : मध्य रेल्वेच्या ताफ्यात स्वयंचलित दरवाजांची 'नॉन-एसी' लोकल; मराठी भाषेला डावलल्याने नव्या वादाला तोंड

मुंबई : मुंबईकरांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुखकर करण्यासाठी मध्य रेल्वेच्या ताफ्यात सोमवारी स्वयंचलित

Shrikant Shinde : श्रीकांत शिंदेंसमोर भिडणाऱ्या पदाधिकाऱ्यांना हटवले

 सोलापूर आणि माढ्यातील शिवसेनेची कार्यकारिणी बरखास्त मुंबई : शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सोलापूर

Israel - Iran - US War Impact : कांद्याची आता पावडर होणार!

निर्यात थंडावल्याने सरकारची योजना; तालुकानिहाय प्रक्रिया केंद्रांचे जाळे उभारणार मुंबई : इराण-इस्रायल

Elite Guard : मंत्रालयाला आता ‘एलिट गार्ड’चे अभेद्य कवच

‘तिहेरी’ सुरक्षा व्यवस्था; मुख्य प्रवेशद्वारावर ‘एके-४७’सह कमांडो तैनात मुंबई : राज्याचे मुख्य प्रशासकीय

BMC News : उबाठा,काँग्रेस नगरसेवकांच्या प्रभागात कोटींचा निधी

- निधी वाटपात भेदभाव केल्याचा आरोप, पण भाजपने राखला विरोधी पक्षाच्या नगरसेवकांचाही मान मुंबई (सचिन धानजी) मुंबई

Online LPG bookings : ऑनलाइन एलपीजी बुकिंंगमध्ये ९८ टक्क्यांनी वाढ; शासनाच्या कडक कारवाईमुळे ग्राहकांच्या विश्वासात वाढ

मुंबई : एलपीजी उपलब्धतेबाबत ग्राहकांमध्ये विश्वास आणि सकारात्मक बदल दिसून येत आहेत. इंधन टंचाईची भीती आणि