BMC CBSE 10th Class Result : महानगरपालिका सीबीएसई मंडळाच्या दहावीचा निकाल ९२.८९ टक्के

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) संलग्न ११ शाळांच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या परीक्षेत महानगरपालिकेच्या शाळांचा एकूण निकाल ९२.८९ टक्के इतका लागला असून, विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण प्रगती दर्शवली आहे.


महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) संलग्न ११ शाळांमधून एकूण ३३९ विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीची परीक्षा दिली होती.


मिठागर सीबीएसई शाळेतील कुमारी आर्या लामने ह्या विद्यार्थीनीने ९७.८ टक्के गुण मिळवून महानगरपालिकेच्या शाळांतून प्रथम येण्याचा मान मिळविला. तसेच महानगरपालिकेच्या पुनम नगर शाळेतील सौरभ यादव (९७.२ टक्के), राजावाडी शाळेतील कौस्तुभ त्रिपाठी (९७ टक्के), पुनम नगर शाळेतील आर्यन मयेकर (९६.६ टक्के) आणि श्रेया सिंग (९६.४ टक्के), मिठा नगर शाळेतील माही सोळंकी (९६.२ टक्के) या विद्यार्थ्यांनी सर्वाधिक गुण मिळविले.


चार शाळांचा १०० टक्के निकाल तसेच मुंबई महानगरपालिकेच्या भवानी शंकर रोड (दादर), राजावाडी (घाटकोपर) मिठा नगर (मुलुंड) पुनम नगर (अंधेरी) या शाळांचा १०० टक्के निकाल लागला आहे.


महानगरपालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांनी गणित, विज्ञान व इंग्रजी विषयांमध्ये लक्षणीय प्रगती केल्याचे निकालातून दिसून आले. तसेच काही विद्यार्थ्यांनी मराठी विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवून विशेष प्राविण्य मिळविले. विद्यार्थ्यांचा अभ्यास, शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन, पालकांचे सहकार्य आणि शिक्षण विभागाने राबविलेल्या विविध उपक्रमांचे फलित आहे.


मुंबईच्या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर, महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, उप आयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर तसेच शिक्षण अधिकारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि पालकांचे अभिनंदन केले असून, पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Comments

Bharat balkrishna Sawarkar    April 15, 2026 10:34 PM

Good

Add Comment

Mumbai Family Suicide : नेव्ही नगरमध्ये नौदल कर्मचाऱ्याची कुटुंबासह राहत्या घरात आत्महत्या; पोलिसांकडून तपास सुरू

मुंबई : कुलाबा येथील नेव्ही नगर परिसरात नौदल कर्मचाऱ्यासह त्याची पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू झाल्याची

Mumbai-Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन लवकरच सुरू होणार

मुंबई : मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर (बुलेट ट्रेन) प्रकल्पांतर्गत मुंबईतील वांद्रे कुर्ला

Mumbai Water Storage : 'मुंबई ३' जलवाहिनीच्या दुरुस्तीनंतर मुंबईकरांसाठी जलाशयांमध्ये किती पाणीसाठी ?

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण झाली आहे. या

Mumbai News : पिकअप चालकाने बड्या कंपनीच्या अधिकाऱ्याला केली मारहाण

मुंबई : सकाळी घाटकोपर पूर्व येथे ईस्टर्न एक्सप्रेस वे वर ओव्हरटेक करण्यावरून वाद झाला. एका पिकअप वाहनाच्या

Mumbai News : धक्कादायक! वाढदिवसाच्या केकमध्ये आढळली पाल, 11 जणांना विषबाधा; 4 जण ICUमध्ये

नालासोपारा : नालासोपारा पूर्वेकडील लक्ष्मी नगर परिसरातील निळकंठ अपार्टमेंटमध्ये वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान

Auto Rickshaw : ऑटो-टॅक्सी चालकांना मराठीचे ज्ञान अनिवार्य; नियम न पाळल्यास तीन टप्प्यांत कारवाई

मुंबई : राज्यातील ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी 18 ऑगस्टपासून कामापुरते मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्यात