BMC : मुंबई महापालिका प्रशासनात खांदेपालट, सहायक आयुक्तांना पदोन्नती तर काहींच्या बदल्या

सहायक आयुक्त योगेश देसाईंवर जी उत्तर विभागाची जबाबदारी


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिका प्रशासनात सहायक आयुक्तांच्या बदल्या आणि सहायक आयुक्तांना उपायुक्तपदी पदोन्नती देत प्रशसनात खांदेपालट करण्यात आली आहे. यामध्ये सहआयुक्त देविदास क्षिरसागर यांच्याकडे वित्त विभागाचा भार तर विनायक विसपुते यांच्याकडे उपायुक्त विशेष पदाचा कायम ठेवतानाच मध्यवर्ती खरेदी खात्याचा अतिरिक्त कार्यभार सोपवयात आला आहे. तर सहायक आयुक्त योगेश देसाई यांच्याकडे बी विभागासोबतच जी उत्तर विभागाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.


मुंबई महापालिकेच्यावतीने सहायक आयुक्त मनिष वळंजू आणि सहायक आयुक्त विनायक विसपुते यांना उपायुक्तपदी पदोन्नती देण्यात आली आहे. त्यामुळे डि विभागाचे सहायक आयुक्त असलेल्या वळंजु यांना या उपायुक्तपदी पदोन्नती देताना त्यांच्याकडे परिमंडळ सातची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर सहायक आयुक्त विनायक विसपुते यांचीही उपायुक्तपदी पदोन्नती करण्यात आल्यानंतर उपायुक्त (विशेष) या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे, तर मध्यवर्ती खरेदी खात्याचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.


डोंगरी, मोहम्मद अली या भागातील अनधिकृत बांधकामे काढण्याची हिंमत दाखवणाऱ्या योगेश देसाई यांच्याकडे बी विभागाचा पदभार कायम ठेवतानाच दादर,माहिम,धारावी या जी उत्तर विभागाच्या सहायक आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. त्यामुळे किमान दादरमधील फेरीवाल्यांसह रस्त्यांवरील अनधिकृत बांधकामांचे जंजाळे साफ होतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे. देसाई यांना जी उत्तर विभागात आणून फेरीवाल्यांवरील कारवाई तीव्र केली जावी अशाप्रकारची एकप्रकारे मागणी होती होती, ती मागणी आता प्रत्यक्षात साकार झाल्यामुळे देसाई आता दादर आणि माहिमकरांच्या स्वप्नांना कसा न्याय देतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.


उपायुक्त/सहआयुक्त




  1. सहआयुक्त देविदास क्षिरसागर बदलीचे ठिकाण : वित्त विभाग

  2. उपायुक्त संध्या नांदेडकर, बदलीचे ठिकाण : परिमंडळ पाच

  3. उपायुक्त विनायक विसपुते, बदलीचे ठिकाण : उपायुक्त (विशेष) अतिरिक्त कार्यभार मध्यवर्ती खरेदी खाते


सहायक आयुक्तांच्या बदली




  1. अलका ससाणे बदलीचे ठिकाण : सहायक आयुक्त बाजार, सी विभागाचा अतिरिक्त कार्यभार

  2. योगेश देसाई, बदलीचे ठिकाण : सहायक आयुक्त बी विभाग, जी उत्तर विभागाचा अतिरक्त कार्यभार

  3. संतोष साळुंखे, बदलीचे ठिकाण :सहायक अायुक्त डि विभाग, अतिक्रमण निर्मुलन (शहर)अतिरिक्त कार्यभार

  4. जितेंद्र घोराडे, बदलीचे ठिकाण : सहायक आयुक्त बी विभागाचा पूर्णकालिन कार्यभार

Comments
Add Comment

Prakash Abitkar : आरोग्य समित्यांच्या माध्यमातून जनतेच्या आरोग्य समस्या जाणून घेणार

मुंबई : राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि उत्तरदायी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या विविध

Maharashtra Agriculture Department : महाराष्ट्राच्या कृषी विभागाची दमदार कामगिरी; केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पुरस्काराने होणार सन्मान

- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे स्वीकारणार पुरस्कार मुंबई : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME)

FDA Notice to SRK : ‘विमल इलायची’ जाहिरातीवर FDAचा दणका; अजय, शाहरुख आणि टायगरला नोटीस

मुंबई : बॉलिवूड अभिनेते अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे

Mumbai Family Suicide : नेव्ही नगरमध्ये नौदल कर्मचाऱ्याची कुटुंबासह राहत्या घरात आत्महत्या; पोलिसांकडून तपास सुरू

मुंबई : कुलाबा येथील नेव्ही नगर परिसरात नौदल कर्मचाऱ्यासह त्याची पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू झाल्याची

Mumbai-Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन लवकरच सुरू होणार

मुंबई : मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर (बुलेट ट्रेन) प्रकल्पांतर्गत मुंबईतील वांद्रे कुर्ला

Mumbai Water Storage : 'मुंबई ३' जलवाहिनीच्या दुरुस्तीनंतर मुंबईकरांसाठी जलाशयांमध्ये किती पाणीसाठी ?

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण झाली आहे. या