Nanded: नांदेडमधील धक्कादायक प्रकार, स्वत:च्या स्वार्थासाठी पित्याने काढला मुलीचा काटा

नांदेड: राजकारणाच्या हव्यासामुळे धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदाची निवडणूक लढवण्यासाठी आडकाठी ठरणाऱ्या आपल्या सहा वर्षांच्या चिमुकलीची पित्यानेच हत्या केल्याची घटना समोर आली आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील एका व्यक्तीने हे क्रूर कृत्य केले असून आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे.


नेमकं घडलं काय?
नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील केरुड गावातील रहिवासी असलेला आरोपी आपल्या गावात केशकर्तनालय चालवतो. त्याला तीन अपत्ये होती, दोन मुलगे आणि एक मुलगी होती. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत त्याला सरपंचपदासाठी निवडणूक लढवण्याची तीव्र इच्छा होती. पण, महाराष्ट्र निवडणूक कायद्यातील 'दोन अपत्यांच्या' अटीमुळे तो अपात्र ठरत होता. ही अट पूर्ण करण्यासाठी त्याने आपल्या सहा वर्षांच्या मुलीचा संपवण्याचे ठरवले.


पित्याने दिली गुन्ह्याची कबुली
मिळालेल्या माहितीनुसार, २९ जानेवारी रोजी आरोपीने आपल्या मुलीला दुचाकीवर बसवून तेलंगणातील निझामाबाद जिल्ह्याच्या दिशेने नेले. तिथे एका निर्जन स्थळी असलेल्या कालव्यात त्याने मुलीला जिवंत फेकून दिले. काही दिवसांनी स्थानिकांना कालव्यात मुलीचा मृतदेह आढळल्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांना बोलावले. निझामाबाद पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन तपास सुरु केला. पोलिसांनी मुलीचा फोटो सोशल मीडियावर आणि आसपासच्या परिसरात प्रसारित केला. मुखेडमधील काही नागरिकांनी मुलीची ओळख पटवल्यानंतर पोलिसांनी पित्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्याने निवडणुकीसाठी मुलीची हत्या केल्याची कबुली दिली.


महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी दोनपेक्षा जास्त अपत्ये असल्यास उमेदवार निवडणूक लढवण्यास अपात्र ठरतो. म्हणजेच तो निवडणूक लढवू शकत नाही. ही तांत्रिक अडचण दूर करण्यासाठी एका पित्याने स्वतःच्या रक्ताच्या नात्याला संपवल्याने संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त होत आहे. सध्या आरोपी पोलीस कोठडीत आहे. तसेच पोलीस घटनेचा तपास करत आहेत.

Comments
Add Comment

Nashik : 'मिशन ग्रीन मान्सून' चा रविवारी ८ वा टप्पा, ऑनलाइन नोंदणी केलेल्या नाशिककरांना होणार थेट देशी रोपांचे वाटप

Nashik : मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून आणि 'उन्नत नाशिक अभियान' अंतर्गत नाशिक शहर हरित व समृद्ध बनवण्यासाठी

Nashik : नाशिक महापालिकेत महापौर हिमगौरी आडकेंच्या हस्ते ध्वजारोहण

Nashik : भारताच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त नाशिक महानगरपालिकेच्या (Nashik NMC) राजीव गांधी भवन येथे महापौर हिमगौरी

FDA Raid : ब्लिंकिट, झेप्टो, इन्स्टामार्ट 'एफडीए'च्या रडारवर

- १४ आस्थापनांचे परवाने निलंबित; 'फिल्म सिटी'तील बॉलीवूड कॅफेलाही दंड मुंबई : झेप्टो, ब्लिंकिट आणि स्विगी

Nashik : नाशिकमध्ये वीर सैनिकांच्या स्मृतीसाठी ‘वीर प्रेरणास्थळ’ उभारणार, वीरनारी यांचा मंत्री महाजन यांच्या हस्ते धनादेश देऊन सन्मान

Nashik : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी भारतीय सशस्त्र सेनेतील नाशिक

Nashik : मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते अनुकंपाधारकांना नियुक्तीपत्र प्रदान

Nashik : जिल्ह्यातील ३९ अनुकंपा धारकांना आज स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमानंतर येथील

Dwidha Movie : 'द्विधा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक

मुंबई : मानवी नात्यांतील भावनिक गुंतागुंत, प्रेम, कर्तव्य आणि त्याग यांचा संवेदनशील वेध घेणाऱ्या ‘द्विधा’ या