संत चोखामेळा

ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा
ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा।
काय भुललासी वरलिया रंगा ॥
कमान डोंगी परी तीर नोहे डोंगा।
काय भुललासी वरलिया रंगा ॥
नदी डोंगी परी जळ नोहे डोंगा।
काय भुललासी वरलिया रंगे ॥
चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा।
काय भुललासी वरलिया रंगा ॥


- डॉ. देवीदास पोटे


संत चोखामेळा यांच्या खांद्यावर भागवत धर्माची पताका शोभून दिसते, असे म्हटले जाते. जातिभेदांच्या कृत्रिम भिंती पार करून जाणारा हा भाक्तिमार्ग त्यांनी आपल्या समर्पित भक्तिमय जगण्याने समृद्ध केला. तत्कालीन समाजरचनेने हीत ठरविलेल्या यातीत जन्मल्यामुळे येणारे दाहक वास्तव त्यांना अगतिकपणे सहन करावे लागले. सामाजिक विषमतेच्या जातीभेदाचे चटके त्यांना चांगलेच बसले. पण चोखामेळा यांचे मोठेपण असे, की त्यांनी या कटू अनुभवाचे भांडवल केले नाही. भक्तीच्या पावन प्रवाहात हे नकोसे, अप्रिय वास्तव त्यांनी विरघळवून टाकले.


कर्मकांडावर विश्वास ठेवणाऱ्या वरवरच्या बाह्य रूपाला भुलून खऱ्या आंतरिक अनुभूतील विसरणाऱ्या लोकांना त्यांनी आत्मविश्वासाने आणि निर्भयपणे बजावलं, " वरवरच्या रंग रूपाला का बरं भुललास? ऊस बाहेरून ओबडधोबड दिसतो पण त्यातला रस मात्र गोड असतो. धनुष्याची कमान वेडीवाकडी दिसते, पण बाण मात्र सरळ असतो. नदी वेडीवाकडी वळणे घेत डोगंरदऱ्यातून वाहते, पण तिचा गाळ मात्र स्वच्छ असतो. संत चोखामेळा स्वत:विषयी म्हणतात, 'हा चोखामेळा जरी असा ओबडधोबड दिसत असला तरी त्याचा अंतरीचा भक्तिभाव मात्र अंतर्बाह्य शुद्ध आहे.' हेच तत्त्व सांगताना संत एकनाथ म्हणतात, 'तीर्थस्थाने अंग जरी शुद्ध केले । नाही धोवियले अंतरास ॥. आयुष्यात अर निर्मळता वा अंतरीची सात्विकता नसेल, तर साबणाने शरीराच्या वरवरच्या रूपाला किती सुंदर केले, सजवले तरी अंतरीचा शुद्ध भाव नसेल तर काय उपयोग आहे?


आजच्या वर्तमानकाळात तर वरवरच्या या सजावटीला आणि रंगरंगोटील अनाठायी महत्त्व आले आहे. लोक वरवरच्या देखाव्याला भुलून काल्पनिक भुलभूलैयात अडकत आहेत.


संत चोखामेळा यांनी सातशे वर्षांपूर्वी आयुष्यातले निखळ सत्य सांगितले आहे. मानवी आयुष्यात ते कुठल्याही काळात लागू पडते.

Comments
Add Comment

Shravan Putrada Ekadashi 2026 : श्रावण पुत्रदा एकादशी 23 ऑगस्टला; जाणून घ्या मुहूर्त, पूजा विधी आणि धार्मिक महत्त्व

Shravan Putrada Ekadashi : श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला ‘श्रावण पुत्रदा एकादशी’ किंवा ‘पवित्रा एकादशी’ असे

Babulnath Temple : मुंबईतील प्रसिद्ध बाबुलनाथ मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी!

मुंबई : पवित्र श्रावण महिन्यातील पहिल्याच सोमवारी (३ ऑगस्ट २०२६) संपूर्ण मुंबई शहर शिवभक्तीत चिंब भिजल्याचे

कर्म हेच ब्रह्मदेव

अंधारातून प्रकाशाकडे म्हणजेच अज्ञानातून ज्ञानाकडे या विषयाअंतर्गत आपण संचित प्रारब्ध ह्या संकल्पना समजावून

दशदिक्षु स्थितं दैवं, दशशक्तिसमन्वितम्

प्रभाती सूर नभी रंगती दशदिशा भूपाळी म्हणती पानोपानी अमृत शिंपित उषा हासरी हसते धुंदीत जागी होऊन फुले

नको देवराया अंत आता पाहू । प्राण हा सर्वथा जाऊ पाहे ।।

कान्हो, ते तुझ्यासाठी केलेले दागिने काय पेटीत ठेवण्यासाठी केले आहेत? जरा अंगावर घाल, बिदरचे सरदार येणार आहेत आज

आत्मपरीक्षण

आत्मज्ञान - प्राची परचुरे-वैद्य मानवी जीवनातील सर्वांत गुंतागुंतीचा शोध कोणता, असा प्रश्न विचारला तर त्याचे