मानवी संस्कृती

जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै


आज जगात जे काही चाललेले आहे ते सर्वकाही संस्कारांमुळे चाललेले आहे. अनिष्ट चाललेले आहे ते व चांगले चाललेले आहे तेसुद्धा. सर्व काही संस्कारांमुळेच चाललेले आहे. म्हणूनच मूल जन्माला आल्यावर, त्याच्यावर चांगले संस्कार कसे होतील ह्याची काळजी घेणे हे त्या कुटुंबातील माणसांचे काम आहे. माणसाला बुद्धी दिलेली आहे ती पुढील पिढीला सुसंस्कारित करण्यासाठी! सुसंस्कार म्हणजे काय? चांगल्या संस्कृतीतून केले गेलेले संस्कार. चांगली संस्कृती म्हणजे काय? मानवी संस्कृतीचे संस्कार! आज जे कुसंस्कार होतात त्यातून माणसाच्या बुद्धीची जडणघडण संकुचित होण्याच्या दृष्टीने होते. बुद्धीला योग्य स्वातंत्र्य मिळत नाही व त्यामुळे त्याचे विचार, उच्चार व आचार त्याप्रमाणे होतात. आज जगांत युद्धलढाया, भांडणतंटे, खूनमारी होतात म्हणून मानवी संस्कृती महत्वाची आहे. मानवी संस्कृती कुठली? समता, सभ्यता. सामंजस्य, सहिष्णुता व समाधान हे मानवी संस्कृतीचे पंचशील आहे. ह्या मानवी संस्कृतीच्या आधारे जे संस्कार होतात,त्याने खरा माणूस तयार होईल. आज माणसाला माणूस का म्हणायचे ? तर ह्याला दोन पाय आहेत म्हणून ? पशु व माणूस ह्यांत फरक नाही कारण ते जसे करतात तसे माणूस करतो. बरेचदा पशुपेक्षासुद्धा माणूस अधिक वाईट वागतो. म्हणून मानवी संस्कृती महत्वाची आहे.


मूल जन्माला येते तेव्हा संचित घेऊन येते. त्यातून नैसर्गिक पद्धतीने प्रारब्ध वाट्याला येते. मग मागल्या जन्माचे आठवत का नाही ? ह्याला एकच कारण. तो व्यवस्थेचा भाग आहे. मी व्याख्या केलेली आहे "नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था म्हणजे परमेश्वर!" आधीचा जन्म आठवत नाही हा व्यवस्थेचा भाग आहे. आधीचा जन्म आठवला असता तर ती व्यवस्था राहिली नसती. मागचा जन्म आठवला असता तर गोंधळ झाला असता. दुःख अडचणी यापेक्षा दुसरे काय वाट्याला येईल ! हे आठवत नाही हा दिव्य व्यवस्थेचा भाग आहे. तुम्हाला जर मागचा जन्म आठवू लागला तर हाहाकार होईल. नवऱ्याला मागच्या जन्मीची बायको व बायकोला मागच्या जन्मीचा नवरा आठवत नाही हा व्यवस्थेचा भाग आहे. ह्या व्यवस्थेला अनुसरून जीवन जगणे म्हणजे उपासना. ह्या व्यवस्थेला धक्का लागता कामा नये. तुम्ही जर ह्या व्यवस्थेला अनुसरून जीवन जगलात तर परमानंद होईल व ह्या व्यवस्थेला अनुसरून जीवन जगला नाहीतर दुःख होईल. घरांत जर अव्यवस्था असेल तर घरांत बोंबाबोंब. फणी मिळत नाही. घड्या0 मिळत नाही व त्यासाठी आरडा ओरडा. असा माणूस बाहेर पडताना आसपासच्या सर्व लोकांना कळते.हा बाहेर निघाला.काही लोक सर्व वस्तू जिथल्या तिथे ठेवतो. घड्याळाच्या जागेवार घड्याळ. फणीच्या जागेवर फणी. वस्तू जगाच्या जागेवर असल्या की तुम्ही वेळेवर निघता. गाडी वेळेवर मिळते. म्हणून परमेश्वरी व्यवस्था व मानवी व्यवस्था ह्यांत मानवी व्यवस्था म्हणजे उपासना व नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था म्हणजे परमेश्वर !

Comments
Add Comment

क्रियमाण

जीवन संगीत-सद्गुरू वामनराव पै   क्रियमाण म्हणजे नेमके काय? असा प्रश्न बऱ्याच लोकांच्या मनात असणार. याचे अगदी

घे जवळी, घे जवळी...

ऋतुराज-ऋतुजा केळकर   “मैने बिगाडा हर काम अपना तुने सावरा हर काम मेरा सांचा नाम तेरा...” साजवेळी हे गीत सहजच ओठी

कल करे सो आज कर

आत्मज्ञान-प्राची परचुरे-वैद्य   काही जणांना सवय असते आजचे काम उद्या किंवा नंतर करण्याची, त्याचवेळेला ते काम

जाता पंढरीसी सुख वाटे जीवा...”

भारतीय संत-डॉ. अनुराधा कुलकर्णी   अरुणोदय होण्यापूर्वीच सेना उठले. आज महाराजांना सकाळी प्रवासाला निघायचे होते.

जीवनप्रवास सुखाचा

जीवन संगीत-सद्गुरू वामनराव पै आपण प्रबोधनाचा जो विषय घेतलेला आहे तो म्हणजे संचित ते नशीब. या विषयाशी संबंधित

कपटफुलांच्या रानगंधात

ऋतुराज-ऋतुजा केळकर एका तळ्यात होती बदके पिले सुरेख होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक...” दुरून येणारे आशा दीदींचे