राऊतांनी राजकारण सोडून मनोरंजक वेबसीरीजची पटकथा लिहावी

भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांची खोचक टिप्पणी


अजित पवार स्वगृही परतण्यासाठी इच्छुक होते असे बिनबुडाचे वक्तव्य करणारे संजय राऊत हे जाणूनबुजून एखाद्या रहस्यमय, मनोरंजक वेबसीरीजप्रमाणे चटपटीत पटकथा लिहून खोटी माहिती पसरवत आहेत. अजित पवार यांच्याबद्दल बेताल वक्तव्ये करणा-या राऊतांनी याबाबत ठोस पुरावे सादर करावेत असे खुले आव्हान भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी मंगळवारी दिले. खासदारकी भूषवत खोटे आरोप करण्याची सवय जडलेल्या राऊतांनी खासदारकी व राजकारण सोडून ओटीटीसाठी दिग्दर्शन, पटकथा लेखन करावे म्हणजे राऊतांचे दुकान चालेल अशी बोचरी टीकाही श्री. बन यांनी केली. अजितदादा स्वगृही परतण्यासाठी इच्छुक कधीच नव्हते. मात्र ते इतर घटकांना एनडीएमध्ये सामील करण्यासाठी प्रयत्नशील होते का हे देखील पहावे लागेल अशी पुस्ती श्री. बन यांनी जोडली.


राऊतांना जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी ऑपरेशन लोटस दिसते


अजित पवारांचा विमान अपघात हा ऑपरेशन लोटसचा भाग अशी हिणकस टीका भाजपावर करण्याआधी याबाबत ठोस पुरावे सादर करावेत. उगाच हवेत बाण सोडायचे काम करू नये असे म्हणत श्री. बन यांनी राऊतांवर कोरडे ओढले. भूकंप, त्सुनामि, पूर आला तरीही राऊत यांना यात ऑपरेशन लोटस दिसते हे हास्यास्पद असल्याचे ते म्हणाले.


अजित पवार यांच्या विमानाचा अपघातच


अजितदादांचा विमान अपघात हा अत्यंत दुर्दैवी होता. केंद्र सरकार आणि राज्य सरकार विमान अपघाताची चौकशी करत असून या चौकशीतून सत्य उलगडेल असे श्री. बन म्हणाले. शरद पवार यांनीही स्पष्ट केले की हा अपघात होता यामागे घातपात नाही. राऊत हे शरद पवार यांच्यापेक्षा बुद्धिमान आहेत का असा सवाल उपस्थित करून श्री. बन म्हणाले की उद्या कोर्टाचा निर्णय आल्यानंतर सुद्धा राऊत म्हणतील की कोर्ट विकले गेले आहे. राऊतांचा भारतीय न्यायव्यवस्थेवर विश्वास नसून त्यांनी पाकिस्तानच्या कोर्टात जावे असा खोचक सल्लाही दिला. या संपूर्ण प्रकरणात राऊत मात्र जाणीवपूर्वक खोटे नरेटिव्ह पसरवत आहेत. सातत्याने अजित दादांचा अपमान करणा-या राऊतांना अचानक अजितदादांप्रति प्रेम उफाळून आले आहे. मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे हीन काम संजय राऊत करत आहेत अशी प्रखर टीकाही त्यांनी केली.


राऊत एकाच पत्रकार परिषदेत परस्परविरोधी भूमिका मांडतात


दररोज पत्रकार परिषदेतून खोटे बोलायचे हा राऊतांचा व्यवसाय झाला आहे. भाजपाच्या भ्रष्टाचाराची फाईल अजितदादांकडे होती म्हणून म्हणे हे घडवून आणले असा बेताल आरोप राऊत करतात आणि त्याच पत्रकार परिषदेच्या शेवटी राऊत म्हणतात की पार्थ पवारांना भाजपा वाचवत आहे. एका पत्रकार परिषदेत तरी राऊतांनी एक भूमिका मांडावी. परस्परविरोधी वक्तव्ये करून राऊत हे स्वत:चेच वक्तव्य खोडून काढण्याचे काम करत असून भान सुटल्यासारखे असंबद्ध बरळत आहेत अशी घणाघाती टीकाही श्री. बन यांनी केली.



Comments
Add Comment

Gudi Padwa 2026 Muhurat: गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे?, जाणून घ्या मुहूर्त, पूजा आणि विधी

मुंबई: हिंदू धर्मात गुढीपाडवा सणाला अतिशय महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस चैत्र शुद्ध

महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..!, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

मुंबई: 'महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..' या आकांक्षेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

मिठी नदीच्या सफाईसाठी कुणी कंपनी पुढे येईना; स्थायी समितीत सविस्तर निवेदन करण्याचे अध्यक्षांचे प्रशासनाचे निर्देश

मुंबई: मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी नव्याने कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी मागवलेल्या निविदेला

मृणालताई गोरे विस्तारित उड्डाणपूलाच्या वाढीव खर्चावरून शंका; स्थायी समितीचे सदस्य करणार प्रत्यक्ष जागेची पाहणी

मुंबई: मृणालताई गोरे रेल्वे उड्डाणपुलाला जोडणाऱ्या राम मंदिर रोड ते गोरेगाव पश्चिम पर्यंतच्या रिलीफ रोड

सहली आडून कंत्राटदारांचे खिसे भरण्याचा घाट भाजपने उधळला

मुंबई: मुंबई महापालिकेच्या शाळांमधील मुलांची राणीबाग आणि बोरीवली नॅशनल पार्कमध्ये सहल आयोजित करण्याचा

अखेर महापौर चषक स्पर्धा होणार; सन २०२६-२७ मध्ये होणाऱ्या महापौर चषक क्रीडा स्पर्धांसाठी पाच कोटी रुपये निधीची तरतूद

मुंबई: डिजिटल युगात मुले भ्रमणध्वनीभोवती गुरफटली आहेत. मुले मैदानी खेळ विसरली आहेत. मुलांचा ‘स्क्रीन टाईम’ कमी