मुंबई महापालिकेने अखेर हिंमत दाखवली

मोहमद अली मार्गावरील अनधिकृत फेरीवाल्यांसह पदपथावरील वाढीव बांधकामांवर हातोडा


मुंबई : मुंबईतील अलेक भागांमधील फेरीवाल्यांसह अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आल्यानंतर हिंमत असेल तर भेंडीबाजार, मोहमद अली रोडवरील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करून दाखवा असे महापालिकेला सुनावणाऱ्या मुंबईकरांना आज महापालिकेने तिथेही कारवाई करून आम्ही मनात आणले तर कुठेही कारवाई करू शकतो हे दाखवून दिले आहे. मुंबई महापालिकेच्या बी विभागाच्यावतीने अत्यंत गजबजलेले व्यापारी रस्ते म्‍हणून ओळखल्‍या जाणा-या मोहम्मद अली मार्ग आणि इब्राहिम मर्चंट मार्ग परिसरातील पदपथांवरील अनधिकृत वाढीव बांधकामांवर सोमवारी २ फेब्रुवारी रोजी कारवाई करण्यात आली.


मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी यांच्या निर्देशानुसार तसेच परिमंडळ एकच्या उपायुक्त पदी नियुक्त झालेल्या चंदा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बी विभागाच्या सहायक आयुक्त योगेश देसाई यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.मोहम्मद अली मार्ग हा भेंडीबाजार, मशीद बंदर आणि भायखळा परिसराला जोडणारा प्रमुख रस्ता आहे. इब्राहिम मर्चंट मार्ग हा रस्ता नागदेवी आणि मांडवी परिसराच्या जवळ आहे. हे दोन्ही रस्ते व्यापारी दृष्टीने आणि रहदारीच्या दृष्टिने खूप महत्त्वाचे आहेत. या दोन्‍ही मार्गावरील पदपथांवर अनधिकृत वाढीव बांधकामे आढळून आली होती. तसेच, या परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांनीही दुकाने उभी केल्याचे निदर्शनास आले होते. यामुळे, वाहनचालकांना मार्गक्रमण करण्यास तसेच पादचाऱयांना पदपथांवर चालण्यास अडथळा निर्माण होत होता.


याच पार्श्वभूमीवर, मुंबई महानगरपालिकेच्या ‘बी’ प्रशासकीय विभागाकडून निष्कासनाची मोहीम हाती घेण्यात आली. या अंतर्गत, या परिसरातील अनधिकृत फेरीवाले, पदपथांवरील अनधिकृत वाढीव बांधकामांचे निष्कासन करण्यात आले. ७ अनधिकृत दुकाने हटविण्‍यात आली. तसेच, १२ ओटे, पत्र्याचे लोखंडी शेड, १० बोलार्ड, २ बेवारस वाहनांवर कारवाई करण्‍यात आली. अतिक्रमण निर्मूलनाची ०४ वाहने, ०२ जेसीबी आणि अन्य संयंत्राच्या सहाय्याने हटवण्यात आले. या कारवाईदरम्यान महानगरपालिकेचे ४० अधिकारी - कर्मचारी यांच्यासह पुरेसा पोलिस बंदोबस्त नेमण्यात आला होता. या कारवाईबद्दल स्थानिक नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. आगामी काळातही अनधिकृत / वाढीव बांधकामांविरोधात नियमितपणे कारवाई सुरूच राहील, असे महानगरपालिका प्रशासनाकडून कळविण्यात येत आहे.

Comments
Add Comment

मेट्रो- ४ मार्गिकेच्या कामाला गती

भांडुप येथे ३२५ मेट्रिक टनचे तीन स्टील स्पॅन्स यशस्वीरीत्या स्थापित मुंबई : महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून

महाराष्ट्रासाठी रेल्वेची २३ हजार कोटी रुपयांची विक्रमी अर्थसंकल्पीय तरतूद

मुंबई : रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय तरतुदीबाबत सोमवारी माहिती देताना

महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक येत्या ११ फेब्रुवारीला?

मुंबई : मुंबईचा महापौर कोण होणार? महापौरपदाची निवडणूक कधी होणार याबाबत उत्सुकता असताना ही निवडणूक येत्या ११

वाहन पार्किंगमुळे अग्निशमन वाहनांना होतो अडथळा

अनधिकृत वाहने उभी करणाऱ्यांविरोधात होणार एफआयआर मुंबई :  मुंबईतील नागरिकांच्या जीवित संरक्षणाची जबाबदारी पार

मनसेच्या अनेक उमेदवारांचा उबाठामुळे पराभव?

राज ठाकरेंसमोर मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून 'उबाठा'बाबत तक्रारींचा पाढा मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प येत्या २०ते २३ फेब्रुवारीला?

महापालिका प्रशासनाला नव्या स्थायी समिती अध्यक्षांची प्रतीक्षा मुंबई : मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७चा