महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक येत्या ११ फेब्रुवारीला?

मुंबई : मुंबईचा महापौर कोण होणार? महापौरपदाची निवडणूक कधी होणार याबाबत उत्सुकता असताना ही निवडणूक येत्या ११ फेब्रुवारी रोजी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासाठी येत्या शुक्रवारी उमेदवारी अर्ज सादर करण्याची मुदत असेल.


मुंबई महापालिकेच्या भाजप, शिवसेना आणि समाजवादी पक्षांच्या नगरसेवकांची कोकण भवनातील नोंदणी प्रक्रिया सोमवारी पार पडलेली असून पुढील नोंदणीची प्रक्रियाची महापालिका सचिव विभागात पार पडणार आहे. त्यामुळे येत्या मंगळवारी सचिव कार्यालयात नगरसेवकांची उर्वरीत नोंदणीची प्रक्रिया पार पडल्यानंतर मंगळवारी महापौर आणि उपमहापौर निवडणुकीचा कार्यक्रम प्रसिध्दीला दिला जाणार आहे. त्यानुसार निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांना या निवडणुकीचा कार्यक्रम त्यांच्या घरी पाठवला जाणार आहे. त्यामुळे बुधवारी महापौर आणि उपमहापौर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर येत्या ११ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. मात्र, आंगणेवाडीच्या जत्रेकरता बहुसंख्य नगरसेवक जात असल्यामुळे जर ११ तारखेला निवडणुकीची तारीख निश्चित झाल्यास येत्या शुक्रवारी ०६ फेब्रुवारी रोजी महापौर आणि उपमहापौर पदाच्या उमेदवारांचे अर्ज सादर करण्याची मुदत असेल. त्यामुळे महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज सादर झाल्यानंतर प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी १५ मिनिटे आधी अर्ज मागे घेण्याची संधी उमेदवाराला दिली जाणार आहे.


महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक ही आवाजी पध्दतीने हात उंचावून केली जाणार आहे. या महापौर आणि उपमहापौर पदासाठी पिठासीन अधिकारी म्हणून महापालिका आयुक्त भूषण गगराणी हे कामकाज सांभाळणार आहेत.


आंगणेवाडी जत्रेला नगरसेवक मुकणार?


महापौर आणि उपमहापौर पदासाठी येत्या ११ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार असल्याचा कार्यक्रम जाहीर झाल्यास सर्व पक्षांकडून आपल्या नगरसेवकांना मुंबई न सोडण्याचा व्हिप लागू होण्याची शक्यता आहे. परंतु आंगणेवाडीच्या जत्रेला बहुतांशी नगरसेवक जात असल्यामुळे त्यांना या व्हिपमुळे जाता येणार नाही. त्यामुळे या निवडणुकीसाठी जर पक्षाने अशाप्रकारचा व्हिप काढल्यास नवनिर्वाचित नगरसेवकांना आंगणेवाडीच्या जत्रेला मुकावे लागणार असल्याचे बोलले जात आहे.

Comments
Add Comment

BKC च्या ट्रॅफिकला ब्रेक! मेट्रो 2B चा महत्वाचा टप्पा पूर्ण

मुंबई : वांद्रे–कुर्ला संकुल आणि आसपासच्या भागातील वाहतूक ताण कमी करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले गेले आहे.

शाळांमध्ये झळकणार सरकारी योजनांचे फलक; शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

मुंबई : मुंबई विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या अनेक योजना असून त्यांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे

शासकीय कामकाजात ‘एआय’च्या प्रभावी वापरावर भर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे बाजारपेठेचे आणि रोजगाराचे स्वरूप झपाट्याने बदलत असून शासनाने सज्ज आणि सक्षम

मुंबईत दोन दिवसांची इसेक्टॉन २०२६ परिषद

मुंबई : भारतभरातील संजीवन शास्त्रज्ञ (परफ्यूजन शास्त्र) क्षेत्रातील तज्ञ, संशोधक आणि विद्यार्थी यांना एकत्र

राज्यात वर्षभरात दीड हजार ड्रग्ज तस्करांना बेड्या

मुंबई : राज्यात अमली पदार्थांच्या तस्करीचे जाळे दिवसेंदिवस अधिक विस्तारत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! जानेवारी महिन्याचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात

मुंबई: 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या लाभार्थी महिलांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. जानेवारी महिन्याचा