रानडे मार्गावर ठेच लागून ज्येष्ठ नागरिकावर जखमी होण्याची आली वेळ, कुटुंबाने महापालिकेकडे ही मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील पदपथ आणि खोदलेले रस्ते पुन्हा योग्यप्रकारे न बनवल्यास ते असमांतर बनवून बऱ्याचदा पादचाऱ्यांसाठी अडचणीच्या ठरतात. असाच प्रकार काही दिवसांपूर्वी दादर रानडे मार्गावर घडला आहे. युटीलिटी डकच्या मॅनहोल्सजवळ योग्यप्रकारे असमांतर रस्ता बनल्याने ज्येष्ठ नागरिक ठेच लागून पडले आणि गंभीर जखमी झाले. त्यामुळे या ज्येष्ठ नागरिकांच्या कुटुंबाने याप्रकरणी महापालिकेच्या जी उत्तर विभागाला निवेदन देत तीव्र नाराजी व्यक्त केली आणि या उपचारासाठी झालेल्या सर्व खर्चाची मागणी केली आहे.


दादर पश्चिम येथील रानडे मार्गावर शौकीन पान शॉपसमोरील डकच्या आसपास असमांतर रस्ता असल्याने त्याला पाय अडकून ७४ वर्षीय कांतीलाल देढीया हे जखमी झाले. त्यांच्या गुडघ्याला मार लागून हातही फॅक्चर झाला. महापालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे मॅनहोल्सच्या आसपासची जागा समांतर न करता असमांतर केल्यामुळे पायाला ठेच लागून कांतीलाल देढीया हे पडले आणि जखमी झाले. त्यानंतर तेथील फळ विक्रेत्यांना बाजुला करत त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया केली. त्यानंतर देढीया कुटुंबाने त्यांच्यावर भाटीया रुग्णालयात उपचार केले.


यानंतर कांतीलाल देढीया यांनी महापालिका जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त यांना निवेदन देत याबाबती तीव्र नाराजी व्यक्त केली. महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडला असून त्यांच्या उपचारासाठी झालेला खर्च हा महापालिकेने आपल्याला द्यावा अशी मागणी निरव देढीया यांनी महापालिकेकडे केली आहे.. खड्डे आणि खराब रस्त्यामुळे हा प्रकार घडला आहे. त्यामुळे औषध उपचाराचा खर्चाची मागण करतानाच ही दुर्घटना जिथे घडली त्या रानडे मार्गाच्या त्या भागाची सुधारणा करून पादचाऱ्यांना सुरळीत चालता येईल अशाप्रकारे रस्ता बनवून दिला जावा अशीही मागणी केली आहे. यावेळी निरव यांनी वडिलांच्या उपचारासाठी झालेली सर्व रुग्णालयाची बिले तसेच औषधांची बिलेही जोडली आहेत.


..................


दादर भागातील अनेक रस्ते तसेच पदपथ हे असमांतर असल्यामुळे बऱ्याचदा ज्येष्ठ नागरिकच नाही तर अनेक जण पडत असतात. त्यातील काहीजण जखमी झाले आहेत. देढीया प्रकरणात तर हे आता त्यांच्या कुटुंबाने तक्रार केली आणि उपचाराचा खर्च मागितला म्हणून हे समोर आले आहे. पण दादरमधील प्रत्येक रस्ते आणि पदपथ हे असमांतर असल्यामुळे महापालिका प्रशासनाने याची गंभीर दखल घेवून सर्वच पदपथ चालण्याजोगे करावेत आणि रस्तेही. - सुनील शाह, अध्यक्ष दादर व्यापारी संघ

Comments

Jayesh    February 5, 2026 07:08 AM

Why only medical bills. BMC should compensate for mental agony. Minimum demand rs 1 crore

Nandkumar Salvi    February 5, 2026 03:07 AM

This situation is all over Mumbai. There is no riding quantity on all roads and thus is because there is no engineering supervision on the works actually contractor’s unskilled labourers do the work. Lady Jamshetji Road from Sena Bhavan to Mahim is the goog example

ARVIND Shah    February 4, 2026 01:46 PM

BMC IS THE ONLY RESPONSIBLE.. ALSO NEED TO DO THE SERVEY of ATLEAST ALL THE FOOTPATH.. WE SHOULD HAVE ACTIVE WATTSAPP NUMBER OF BMC TO PUBLIC WHERE PUBLIC CAN POST COMPLAINT..

CA P C Gala    February 4, 2026 03:50 AM

If this has happened due to the uneven road or footpath then the BMC is liable to pay the damages and the medical expenses to the said senior citizen.

Add Comment

प्रवासी आरक्षण सेवा इतके तास बंद राहणार

मुंबई : मुंबई प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) दिनांक १२.०३.२०२६ रोजी २३.४५ वाजल्यापासून दिनांक १३.०३.२०२६ रोजी

एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! महामंडळात १७,७४२ पदांची होणार जंगी भरती

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे विधानपरिषदेत आश्वासन मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा (एसटी)

ड्रग्ज माफियांच्या मुसक्या आवळणार; साताऱ्यातील आरोपींवर 'मकोका' अंतर्गत कारवाईची गृहराज्यमंत्र्यांची परिषदेत घोषणा

मुंबई : सातारा जिल्ह्यातील सावरी आणि पाचुपतेवाडी येथे उघडकीस आलेल्या अमली पदार्थ निर्मितीच्या

चंद्रपुरात कोळसा प्रदूषणाला बसणार चाप; विधानपरिषदेत मंत्री शंभूराज देसाईंकडून 'चंद्रपूर मॉडेल'ची घोषणा!

मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील कोळसा खाणींमुळे होणारे प्रदूषण आणि वाहतुकीच्या समस्यांबाबत

'निडर नारी' वॉकेथॉन

मुंबई: एमओसी कॅन्सर केअर अँड रिसर्च सेंटर (एमओसी विलेपार्ले) ने त्यांच्या निडर नारी उपक्रमाचा भाग म्हणून १ मार्च

चैत्र चाहूल २०२६ चे 'ध्यास' आणि रंगकर्मी सन्मान

मुंबई : गेली दोन दशके गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर “चैत्र चाहूल” हा मराठी संस्कृती आणि मराठी भाषेला वाहिलेला