आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धेला काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. ७ फेब्रुवारी पासून या स्पर्धेला सुरुवात होणार असून आजपासून म्हणजेच २ फेब्रुवारी पासून सराव सामने होणार सुरु होणार आहेत. या सराव सामन्यात अफगाणिस्तानचा पहिला सामना स्कॉटलंडशी होणार आहे.
याच पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अधिकृतपणे भारत 'A' संघाची घोषणा केली आहे. १५ सदस्यांच्या संघात आयपीएलचे सर्व नवोदित खेळाडू आहेत. हे खेळाडू इतर खेळाडूंना सरावात मदत करतील. युवा आयुष बडोनी या टीमचं नेतृत्व करेल.
Presenting India A squad for the warm-up matches ahead of the ICC Men’s T20 World Cup 2026. India A will play two warm-up matches against USA and Namibia. 🙌 Note: Tilak Varma will feature in one warm-up match before joining #TeamIndia for the #T20WorldCup pic.twitter.com/LIVpMvI6v6
— BCCI (@BCCI) February 2, 2026
तसेच तिलक वर्मा याचंही या टीममध्ये कमबॅक झालं आहे. तिलकला रणजी ट्रॉफी स्पर्धेदरम्यान झालेल्या दुखापतीमुळे न्यूझीलंड विरूद्धच्या टी २० मालिकेला मुकावं लागलं होतं. मात्र आता तिलकची वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या मुख्य संघात निवड करण्यात आली आहे.
वर्ल्ड कप स्पर्धेतील सराव सामन्यांसाठी इंडिया ए टीम :
आयुष बडोनी (कर्णधार), तिलक वर्मा, रियान पराग, रवी बिश्नोई, नमन धीर, आशुतोष शर्मा, प्रियांश आर्या, एन जगदीशन (विकेटकीपर), उर्विल पटेल (विकेटकीपर), मानव सुथार, अशोक शर्मा, गुरजपनीत सिंह, विपरज निगम, खलील अहमद आणि मयंक यादव.






