Gold-Silver Rate: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोनं- चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या नवे दर

मुंबई: रविवार १ फेब्रुवारी रोजी भारताचा अर्थसंकल्प जाहीर झाला. यावेळी सोने आणि चांदीबाबत कोणतीही मोठी थेट घोषणा करण्यात आली नसली तरीही; अर्थसंकल्पानंतर कमोडिटी बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे.


सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण सुरूच:


आज, २ फेब्रुवारी रोजी सकाळी राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम साठी १ लाख ६० हजार ७२० रुपयांवर आला. तर मुंबईत हा भाव प्रति १० ग्रॅम १ लाख ६० हजार ५७० रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या तीन दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण (Gold Silver Price Crash) सुरूच आहे.


सोन्याप्रमाणेच चांदीच्या घसरणीचा कलही कायम आहे. २ फेब्रुवारी रोजी सकाळी चांदीची किंमत प्रति किलोग्रॅम ३,४९,९०० रुपयांपर्यंत घसरली. एका आठवड्यात किंमत १५ हजार रुपयांनी वाढली आहे.


सोन्याचे दर :


मुंबई, चेन्नई आणि कोलकात्यात सोन्याचे दर: सध्या मुंबई, चेन्नई आणि कोलकाता येथे २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम १,४७,१९० रुपये आहे, तर २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅमसाठी १,६०,५७० रुपये इतका आहे.

Comments
Add Comment

Gwalior Accident : मध्य प्रदेशात भीषण अपघात; मजुरांच्या वाहनाला ट्रकची धडक, 8 जणांचा मृत्यू

Pritesh Walia : भारतीय वंशाचे जॅझ संगीतकार प्रितेश वालिया अमेरिकेत ICEच्या ताब्यातून जामिनावर मुक्त

नवी दिल्ली :  भारतीय वंशाचे जॅझ संगीतकार प्रितेश वालिया यांची अमेरिकेत ICEच्या ताब्यात तब्बल 14 दिवस राहिल्यानंतर

Jharkhand Students Protest : 24 दिवसांच्या आंदोलनानंतर झारखंड सरकारचा मोठा निर्णय; JSSC-CGL परीक्षा रद्द

झारखंड : झारखंडमध्ये तब्बल 24 दिवसांपासून सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. मुख्यमंत्री

Plastic Waste : भारतापुढे दररोज १९ हजार टन प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे आव्हान

नवी दिल्ली : दुधाची पाकिटे, चिप्सची वेष्टणे आणि ऑनलाइन खरेदीचे पॅकेजिंग यामुळे देशात दररोज सुमारे १९ हजार टन

UP Crime News : प्रेयसीच्या वाढदिवसाचा केक कापला अन् प्रियकराने मित्रांसोबत मिळून रचला भयानक खेळ; उत्तर प्रदेश हादरले!

उत्तर प्रदेश : विश्वासाला काळिमा फासणारी आणि मन सुन्न करणारी एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर

Robot Waiter Murthal : मुरथलच्या धाब्यावर रोबोट वेटरची एन्ट्री! हरियाणातील 'रेशम धाब्या'चा भन्नाट प्रयोग, व्हिडिओ व्हायरल

मुरथल : हरियाणातील मुरथल हे ठिकाण आपल्या चविष्ट आणि गरमागरम पराठ्यांसाठी तसेच पारंपरिक चवीसाठी देशभरात