बुलढाण्यात बिबट्याची दहशत.. घराबाहेर आला अन् थेट व्हायरल व्हिडीओने खळबळ

बुलढाणा : गेले काही महिने बिबट्याने महाराष्ट्रभर उच्छाद मांडला आहे. शांततेच्या ठिकाणी दिसणार बिबट्या आता सर्रास वर्दळीच्या ठिकाणीही दिसून येत आहे. बिबट्या आपल्याला अंगणात, शेतात, गोठ्यात दर्शन देतोय एकूणच बिबटयाचा वावर काही थांबण्याचे नाव घेत नाही आहे.



बुलढाण्यात वर्दळीच्या ठिकाणी बिबट्याचा वावर


बुलढाण्यामधील मिर्झा नगर येथील रहिवासी आणि एसटी मेकॅनिक गुलाम हुसेन यांच्या घरासमोर शनिवारी रात्री ९.३० सुमारास हा थरार घडला आहे. गुलाल हुसेन यांचा मुलगा घराबाहेर असताना त्याला घराच्या अगदी समोर बिबट्या उभा असलेला दिसला. रात्रीची वेळ असूनही परिसरात काही प्रमाणात वर्दळ असताना बिबट्या इतक्या धीटपणे मानवी वस्तीत शिरल्याने आश्चर्य आणि भीती व्यक्त केली जात आहे.


मिळालेल्या माहितीनुसार मिर्झानगरमध्ये कायम बिबट्याचा वावर हा आढळून आला आहे. त्यामुळे लोकांच्या मनात बिबट्याची भीती ही कायम आहे. या भागात असलेल्या झाडाझुडपांमुळे बिबट्यानं राहण्यास जागा उपलब्ध आहे त्यामुळे ते जवळच असलेल्या मानवी वस्तीत सहज शिरकावं करत आहेत. वनविभागाने गस्त घालण्याचे आश्वासन दिले असतांनाही ठोस पाऊले उचलली गेली नसल्याने बिबट्यांचा वावर वाढला आहे.


 


नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण


मिर्झा नगर हा भाग दाटीवाटीचा आहे. रात्री पर्यंत लोकांची रस्त्यावर वर्दळ ही चालू असते. इतक्या दाटीवाटीच्या ठिकाणीही बिबट्या सहज येऊ शकल्याने दुर्घटना नाकारता येत नाही,त्यामुळे बिबट्याचा कायमस्वपरुपी बंदोबस्त करावा शी मागणी नागरिक करत आहेत.

Comments
Add Comment

National Teacher Award 2026 : महाराष्ट्रातील ४ शिक्षकांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पुरस्कार वितरण

मुंबई : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी उल्लेखनीय कामगिरी

Jalgaon : सुप्रीम कॉलनीतील गोमांस प्रकरणानंतर महापालिकेची धडक कारवाई, अनधिकृत गोडाऊन जमीनदोस्त

Jalgaon : जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात गोमांस आढळल्याच्या घटनेनंतर जळगाव शहर महानगरपालिकेने (Jalgaon City Municipal Corporation)

CM Devendra Fadnavis : नवी मुंबई पोलिसांचे अत्याधुनिक ‘प्रहारी’ सीसीटीव्ही कमांड सेंटर कार्यान्वित; मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन

ठाणे : नवी मुंबईकरांच्या सुरक्षिततेत अधिक भर घालत गुन्हेगारीवर नियंत्रण आणि अत्याधुनिक देखरेखीसाठी सज्ज

CM Devendra Fadnavis : नवी मुंबईत 'कॅम्पस कनेक्ट' मोहिमेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ, विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर राहून राष्ट्रभक्तीकडे वळण्याचे आवाहन

ठाणे : व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्यविकास आणि राष्ट्रउभारणीकडे वळावे, असे आवाहन

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्रात टाटा स्ट्राइव्हच्या माध्यमातून कौशल्य विकासाला चालना मिळणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : टाटा कम्युनिटी इनिशिएटिव्हज ट्रस्टच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या टाटा स्ट्राइव्हने महाराष्ट्रातील

Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील खड्डे बुजवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर; प्री-कास्ट पॅचने दुरुस्तीला सुरुवात

पुणे : चाकण औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या समस्येवर आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने