T.V मुळे तुमचाही विज बिल येतंय जास्त; मग जाणुन घ्या या गोष्टी

आजच्या स्मार्ट होममध्ये टीव्ही हा सर्वाधिक वापरला जाणारा इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस ठरला आहे. दिवसातील अनेक तास आपण टीव्हीवर मालिका, चित्रपट, रिअ‍ॅलिटी शो, OTT कंटेंट किंवा गेमिंगचा आनंद घेतो. मात्र, हे करत असताना टीव्ही किती वीज वापरतो आणि त्याचा थेट परिणाम वीज बिलावर होतो, याकडे अनेकांचे लक्ष जात नाही. प्रत्यक्षात, काही लहान पण महत्त्वाच्या सेटिंग बदलून तुम्ही टीव्हीमुळे वाढणारे वीज बिल लक्षणीयरीत्या कमी करू शकता.


टीव्हीमध्ये सर्वाधिक वीज वापर ब्राइटनेस आणि बॅकलाइटमुळे होतो. फॅक्टरी सेटिंग्जमध्ये हे दोन्ही पर्याय जास्त प्रमाणात ठेवलेले असतात. त्यामुळे पिक्चर सेटिंगमध्ये जाऊन ब्राइटनेस आणि बॅकलाइट ६० ते ७० टक्क्यांपर्यंत कमी करा. खोलीतील प्रकाशानुसार हे अॅडजस्ट केल्यास वीज बचत होईलच, शिवाय डोळ्यांवरील ताणही कमी होईल. अनेकजण टीव्ही कायम Vivid किंवा Dynamic Mode वर ठेवतात, जो अधिक वीज खर्च करणारा असतो. दैनंदिन वापरासाठी Standard किंवा Eco Mode निवडणे फायदेशीर ठरते. Eco Mode आपोआप ब्राइटनेस आणि पॉवर युसेज नियंत्रित करतो, ज्यामुळे वीजेचा खर्च कमी होतो.


कधी कधी टीव्ही सुरू असतानाच आपल्याला झोप लागते किंवा आपण खोलीबाहेर जातो. अशावेळी Auto Power Off आणि Sleep Timer ही फीचर्स उपयुक्त ठरतात. १०–१५ मिनिटे कोणतीही हालचाल नसल्यास टीव्ही आपोआप बंद होईल, अशी सेटिंग केल्यास अनावश्यक वीज वाया जाणार नाही. टीव्ही बंद केल्यानंतरही प्लग इन ठेवला तर स्टँडबाय मोडमध्ये तो वीज वापरत राहतो. त्यामुळे वापर नसताना टीव्ही पूर्णपणे स्विच ऑफ करणे किंवा स्मार्ट पॉवर स्ट्रिपचा वापर करणे अधिक योग्य आहे.


तसेच Smart TV मधील Bluetooth, Wi-Fi Scan, Voice Assistant यांसारखी अनावश्यक फीचर्स आणि अॅप्स सतत ऑन राहिल्यास बॅकग्राउंडमध्ये वीज खर्च होत राहते. गरज नसल्यास ही फीचर्स बंद ठेवल्यास टीव्ही अधिक ऊर्जा-कार्यक्षम पद्धतीने काम करेल आणि तुमचे वीज बिलही नियंत्रणात राहील.

Comments
Add Comment

Purnimecha Phera : रहस्यमय 'पौर्णिमेचा फेरा सिझन ३’ वेबसीरीज प्रेक्षकांच्या भेटीला, सोशल मीडियावर धूमाकूळ

मुंबई : मराठी सिनेविश्वात आपल्या आगळ्यावेगळ्या कथानकाने आणि सस्पेन्स-थ्रिलरच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर

Pod Taxi : लवकरच मुंबईत धावणार भारतातील पहिली 'पॉड टॅक्सी'

मुंबई : मुंबई शहरं हे कधीच विश्रांती घेत नाही इथे २४ तास सतत वर्दळ पाहायला मिळते असते. मुंबईत लोकांची गर्दी

Rashmika-Vijay Reception : कुर्गमध्ये पार पडला रश्मिका-विजयचा दुसरा ग्रँड रिसेप्शन सोहळा, रश्मिकाला मिळालं 'हे' कोट्यवधींच सरप्राइज

साऊथबरोबरच संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेली जोडी म्हणजेच अभिनेता विजय देवरकोंडा आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदाना

Lata Deenanath Mangeshkar Award : यंदा 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार'ने कैलाश सत्यार्थी सन्मानित

लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार २०२६ यंदा नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांना जाहीर करण्यात आला आहे.

Bigg Boss Marathi Ticket To Finale: अखेर 'ही' सदस्य ठरली पहिली फायनलिस्ट, 'तिकीट टू फिनाले'च्या टास्कमध्ये मारली बाजी

मुंबई : बिग बॉस मराठी ( Bigg Boss Marathi ) सीझन ६ आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचले असून अनेक टास्क आणि आव्हानं पार करुन घरातील ७

Manipur Violence : मणिपूरमध्ये आंदोलनं चिघळलं, बॉम्बहल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, इंटरनेट बंदीसह संचारबंदी लागू

मणिपूर येथे पुन्हा एकदा आंदोलन झालं आहे. सोमवारी मध्यरात्री विष्णुपूर जिल्ह्यात एका घरावर झालेल्या