Bigg Boss Marathi Ticket To Finale: अखेर 'ही' सदस्य ठरली पहिली फायनलिस्ट, 'तिकीट टू फिनाले'च्या टास्कमध्ये मारली बाजी

मुंबई : बिग बॉस मराठी ( Bigg Boss Marathi ) सीझन ६ आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचले असून अनेक टास्क आणि आव्हानं पार करुन घरातील ७ सदस्य फिनालेच्या दिशेनं वाटचाल करत आहेत. यामध्ये गेल्याच आठवड्यात सागर कारंडे (Sagar Karande) घराबाहेर पडला. त्यामुळे आता घरात ७ सदस्य उरले असून
राकेश बापट, विशाल कोटीयान, दिपाली सय्यद, तन्वी कोलते, अनुश्री माने, रेवा कौरासे, राखी सावंत यांचा समावेश आहे. त्यामुळे घरात आता फिनालेसाठी चांगलीच चुरस पाहायला मिळतेय.


बिग बॉसनं 'तिकीट टू फिनाले'साठी कोण पात्र, कोण अपात्र हे ठरवण्यासाठी एक भन्नाट टास्क आखला आणि घरातल्यांनाच 'तिकीट टू फिनाले' टास्क कोण खेळणार? याचा निर्णय घ्यायला लावला. त्यानुसार, मंगळवारी घरात 'तिकीट टू फिनाले'चा धमाकेदार टास्क पार पडला. या टास्कमध्ये घरातल्या एका सदस्यानं थेट 'तिकीट टू फिनाले' पटकावलं असून 'बिग बॉस मराठी सीझन ६'च्या महाअंतिम फेरीत आपलं स्थान पक्कं केलं आहे.


'बिग बॉस मराठी' आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलाय, खेळाचा थरार आता इतका वाढलाय की, आता टॉप ७ स्पर्धकांमध्ये करो या मरो अशी परिस्थिती निर्माण झालीय. 'तिकीट टू फिनाले'साठी कोण पात्र, कोण अपात्र ठरवण्यासाठी बिग बॉसनी एक टास्क घेतलेला. त्या टास्कमध्ये राकेश बापट, तन्वी कोलते आणि अनुश्री माने 'तिकीट टू फिनाले'चा टास्क खेळण्यासाठी पात्र ठरल्या. त्यानंतर घरात या 'तिकीट टू फिनाले'साठीचा टास्क पार पडला. हा टास्क तसा फार सोपा नव्हता. पण, तरीसुद्धा तिनही स्पर्धकांनी हा टास्क पूर्ण केला.


बुद्धीचा कस आणि कोळ्याचं जाळं अन् त्या पलिकडे 'तिकीट टू फिनाले' ग्रँड फिनालेमध्ये सर्वात आधी आपलं स्थान पक्क करण्याची संधी म्हणजे, 'तिकीट टू फिनाले'साठी स्पर्धकांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली. पण, अखेर एका स्पर्धकानं अंतिम फेरीत आपलं स्थान पक्कं केलं. बिग बॉसचा टास्क अत्यंत कठीण होता. या टास्कमध्ये वेळ आणि बुद्धी यांचा अचूक मेळ स्पर्धकांना साधावा लागणार होता. या टास्कमध्ये राकेश बापट, तन्वी कोल्ते आणि अनुश्री माने यांच्यात लढत पाहायला मिळाली. स्पर्धकांसमोर 'कोळ्याचं महाकाय जाळं' उभं करण्यात आलं होतं. तर, जाळ्याच्या एका बाजूला ७ प्रश्न आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला त्या ७ प्रश्नांची उत्तरं ठेवलेली, कोळ्याचं जाळं भेदून स्पर्धकांना अचूक उत्तरं शोधून ती त्या प्रश्नांसमोर लावायची होती.





तिन्ही स्पर्धकांनी हा टास्क पूर्ण केला असून सर्वात आधी राकेश बापटनं २१ मिनिटांच्या आसपास वेळ घेतला. त्यानंतर आलेल्या तन्वी कोलतेनं साडेसहा मिनिटांच्या आसपास वेळ घेतला. तर, नंतर आलेल्या अनुश्री मानेनं ९ मिनिटांच्या आसपास वेळ घेतला. त्यामुळे सर्वात कमी वेळ घेऊन तन्वीनं स्वतःला सिद्ध केलं आणि 'तिकीट टू फिनाले' पटकावलं.


बिग बॉस सीझन ६चं सर्वात पहिलं 'तिकीट टू फिनाले' तन्वी कोलतेनं पटकावल्यामुळे ती आता तेराव्या आणि चौदाव्या आठवड्यासाठी सेफ झाली आहे. तर, रेवा कौरासे या आठवड्याची कॅप्टन असल्यामुळे सेफ आहे. या दोघींव्यतिरिक्त उर्वरित सर्व सदस्य या आठवड्यात नॉमिनेट झालेत. त्यामुळे ट्रॉफिच्या एवढ्या जवळ आल्यानंतर आता या आठवड्यात कोण घराबाहेर जाणार? आणि यंदा बिग बॉस मराठीचा विजता कोण ठरणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली आहे.

Comments
Add Comment

Madhuri Dixit : लवकरच...! सोनी मराठी वाहिनीवरील 'कोण होणार करोडपती' चे सूत्रसंचालन करणार अभिनेत्री माधुरी दीक्षित

मुंबई : मराठी मनोरंजनविश्वात एका नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. सोनी मराठी वाहिनी आणि Sony LIV प्रेक्षकांचा ज्ञानावर

Sara Tendulkar : मला माझ्या होणाऱ्या नवऱ्यामध्ये हवाय असा गुण... सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकरचा मोठा खुलासा!

भारतीय क्रिकेटचा देव मानले जाणारे सचिन तेंडुलकर यांची लाडकी लेक सारा तेंडुलकर ही नेहमीच चाहत्यांच्या आणि सोशल

Govinda On Salman Khan: 'पाटर्नर, तू हिरोसारखा दिसत नाहीस...' गोविंदाचं 'ते' वक्तव्य अन् सलमान खानचं नशीब बदललं

बॉलिवूड अभिनेता गोविंदा आपल्या खासगी आयुष्याबद्दल नेहमीच चर्चेत असतो. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने

Dil Chahta Hai completes 25 years : तरुणाईला वेड लावणारा तो एव्हरग्रीन सिनेमा आणि आजही कायम असलेली 'त्या' गाण्याची क्रेझ!

बॉलीवूडमध्ये काही चित्रपट असे असतात, जे केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न राहता प्रेक्षकांच्या आयुष्याचा आणि

AR Rahman Son Accident : प्रसिध्द संगीतकार ए.आर. रहमान यांच्या मुलाचा कार अपघात; थोडक्यात बचावला आमीन

चेन्नई : प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमान (A R Rahman) यांचा मुलगा आणि गायक ए.आर. आमीन (A R Ameen) याचा कार अपघात झाल्याची धक्कादायक

Dashmi Movie Poster Launch : अन्यायाविरुद्ध उठणार ‘दशमी’ची गर्जना! रहस्य, संघर्ष आणि स्त्रीशक्तीची कहाणी घेऊन मराठी चित्रपटाची दमदार एंट्री

मुंबई : भारतीय संस्कृतीत विजयादशमी म्हणजे केवळ सण नाही, तर अन्यायावर न्यायाचा, अधर्मावर धर्माचा आणि दुष्ट