Purnimecha Phera : रहस्यमय 'पौर्णिमेचा फेरा सिझन ३’ वेबसीरीज प्रेक्षकांच्या भेटीला, सोशल मीडियावर धूमाकूळ

मुंबई : मराठी सिनेविश्वात आपल्या आगळ्यावेगळ्या कथानकाने आणि सस्पेन्स-थ्रिलरच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी वेब सिरीज 'पौर्णिमेचा फेरा' आता एका नव्या वळणावर येऊन पोहोचली आहे. पहिल्या दोन सीझनला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर आणि प्रेक्षकांच्या आग्रहाखातर शुभम प्रोडक्शन फिल्म्स घेऊन येत आहे 'पौर्णिमेचा फेरा सीझन ३'. शुभम प्रोडक्शन फिल्म्स या यूट्यूब चॅनेलवर या वेबसिरीजचा तिसरा भाग नुकताच प्रदर्शित झाला असून या वेबसिरीजला सोशल मीडियावर प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

थरार, उत्कंठा, शोध या नजरबंदीच्या खेळातून अनुत्तरीत प्रश्नांचा शोध घेणारी ‘पौर्णिमेचा फेरा’ या मराठी वेब सिरीजचा तिसरा भाग ‘शुभम प्रोडक्शन फिल्म्स’ या चॅनेलवर प्रदर्शित करण्यात आला आहे. हास्यजत्रा कार्यक्रमातले विनोदवीर निखील बने आणि मंदार मांडवकर आपल्याला या वेब सिरीजमध्ये वेगळ्याच भूमिकेत पहायला मिळतात. त्यांना सिद्धेश नागवेकर या नव्या दमाच्या कलाकारासोबत, संदीप रेडकर, दीपा माळकर, प्राची केळुस्कर, निकिता बंदावणे, चंदन जमदाडे, संजय वैद्य, स्नेहल आयरे या सगळ्यांची साथ लाभली आहे. सगळ्या कलाकारांनी त्यांच्या भूमिका चांगल्या केल्या आहेत. ही वेब सिरीज बघताना प्रत्येकजण त्यांच्या भूमिकेत चपखल बसलेला असल्याचं जाणवतं.

या वेब सिरीजची निर्मिती पायल गणेश कदम यांनी केली असून, दिग्दर्शनाची धुरा सचिन गोताड यांनी सांभाळली आहे. कथेचे संवाद आणि पटकथा संदेश लोकेगावकर यांची असून, छायाचित्रण कुणाल महादेव परडकर यांनी केले आहे. कार्यकारी निर्माता म्हणून हेमंत दिनकर पांचाळ लाभले आहेत. या सीरीजचे संकलन शिलंत कदम यांनी केले आहे. अनिरुद्ध निमकर याने संगीत दिले आहे.

'पौर्णिमेचा फेरा' या वेब सिरीजची मांडणी इतर कथांपेक्षा वेगळी असल्यानेच ती अल्पावधीत लोकप्रिय झाली. पहिल्या सीझनमध्ये ३ मित्रांच्या गावी जाण्यापासून सुरू झालेला हा प्रवास एका खोल रहस्यात जाऊन अडकला. एका मित्राला वाचवण्याच्या प्रयत्नात सुरू झालेला हा खेळ दुसऱ्या सीझनमध्ये अधिक गडद आणि थरारक झाला. आता, जिथे दुसरा सीझन संपला, तिथूनच एका मोठ्या रहस्याचा उलगडा करण्यासाठी सीझन ३ सज्ज झाला आहे. या वेबसीरीजनं सोशल मीडियावर चंगलाच धूमाकूळ घातला आहे.
Comments
Add Comment

Madhuri Dixit : लवकरच...! सोनी मराठी वाहिनीवरील 'कोण होणार करोडपती' चे सूत्रसंचालन करणार अभिनेत्री माधुरी दीक्षित

मुंबई : मराठी मनोरंजनविश्वात एका नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. सोनी मराठी वाहिनी आणि Sony LIV प्रेक्षकांचा ज्ञानावर

Sara Tendulkar : मला माझ्या होणाऱ्या नवऱ्यामध्ये हवाय असा गुण... सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकरचा मोठा खुलासा!

भारतीय क्रिकेटचा देव मानले जाणारे सचिन तेंडुलकर यांची लाडकी लेक सारा तेंडुलकर ही नेहमीच चाहत्यांच्या आणि सोशल

Govinda On Salman Khan: 'पाटर्नर, तू हिरोसारखा दिसत नाहीस...' गोविंदाचं 'ते' वक्तव्य अन् सलमान खानचं नशीब बदललं

बॉलिवूड अभिनेता गोविंदा आपल्या खासगी आयुष्याबद्दल नेहमीच चर्चेत असतो. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने

Dil Chahta Hai completes 25 years : तरुणाईला वेड लावणारा तो एव्हरग्रीन सिनेमा आणि आजही कायम असलेली 'त्या' गाण्याची क्रेझ!

बॉलीवूडमध्ये काही चित्रपट असे असतात, जे केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न राहता प्रेक्षकांच्या आयुष्याचा आणि

AR Rahman Son Accident : प्रसिध्द संगीतकार ए.आर. रहमान यांच्या मुलाचा कार अपघात; थोडक्यात बचावला आमीन

चेन्नई : प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमान (A R Rahman) यांचा मुलगा आणि गायक ए.आर. आमीन (A R Ameen) याचा कार अपघात झाल्याची धक्कादायक

Dashmi Movie Poster Launch : अन्यायाविरुद्ध उठणार ‘दशमी’ची गर्जना! रहस्य, संघर्ष आणि स्त्रीशक्तीची कहाणी घेऊन मराठी चित्रपटाची दमदार एंट्री

मुंबई : भारतीय संस्कृतीत विजयादशमी म्हणजे केवळ सण नाही, तर अन्यायावर न्यायाचा, अधर्मावर धर्माचा आणि दुष्ट