कसे असेल यंदाचे बजेट ? काय आहे पार्ट बी चे महत्त्व ?

नवी दिल्ली : यंदाचे म्हणजेच आर्थिक वर्ष २०२६ - २७ चे बजेट (अर्थसंकल्प) रविवार १ फेब्रुवारी २०२६ रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण लोकसभेत सादर करणार आहेत. हे बजेट देशाच्या आतापर्यंत सादर झालेल्या बजेटपेक्षा वेगळे असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दरवर्षीप्रमाणे यंदाच्या बजेटमध्येही पार्ट ए आणि पार्ट बी असे दोन भाग असतील. पण पार्ट बी हा अतिशय महत्त्वाचा भाग असेल.


दरवर्षी बजेटच्या निमित्ताने अर्थमंत्री जे भाषण करतात त्यात पार्ट ए मध्ये धोरणात्मक मुद्दे आणि महत्त्वाची आकडेवारी यांचा समावेश असतो. तर पार्ट बी हा प्रामुख्याने करविषयक घोषणांपुरता मर्यादीत असतो. यावेळी मात्र बजेटच्या भाषणातील पार्ट बी जास्त महत्त्वाचा असल्याचे समजते. यंदा पार्ट बी मध्ये करविषयक घोषणांसह दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टे आणि धोरणात्मक दिशा यांचीही सविस्तर मांडणी असेल. पार्ट बी मधून देशाची आर्थिक विचारधारा, देशाचे आर्थिक प्राधान्यक्रम, देशाचा दीर्घकालीन आर्थिक दृष्टीकोन याबाबत सविस्तर माहिती दिली जाणार असल्याचे समजते. भारताच्या देशांतर्गत क्षमतांना आंतरराष्ट्रीय पातळीवर कसे सादर करायचे याचा कृती आराखडा यंदाच्या बजेटमधील पार्ट बी मध्ये असेल, असे समजते.


या वर्षी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण बजेट सादर करतील त्यावेळी जगातील अनेकांचे लक्ष हे पार्ट बी कडे असेल. जगभरातील अर्थतज्ज्ञ, धोरणकर्ते आणि जागतिक संस्थांसाठीही भारताच्या यंदाच्या बजेटमधील पार्ट बी महत्त्वाचा असल्याचे समजते. यंदाच्या बजेटमधील पार्ट बी मधून मोदी सरकार देशाच्या पुढील काही दशकांच्या अर्थकारणाचा वेध घेणार असल्याचे वृत्त आहे.


बजेटचा पार्ट ए : अर्थव्यवस्थेची दशा आणि दिशा, विकासाची रणनिती, कृषी, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास, MSME, विविध योजनांसाठी खर्चाचे नियोजन,


बजेटचा पार्ट बी : इनकम टॅक्स, कस्टम आणि ट्रेड टॅरिफ, आत्मनिर्भर भारत धोरण, देशांतर्गत उत्पादकतेला चालना देणारे धोरण, निर्यातवाढीसाठी करसवलती, करविषयक घोषणा


याआधी २०२५ - २६ च्या बजेटमध्ये पार्ट ए अंतर्गत कृषी, MSME, गुंतवणूक, निर्यात, आर्थिक क्षेत्रातील सुधारणा, वित्तीय तूट हे विषय होते. तर पार्ट बी अंतर्गत इनकम टॅक्स रिटर्न, TDS/TCS मधील बदल, रिटर्न भरण्यात सुलभता आणि बेसिक कस्टम ड्युटीत सूट यांचा समावेश होता. यावेळी मात्र बजेटच्या पार्ट बी चा अधिक व्यापक आणि धोरणात्मक असण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Ashok Kharat : 18 गंभीर गुन्ह्यांच्या फेऱ्यात अशोक खरात, 31 ऑगस्टला पुढील सुनावणी

Ashok Kharat : दैवी शक्ती, मंत्र-तंत्र आणि भविष्याची भीती दाखवून महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या

Mumbai Update : मुंबईत मलेरियाचा वाढता धोका; 3,177 रुग्णांची नोंद, डेंग्यू-लेप्टोमध्ये मात्र घट

Mumbai : मुंबईत पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने उपाययोजना तीव्र

Mumbai Navy Nagar News : नौदल जवान, पत्नी अन् दोन चिमुकल्यांचा संशयास्पद मृत्यू; मुंबईतील 'नेव्ही नगर'मध्ये धक्कादायक घटना

राजस्थान : राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यातील ककराना गावातील रहिवासी आणि भारतीय नौदलात कार्यरत असलेले जवान

Jalgaon News : ग्रामसभेत गोंधळ, शिवीगाळ अन्...; ग्रामसेवकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Jalgaon Crime News: जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील शिवरे येथे एक ह्रदयद्रावक घटना घडली आहे. ग्रामसभेत (Gram Sabha) झालेला

Maha Walkathon 2026 : महा वॉकेथॉन 2026 मध्ये अभिनेता संजय दत्त यांचा सहभाग; 36 जिल्ह्यांत ‘वॉक फॉर वॉटर’

मुंबई : माती आणि जलसंधारणाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण

Rishabh Pant New Record : षटकारांचं शतक तेही सर्वात जलद! रिषभ पंतने रचला इतिहास; अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच भारतीय

गॉल : भारताचा स्टार विकेटकीपर-बॅटर रिषभ पंतने (Rishabh Pant) श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात इतिहास