महापौरांना ७५ हजार रुपये वाहन प्रतिपूर्ती भत्ता

उपमहापौरांना ६५ हजार, तर विरोधी पक्षनेत्याला ५० हजार


विरार : वसई-विरार महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांना नियमानुसार विविध सोयीसुविधा पुरविल्या जाणार आहेत. महापौर यांना वाहन प्रतिपूर्ती भत्ता म्हणून दर महिन्याला ७५ हजार रुपये दिल्या जातील. तसेच उपमहापौर यांना ६५ हजार, स्थायी समिती सभापती ५५ हजार, विरोधी पक्षनेता आणि सभागृह नेत्याला ५० हजार, तर इतर सर्व सभापतींना वाहन प्रतिपूर्ती भत्ता म्हणून प्रत्येक महिन्याला ४५ हजार रुपये दिले जाणार आहेत.


स्थानिक स्वराज्य सस्थांमध्ये ग्रामपंचायत सरपंचांपासून, नगराध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष, महापौर अशा सर्व लोकप्रतिनिधींना त्यांच्या अडीच किंवा पाच वर्षांच्या कालावधीत मानधन तसेच विविध सोयी सुविधा देण्यात येतात. अनेक शहरांमध्ये महापौर,उपमहापौर, स्थायी समिती सभापती, विरोधी पक्षनेता यांच्यासाठी शासकीय निवासस्थान देखील आहेत. वसई-विरारमध्ये पदाधिकाऱ्यांसाठी अद्याप शासकीय निवासस्थान उपलब्ध नाही. या ठिकाणी प्रशस्त अशी नवीन प्रशासकीय इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीत गेल्या दोन वर्षांपासून प्रशासनाचे कामकाज सुरू आहे. मात्र नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना या इमारतीत बसण्याची संधी ३ फेब्रुवारीपासून मिळणार आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाने सर्व पदाधिकाऱ्यांचे दालन सज्ज केले आहेत. दरम्यान, वसई-विरार महापालिकेत २०१६ पूर्वी महापौर यांना ४५ हजार रुपये वाहन प्रतिपूर्ती भत्ता देण्यात येत होता. तर उपमहापौर, स्थायी समिती सभापती यांना ४० हजार आणि विरोधी पक्षनेता यांना ३७ हजार अशा प्रकारे वाहन भत्ता देण्यात येत होता. २०१६ पासून प्रतिपूर्ती भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार आता ९ प्रभाग समिती सभापतीसह, महिला व बालकल्याण समिती सभापती, वैद्यकीय आरोग्य साहाय समिती सभापती,परिवहन समिती सभापती, सभागृह नेता, विरोधी पक्षनेता, स्थायी समिती सभापती, उपमहापौर आणि महापौर यांना वाढीव दरानुसार वाहन प्रतिपूर्ती भत्ता देण्यात येणार आहे.


१२५ सदस्यांना १० हजार रुपये मानधन
महापालिकेच्या वर्गवारीनुसार तेथील नगरसेवकांना मानधन दिले जाते. राज्यातील २९ महापालिकांपैकी चार महापालिका क वर्गात समाविष्ट आहेत. यामध्ये वसई-विरार महापालिकेचा समावेश आहे. त्यामुळे येथील नगरसेवकांना दरमहा १० हजार रुपये मानधन महापालिकेकडून त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. पालिकेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या ११५ नगरसेवकांसह स्वीकृत १० नगरसेवकांना सुद्धा सदर मानधन देण्यात येणार आहे. यासाठी पालिकेचा नगरसेवकांच्या मानधनावर प्रत्येक महिन्याला १२ लाख ५० हजार एवढा खर्च होणार आहे.


आयुक्तांनाही महापौरांप्रमाणे वाहन भत्ता
महापालिकेच्या आयुक्तांना सुद्धा महापौर यांच्या प्रमाणेच ७५ हजार वाहन प्रतिपूर्ती भत्ता देण्यात येतो. तसेच अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, उपसंचालक नगररचना, सहायक आयुक्त, शहर अभियंता, कार्यकारी अभियंता, मुख्य वैद्यकीय अधिकारी आणि विभाग प्रमुखांना सुद्धा ४० ते ४५ हजार रुपये वाहन प्रतिपूर्ती भत्ता प्रत्येक महिन्यात दिल्या जातो.

Comments
Add Comment

Palghar News : मोखाड्यात १८ वर्षीय तरुणाला धर्मांतरासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप; २२ महिलांविरोधात गुन्हा

मोखाडा : पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील वाकडपाडा येथे १८ वर्षीय तरुणाला धर्मांतरासाठी प्रवृत्त केल्याचा

Nalasopara Viral Video : नालासोपाऱ्यात हॉटेलच्या भातावर उंदरांचा हैदोस; ग्राहकांच्या जीवाशी खेळणाऱ्या हॉटेलवर कठोर कारवाईची मागणी

नालासोपारा : वसई-विरार महापालिका (Vasai-Virar Mahanagpalika) क्षेत्रातील नालासोपारा पूर्वेकडील वाकणपाडा परिसरातून एक अत्यंत

Palghar Blast Tarapur : तारापूर MIDC मध्ये भयंकर दुर्घटना! 'विराज प्रोफाइल'मध्ये एकापाठोपाठ ३ भीषण स्फोट; ३ कामगार जखमी

पालघर : तारापूर एमआयडीसीतील औद्योगिक क्षेत्रात आज (सोमवारी) सकाळी एकापाठोपाठ तीन महाभयंकर स्फोटांनी थरकाप

Chandigaon Tiranga Case : चंडीगाव ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणा, राष्ट्रध्वजाचा अवमान

डहाणू : स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वजाच्या सन्मानाबाबत डहाणू तालुक्यातील चंडीगाव ग्रामपंचायतीच्या कारभारातील

Mumbai News : धक्कादायक! वाढदिवसाच्या केकमध्ये आढळली पाल, 11 जणांना विषबाधा; 4 जण ICUमध्ये

नालासोपारा : नालासोपारा पूर्वेकडील लक्ष्मी नगर परिसरातील निळकंठ अपार्टमेंटमध्ये वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान

Palghar Gang Rape : धक्कादायक! पालघरमध्ये तरुणीवर सामूहिक लैंगिक अत्याचार; तीन आरोपी अटकेत, तिघांचा शोध सुरू

Palghar Gang Rape : पालघर : पालघर जिल्ह्यातील तलासरी परिसरात 19 वर्षीय तरुणीवर सहा जणांनी सामूहिक लैंगिक अत्याचार (Gang Rape)