चार नगरसेवकांविरोधात उबाठा गट आक्रमक

बेपत्ता नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याची प्रक्रिया सुरू


कल्याण : पक्षाचा आदेश न मानणाऱ्या ठाकरे गटातील चार नगरसेवकांविरोधात उबाठा गट आक्रमक झाला असून, बेपत्ता ४ नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती उबाठा पक्षाचे शहर प्रमुख बाळा परब, गटनेते उमेश बोरगावकर आणि पक्ष प्रतोद संकेश भोईर यांनी दिली. त्यामुळे कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील त्या चार प्रभागांत पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे.


कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत उबाठा गटाचे ११ नगरसेवक निवडून आले. मात्र निवडून आल्यापासून कल्याणमधील मनसेतून ठाकरे गटाच्या मशाल चिन्हावर निवडून आलेले नगरसेवक राहुल कोट आणि नगरसेविका स्वप्नाली केणे या नॉटरिचेबल आहेत, तर शिवसेना शिंदे गटातील ठाकरे गटातून निवडून आलेले मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे हे नगरसेवक देखील बेपत्ता आहेत. याबाबत उबाठा गटाच्या वतीने त्यांना पक्षाच्या बैठकीला हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली होती. मात्र या बैठकीला आणि कोकण विभागीय आयुक्तांकडे गट नोंदणीला देखील हे चारही नगरसेवक गैरहजर राहिल्याने उबाठा गटाने त्यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.


याबाबत शुक्रवारी कल्याणच्या शिवसेना शहर शाखेमध्ये नगरसेवक आणि शहर प्रमुख यांच्यासोबत बैठक पार पडली. जे चार नगरसेवक मशाल चिन्हावर निवडून आले आहेत मात्र त्यांना व्हीप मान्य नाही अशा चारही नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केले असल्याची माहिती दिली.

Comments
Add Comment

Abhishek bachchan : अखेर ऐश्वर्यासोबतच्या नात्याबाबत अभिषेकनं सोडलं मौन

मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडी ऐश्वर्या राय (Aishwarya Rai ) आणि अभिषेक बच्चन (Abhishek bachchan ) अनेक कारणांमुळे सतत चर्चेत असतात.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित जपण्यासाठी परीक्षा आणि निकाल प्रक्रिया आता 'मिशन मोड'वर!

उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे बाटु विद्यापीठ प्रशासनाला कडक

Mrunal Thakur : प्रसिद्ध अभिनेत्रीला अटक ? सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल, चाहत्यांना बसला धक्का

मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल ठाकूर (Mrunal Thakur)ची सध्या सर्वत्र चर्चा होत असून सोशल मीडियावर तिचा एक

Bigg Boss Marathi 6 : घरातून बाहेर पडला 'हा' सदस्य, प्रेक्षक म्हणाले...

मुंबई : बिग बॉस मराठी सीझन ६ (Big boss Marathi 6) यंदा अनेक गोष्टींमुळे सतत चर्चेत आहे. आता या सीझनचे काही दिवसच शिल्लक राहिले

Volkswagen Taigun Facelift : व्होल्क्सवॅगन टायगुन फेसलिफ्ट ९ एप्रिलला होणार लॉन्च

मुंबई : व्होल्क्सवॅगन टायगुन फेसलिफ्ट ही एसयूव्ही भारतीय बाजारात लवकरच दाखल होणार असून कंपनीने तिची लॉन्च डेट ९

Mahrashtrachi Hasayjatra Nirmiti Sawant : सोनी मराठी वाहिनीवरील “महाराष्ट्राची हास्यजत्रा”मध्ये निर्मिती सावंत यांचा खास धमाका

मुंबई : सोनी मराठी वाहिनी नेहमीच दर्जेदार आणि प्रेक्षकांच्या मनाला भिडणारे मनोरंजन देत आली आहे. कुटुंबासह पाहता