Mahrashtrachi Hasayjatra Nirmiti Sawant : सोनी मराठी वाहिनीवरील “महाराष्ट्राची हास्यजत्रा”मध्ये निर्मिती सावंत यांचा खास धमाका

मुंबई : सोनी मराठी वाहिनी नेहमीच दर्जेदार आणि प्रेक्षकांच्या मनाला भिडणारे मनोरंजन देत आली आहे. कुटुंबासह पाहता येतील असे विविध कार्यक्रम सादर करत, सोनी मराठीने प्रेक्षकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केले आहे. याच वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय आणि विनोदी कार्यक्रम म्हणजे “महाराष्ट्राची हास्यजत्रा”.


“महाराष्ट्राची हास्यजत्रा” ( Mahrashtrachi Hasayjatra) हा कार्यक्रम प्रेक्षकांना दर आठवड्याला खळखळून हसवतो. उत्कृष्ट लेखन, भन्नाट परफॉर्मन्स आणि कलाकारांची जबरदस्त टाइमिंग यामुळे हा शो प्रत्येक घरात आवडीने पाहिला जातो. हा कार्यक्रम दर सोमवार आणि मंगळवारी रात्री ९ वाजता सोनी मराठीवर प्रसारित होतो.


या आठवड्याचा एपिसोड खास ठरणार आहे, कारण प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री निर्मिती सावंत एक भन्नाट स्किट सादर करताना दिसणार आहेत. "मॅरेज फोटो अल्बम" असे या स्किटचे नाव असून, या स्किटमध्ये निर्मिती सावंत यांच्यासोबत पृथ्विक प्रताप आणि वनिता खरात हे कलाकारही झळकणार आहेत. या तिघांनी मिळून या स्किटमध्ये अक्षरशः धमाल उडवली आहे.


निर्मिती ताईंची स्टेजवरील उपस्थिती, त्यांची अफलातून कॉमिक टाइमिंग आणि सहज अभिनय प्रेक्षकांना नेहमीच भुरळ घालतो. त्यांच्या प्रत्येक एंट्रीला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळतो. "मॅरेज फोटो अल्बम" या स्किटमध्येही त्यांनी त्याच जादुई अंदाजात प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. हास्यजत्रेच्या मंचावर त्यांचा हा खास अंदाज पाहायला मिळणार आहे.


मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीत निर्मिती सावंत यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ज्या काळात विनोदी क्षेत्रात महिला कलाकारांची संख्या अत्यंत कमी होती, त्या काळात त्यांनी आपल्या दमदार अभिनय आणि टायमिंगच्या जोरावर एक वेगळी उंची गाठली. त्यांच्या कॉमेडीची शैली, संवादफेक आणि व्यक्तिमत्त्व आजही अनेक कलाकारांसाठी प्रेरणादायी आहे. त्या मराठीतील अग्रगण्य आणि अत्यंत मानाच्या विनोदी अभिनेत्रींपैकी एक मानल्या जातात. या आठवड्यातील “महाराष्ट्राची हास्यजत्रा” चा हा विशेष भाग प्रेक्षकांसाठी नक्कीच हसण्याचा एक मोठा डोस घेऊन येणार आहे.

Comments
Add Comment

Babita Singh Reporting Release Date : ‘पाताळ लोक’च्या निर्मात्यांची नवी पेशकश; एक हत्या, दोन रहस्यं आणि स्वतःचा शोध घेणारा एक प्रवास

- प्राइम व्हिडिओने रोमांचक इन्व्हेस्टिगेटिव्ह ड्रामा ‘बबिता सिंग रिपोर्टिंग’च्या वर्ल्डवाइड प्रीमियरची

Actress Ananya Raj : अभिनेत्री अनन्या राजचं वयाच्या २८व्या वर्षी निधन; झोपेत घेतला अखेरचा श्वास

मुंबई : मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी समोर आली आहे. अभिनेत्री अनन्या राजचं वयाच्या अवघ्या २८व्या वर्षी निधन झालं

Upcoming Web Series : सचिन तेंडुलकरच्या जिवलग मित्राची कहाणी लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार; प्रमुख भूमिकेत कोण ?

मुंबई : क्रिकेट विश्वात काही खेळाडूंच्या वैयक्तिक जीवनाची चर्चा त्यांच्या खेळातील विक्रमांपेक्षाही अधिक झाली.

Ashwin Mushran : अभिनेता अश्विन मुश्रानच्या कारचा अपघात, स्थानिकांशी वाद घालतानाचा Viral Video

मडगाव : 'लगे रहो मुन्ना भाई', 'शहजादा', 'फॅशन', 'मैं तेरा हीरो' आणि 'देसी बॉईज' अशा निवडक हिंदी चित्रपटांतून चमकलेला

Govinda and Sunita Ahuja Controversy : सुनीता आहुजाच्या आरोपांवर गोविंदा संतापला; म्हणाला, लिमिटमध्ये राहा...!

मुंबई : बॉलिवूड अभिनेता गोविंदा व त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्यातील वैयक्तिक वाद आता जगजाहीर होऊ लागले आहेत.

Vijay & Trisha : घटस्फोटाच्या चर्चांनंतर विजय-त्रिशाचा VIDEO व्हायरल; नेमकं काय घडलं?

चेन्नई: तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय आणि प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री त्रिशा कृष्णन पुन्हा एकदा