सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी एकमताने निवड - दिलीप वळसे पाटील यांनी मांडला प्रस्ताव; छगन भुजबळ यांनी दिले अनुमोदन, ठरावावर सर्व ४८ आमदारांची सही

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ गटनेते पदी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली. विधानभवनात शनिवारी दुपारी २ वाजता झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत याबाबतचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.


अजित पवार यांच्या निधनानंतर आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीला राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील यांच्यासह पक्षाचे सर्व आमदार उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शोक प्रस्ताव मांडत अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी सुनेत्रा पवार यांचे नाव गटनेतेपदासाठी सुचवले, तर या प्रस्तावाला छगन भुजबळ यांनी अनुमोदन दिले. यावर उपस्थित सर्व आमदारांनी समर्थन दिल्यानंतर सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली.


सुनेत्रा पवार यांच्या निवडीचा ठराव राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानसभेतील आणि विधानपरिषदेतील अशा एकूण ४८ आमदारांच्या सह्यांनी मंजूर करण्यात आला. या बैठकीत दोन ठराव मंजूर करण्यात आले असून, पहिल्या ठरावानुसार सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली, तर दुसऱ्या ठरावानुसार त्यांची पक्षनेता म्हणून निवड करण्यास मान्यता देण्यात आली. या दोन्ही ठरावांना एकमताने संमती मिळाल्यामुळे सुनेत्रा पवार यांच्याकडे आता पक्षाचे सर्वाधिकार आले आहेत.

खासदारकीचा दिला राजीनामा


गटनेतेपदी निवडीची अधिकृत पत्रे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि अन्य वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विधिमंडळ सचिवालयाकडे सादर केली. दरम्यान, गटनेतेपदी निवड झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे सादर केला. सुनेत्रा पवार यांनी बारामती मतदारसंघातून २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवली होती; मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर त्यांची राज्यसभेवर नियुक्ती झाली होती.

Comments
Add Comment

CJP : सीजेपी आंदोलनकाळात महाराष्ट्रात दाखल गुन्हे रद्द होणार

मुंबई : वैद्यकीय प्रवेश परीक्षा 'नीट'मधील अनियमिततेविरोधात आणि कॉकरोच जनता पार्टीच्या (सीजेपी) समर्थनार्थ

World Chess Championship : गुकेश आणि सिंदारोव्ह यांच्यातील जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद लढत जिनिव्हामध्ये रंगणार

नवी दिल्ली : विद्यमान जागतिक विजेता गुकेश डी आणि आव्हानवीर जावोखिर सिंदारोव्ह यांच्यातील २०२६ ची जागतिक

Dr Shrikant Shinde : ‘जीमॅट’, ‘जीआरई’प्रमाणे भारतात परीक्षा पद्धती लागू करा - डॉ. श्रीकांत शिंदे

नवी दिल्ली : अमेरिकेत जीमॅट, ‘जीआरई’च्या परीक्षा वर्षातून अनेकदा घेतल्या जातात आणि त्यांचा निकाल लगेच घोषीत

Anti Paper Leak Bill : ‘अँटी पेपर लीक’ विधेयकावर लोकसभेत खडाजंगी

नवी दिल्ली : लोकसभेत अँटी पेपर लीक विधेयकावर झालेल्या चर्चेदरम्यान सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये जोरदार

Mangal Milan NDA Meeting : एनडीए संसदीय पक्षाची 'मंगल मिलन' बैठक

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत एनडीए संसदीय पक्षाची 'मंगल मिलन' बैठक नुकतीच पार पडली.  या

Union Minister Jitendra Singh : परीक्षा सुधारणा विधेयक भारतीय संसदेच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरेल - केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह

नवी दिल्ली : लोकसभेत सार्वजनिक परीक्षा (अनुचित साधनांच्या प्रतिबंधासाठी) सुधारणा विधेयक, २०२६ वर चर्चा सुरू झाली