सामान्य प्रशासन विभागाने याबाबत अधिकृत आदेश जारी केला असून, गृह विभागातील अपर मुख्य सचिव पदाचा कार्यभार मनीषा म्हैसकर यांनी शुक्रवारी दुपारी स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सध्या त्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव म्हणून कार्यरत होत्या. बांधकाम विभागाचा कार्यभार मिलींद म्हैसकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
इक्बालसिंग चहल यांच्या सेवानिवृत्तीमुळे रिक्त होणाऱ्या पदावर मनीषा म्हैसकर यांची शासनाने नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच, त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यभार संबंधित अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करून गृह विभागाचा पदभार स्वीकारावा, असेही शासनाने आदेशात नमूद करण्यात आले आहे.
प्रशासनातील अनुभव, कडक शिस्त व निर्णयक्षमतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या मनीषा म्हैसकर यांच्यावर आता राज्याच्या कायदा व सुव्यवस्था, अंतर्गत सुरक्षा आणि गृह प्रशासनाची जबाबदारी असणार आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे गृह विभागाच्या कामकाजाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.