मुंबईत २७,२८ फेब्रुवारीला पीएम विश्वकर्मा प्रदर्शन व व्यापार मेळावा

मुंबई: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी उत्पादनांच्या वापराचे केलेले आवाहन तसेच पीएम विश्वकर्मा योजनेच्या प्रसारासाठी केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत २७ आणि २८ फेब्रुवारीला छोट्या उद्योजकांच्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण कारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि सर्व कारागिरांचे उत्पादन अधिकाधिक लोकांपर्यंत जाण्यासाठी हे प्रदर्शन असून नागरिकांनी वस्तू खरेदी कराव्यात, असे आवाहन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती (राज्यमंत्री दर्जा) रवींद्र साठे यांनी पत्रकार परिषदेत केले.


साठे यांनी सांगितले की, केंद्र सरकारचे सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय (एमएसएमई) आणि महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ यांच्या सहकार्याने हे प्रदर्शन सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय, यांचे कार्यालय, घाटकोपर-अंधेरी लिंक रोड, साकीनाका, अंधेरी (पूर्व) येथे होणार आहे. हे प्रदर्शन आणि मेळावा सकाळी १० ते संध्याकाळी ८ या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे.


पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत महाराष्ट्रात आतापर्यंत ८ प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच कारागीर व शिल्पकारांच्या उत्पादनांच्या विपणन व ब्रँडिंगसंदर्भात जनजागृती करण्यासाठी ३४ एकदिवसीय कार्यशाळाही आयोजित करण्यात आल्या आहेत. या प्रदर्शनात १०० स्टॉलद्वारे ग्रामीण भागातील छोट्या कारागिरानी तयार केलेल्या बांबू हस्तकला, फर्निचर साहित्य, तयार कपडे, मातीची भांडी (कुंभारकाम), दागिने तसेच इतर पारंपरिक हस्तकला उत्पादने ठेवण्यात येणार आहेत. खादी म्हणजे केवळ कापड नव्हे, यामध्ये छोट्या उद्योजकांनी तयार केलेल्या विविध वस्तू आहेत. मुंबईतील नागरिक, उद्योजकांनी प्रदर्शनास भेट देऊन स्वदेशी उत्पादनांची खरेदी करून स्थानिक कारागिरांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन रविंद्र साठे यांनी केले आहे.


प्रदर्शनाचे उद्घाटन २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांच्या हस्ते होणार असून मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी गीतांजली बाविस्कर उपस्थित राहणार असल्याची माहिती एमएसएमईचे संचालक मिलिंद बारापात्रे यांनी दिली.



पीएम विश्वकर्मा योजनेत महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक


प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या पीएम विश्वकर्मा योजनेत महाराष्ट्रने तिसरा क्रमांक पटकावला. आतापर्यंत २७ लाख अर्ज प्राप्त झाले. तीन लाख उमेदवारांनी नोंदणी यशस्वी केली, त्यापैकी अडीच लाख जणांना प्रमाणित करून दोन लाख उमेदवारांना १८ प्रकारातील ट्रेडनिहाय प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये राज्याचा देशात तिसरा क्रमांक आल्याची माहिती सभापती रवींद्र साठे यांनी दिली. अधिक माहितीसाठी एमएसएमईचे उपसंचालक सुनील खुजनरे मुंबई (मो. ८३०८४०९०१९) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Heavy Rainfall Warning : राज्यात पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा, कोकण, घाटमाथा आणि पश्चिम महाराष्ट्रात सतर्कतेचे आवाहन

मुंबई : राज्यात पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला असून

Mumbai News : मस्जिद बंदर येथे म्हाडाच्या इमारतीचा भाग कोसळला; ६ जणांची सुटका, २ जखमी

मुंबई: मुंबईतून एक मोठी दुर्घटना टळल्याची बातमी समोर आली आहे. शनिवारी दुपारी मुंबईतील अत्यंत दाट वस्तीच्या आणि

Devendra Fadnavis : मी राज्यात समाधानी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर भाष्य; संत तुकारामांच्या अभंगाचा संदर्भ देत या चर्चांना पूर्णविराम मुंबई :

Maharashtra News : राज्यातील निम्म्याहून अधिक धरणे भरली

५३.३८ टक्के पाणीसाठा; मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम मुंबई : राज्यातील विविध

Mumbai Environment : तरंगता कचरा रोखण्यासाठी मालाडमध्ये 'द ओशन क्लीनअप' इंटरसेप्टर पायलट प्रकल्प कार्यान्वित

तरंगता कचरा संकलन प्रकल्प पाहणीसाठी तेजिंदर सिंग तिवाना उतरले नदीपात्रात! मुंबई : मालाड खाडीमध्ये जागतिक

MUMBAI-PUNE WATER LEVEL : मुंबई आणि पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली; दोन्ही शहरांच्या धरणांमध्ये जोरदार जलसाठा जमा!

मुंबई: महाराष्ट्रासाठी आणि विशेषतः मुंबई व पुणेकरांसाठी एक अतिशय दिलासादायक बातमी समोर आली आहे. यावर्षी