अजितपवारांचा लोकाभिमुख वारसा पुढे नेत महाराष्ट्राच्या सेवेसाठी कर्तव्य भावनेने सज्ज... - उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

मुंबई : आज महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताना मन अत्यंत भावुक झाले आहे. आदरणीय अजितदादांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि समाजातील वंचित घटकांसाठी जगण्याचा मंत्र दिला. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेताना ‘शिव–शाहू–फुले–आंबेडकर’ यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून कर्तव्यभावनेने ही जबाबदारी स्वीकारत आहे.


अजितपवारांच्या अकाली जाण्याने वैयक्तिक आयुष्यातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या मनावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. मात्र त्यांनी दिलेली कर्तव्यनिष्ठा, संघर्षाची ताकद आणि जनतेप्रतीची प्रामाणिक बांधिलकी हाच माझा खरा आधार आहे. त्यांच्या स्वप्नातील न्यायप्रिय, समताधिष्ठित आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी अखंड प्रामाणिकपणे, पारदर्शकतेने आणि लोकाभिमुखतेने काम करत राहीन, हा विश्वास मी आज या निमित्ताने देते.


या कठीण काळात महाराष्ट्रातील जनतेने दिलेले प्रेम, विश्वास आणि पाठिंबा हेच माझे सर्वात मोठे बळ आहे. आपल्या विश्वासाच्या जोरावर, दादांच्या विचारांना उजाळा देत, नव्या आशेने आणि नव्या ऊर्जेने पुढे चालत राहीन. शेतकऱ्यांच्या हितासाठी, युवकांच्या संधींसाठी, महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाच्या प्रत्येक योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणे हे माझे सर्वोच्च प्राधान्य असेल.


देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या 'विकसित भारत २०४७ ' या संकल्पनेला बळ देण्यासाठी तसेच देशाचे गृह व सहकारमंत्री आदरणीय अमित शाह साहेबांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास साधण्यास राज्य शासन सदैव तत्पर राहील. तसेच, नव महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांचा वारसा समर्थपणे पुढे नेण्याची जबाबदारी आम्ही सर्वजण अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडू.


महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या साथीने महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी, सामाजिक समता, आर्थिक प्रगती आणि सर्वसमावेशक समृद्धी साधण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन. जनतेच्या अपेक्षांना न्याय देणे, शासन-प्रशासन अधिक संवेदनशील व लोकाभिमुख बनवणे आणि राज्याला विकासाच्या नव्या उंचीवर नेणे, हाच माझा संकल्प आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेचे, सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सहकाऱ्यांनी माझ्यावर ठेवलेल्या विश्वासास पात्र ठरण्यासाठी पूर्ण क्षमतेने कार्य करीन, हा शब्द देते.


पंतप्रधान मोदींनी दिल्या सुनेत्रा पवारांना शुभेच्छा


नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. “महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना शुभेच्छा. मला विश्वास आहे की त्या राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी अथक परिश्रम करतील आणि दिवंगत अजित पवार यांचे स्वप्न पूर्ण करतील”, अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली.

Comments
Add Comment

Green Sanvi Vessel: ग्रीन सान्वी जहाज होर्मुझच्या सामुद्रधुनीतून आणत असलेला एलपीजी गॅस किती दिवस पुरेल?

नवी दिल्ली: मध्य पूर्वेतील पुरवठ्याच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे.

Viral Video : सफाळेत एसटी चालकाने युनिफॉर्म काढून थोपटले दंड; प्रवाशाला दिलं खुलं आव्हान, बस डेपोत जोरदार राडा

पालघर : एसटी बसमधील प्रवाशांचे वाद नवे नाहीत, मात्र पालघरमधील सफाळे बस आगारात चक्क एक एसटी चालकच प्रवाशाशी

KDMC : केडीएमसीत धक्कादायक प्रकार; महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी, लिपिक...

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिका येथे एका लिपिकाकडून महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन केल्याचा गंभीर प्रकार

भोंदूबाबा अशोक खरातला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करणार

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा; कोणाकडे पुरावे असल्यास सादर करण्याचे आवाहन मुंबई : नाशिकमधील

Pune News : ७ वर्षीय चिमुरडीला खोलीत बोलावून...नराधमाचा 'तो' संतापजनक प्रकार पाहून आई अन् आत्याला...

पुणे : पिंपरी-चिंचवडमधील (Pimpari Chinchwad) मोशी परिसरातून माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे.

इस्रायल आणि अमेरिकेकडून इराणच्या वीज प्रकल्पावर बुशेहर अणुकेंद्रावर मोठा हल्ला; एका सुरक्षा रक्षकाचा मृत्यू

नवी दिल्ली: गेल्या २४ तासांत इराणसोबतच्या युद्धात ऐतिहासिक नुकसान सोसल्यानंतर, अमेरिका आणि इस्रायलने