ST bus accident : रत्नागिरीत एसटी बसची मोटारीला धडक; तिघे जखमी

रत्नागिरी : केळवली फाटा (ता. राजापूर) येथील जामदे पुलाजवळ एसटी बसने स्विफ्ट डिझायर कारला जोरदार धडक दिल्याने अपघातात तिघे जखमी झाले.अपघातानंतर मोटार काही अंतरापर्यंत फरपटत गेली. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मोटारचालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठी दुर्घटना टळली. आज सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. कारचालक अमित रमेश साटम (रा. शिरगाव, ता. देवगड) आपल्या मित्रांसह आपल्या गावाहून मोटारीने (क्र. एमएच ०७ बीजी ९०९७) केळवली-पाचल मार्गे अणुस्कुराच्या दिशेने पुण्याकडे जात होते. त्यावेळी वैभववाडीच्या दिशेने येणारी कणकवली आगाराची भुईबावडा-रिंगेवाडी-खारेपाटण एसटी बस (क्र. एमएच २० बीएल ३०७९) केळवली फाट्यावरील जामदे पुलाजवळ आली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वळणाच्या रस्त्यावर एसटी बसची मोटारीला धडक बसली. चालक गणपती भाऊसाहेब जाधव (वय ४७) यांच्या ताब्यातील एसटी बसने समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली. धडकेनंतर कार बससोबत काही अंतर फरपटत गेली.




या अपघातात कारमधील युधीराज भिकाजी राणे (वय ३२), विघ्नेश रामदास म्हाळवदे (वय २५) आणि राज रामदास म्हाळवदे (वय २२) हे तिघे जखमी झाले. तिघेही शिरगाव (ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) येथील रहिवासी आहेत. जखमींवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव व पोलीस हेडकॉन्स्टेबल रहिम मुजावर , सहायक पोलिस निरीक्षक दीपज्योती पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. राजापूर एसटी आगाराच्या आगारप्रमुख काव्या पेडणेकर व वाहतूक नियंत्रक अजय सिडाम यांनीही घटनास्थळी भेट दिली. तसेच सिंधुदुर्गचे विभागीय वाहतूक अधीक्षक नीलेश लाड यांनी घटनास्थळी पाहणी केली.या प्रकरणी कारचालक अमित साटम यांनी दिलेल्या तक्रारीवरून राजापूर पोलिसांनी एसटी चालक गणपती जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Comments
Add Comment

Chhattisgarh : छत्तीसगडच्या IGKV पेपरफुटी प्रकरणी सहा जणांना अटक

रायपूर : इंदिरा गांधी कृषी विद्यापीठातील (Indira Gandhi Krishi Vishwavidyalaya) पेपरफुटी प्रकरणी एक प्राध्यापक आणि पाच विद्यार्थी अशा

IND vs SL Colombo Test : कोलंबो कसोटीत सारंश जैनला टीम इंडियाकडून पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना रविवारपासून कोलंबो येथे

Resort Booking Scam : रिसॉर्टच्या बुकिंग रकमेत 51.75 लाखांचा अपहार; सेल्स मॅनेजरविरुद्ध गुन्हा दाखल

रायगड : नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धामोते येथील डिस्कव्हरी रिसॉर्टमध्ये लग्न समारंभांच्या बुकिंगच्या

'Jap-Anushthan' ceremony : त्र्यंबकेश्वर येथे जपानुष्ठान सोहळ्यास उत्साहात प्रारंभ; जगदगुरु शांतीगिरीजी महाराजांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळ्याचे आयोजन..

नाशिक :  निष्काम कर्मयोगी,शिवयोगी जगदगुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या परंपरेनुसार उत्तराधिकारी

Char Dham Yatra : चारधाम यात्रेत 48 लाखांहून अधिक भाविक दाखल; यमुनोत्रीत नवा विक्रम

देहरादून : उत्तराखंडमध्ये मान्सूनच्या आव्हानात्मक परिस्थिती असूनही चारधाम यात्रा सुरू आहे. यात्रेच्या 125

The number of patients increased : भारतात H1N1 चा वाढता संसर्ग; स्वाइन फ्लूपासून बचावासाठी महत्त्वाच्या उपाययोजना

भारतातील अनेक राज्यांमध्ये सध्या H1N1 (स्वाइन फ्लू) च्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये लहान