विमानतळ प्रकल्पात मच्छीमारांचे हित जपणार

खासदार सवरा यांनी लोकसभेत लावून धरला प्रश्न


पालघर : पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी प्रस्तावित असलेल्या विमानतळ प्रकल्पाचा वेग वाढवतानाच स्थानिक मच्छीमारांच्या रोजगारावर गदा येणार नाही, याची काळजी घेण्याची आग्रही भूमिका पालघरचे खासदार डॉ. हेमंत विष्णू सवरा यांनी गुरुवारी लोकसभेत मांडली. त्यांच्या प्रश्नाची गंभीर दखल घेत केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी, मच्छीमार आणि पर्यावरणाचा सर्वंकष अभ्यास केल्याशिवाय प्रकल्पाला अंतिम मंजुरी दिली जाणार नाही, असे आश्वासन सभागृहात दिले. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्नोत्तराच्या तासात खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी पालघर विमानतळाचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी त्यांनी विकास आणि स्थानिक रोजगार यांचा समतोल राखण्यावर भर दिला.


पालघर विमानतळाच्या उभारणीसाठी 'साइट क्लिअरन्स' मिळण्यास विलंब होत असल्याचे लक्षात आणून देत, केंद्र सरकारने राज्य सरकारशी समन्वय साधून ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी खा. सवरा यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढवण बंदराच्या जवळ समुद्रात विमानतळ उभारण्याची संकल्पना मांडली होती, याकडे डॉ. सवरा यांनी लक्ष वेधले. जर विमानतळ समुद्रात होणार असेल, तर तेथील नैसर्गिक मासेमारी, मच्छिमार बांधव आणि मासेमारी क्षेत्रावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सरकारने मच्छिमारांचे हित लक्षात घेऊन त्यांच्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत? असा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी उपस्थित केलेला प्रश्न अत्यंत रास्त असल्याचे सांगत केंद्रीय मंत्री राम मोहन नायडू यांनी त्यांची प्रशंसा केली. मंत्र्यांनी स्पष्ट केले की, विमानतळ जमिनीवर असो वा समुद्रात, त्यासाठी केंद्रीय पर्यावरण विभागाची मंजुरी बंधनकारक असते. खासदार यांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन करण्यासाठी आणि मच्छिमारांच्या हितासाठी सखोल सर्वेक्षण केले जाईल. त्यामध्ये काही आक्षेप आढळल्यास त्यावर योग्य कार्यवाही केल्याशिवाय क्लिअरन्स दिला जाणार नाही. यावेळी खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी नवी मुंबई विमानतळ कार्यान्वित झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री राम मोहन नायडू, केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, यांचे आभार मानले.

Comments
Add Comment

डोंट बी शाय’सह प्राइम व्हिडिओ आणि इटर्नल सनशाइन प्रोडक्शन्सच लँडमार्क कोलॅबोरेशन जाहीर

प्राइम व्हिडिओ × इटर्नल सनशाइन प्रोडक्शन्स: रोमँटिक कॉमेडी चित्रपट ‘डोंट बी शाय’मधून नव्या प्रवासाची

शैलेश दातारांचा निडर पोलीस अवतार

विविध माध्यमांतून सातत्याने वैविध्यपूर्ण भूमिका करणारे अभिनेते शैलेश दातार आता एका महत्त्वपूर्ण

मुंबई, पुण्यानंतर आता नाशिककरही सततच्या वाहतूक कोंडीमुळे होणार हैराण; तब्बल वर्षभर सोसावी लागणार वाहतूक कोंडी

नाशिक : मुंबई पुण्याप्रमाणेच आता नाशिककरांनाही रोजच्या वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागणार आहे. एक - दोन महीने

केरळ स्टोरी २ चा टिझर यावेळी अधिक गडद; हिंदू मुलींवर निशाणा....

मुंबई : आजपर्यंत विपुल अमृतलाल शाह यांचे अनेक देशभक्तीपर सिनेमे किंवा सामाजिक प्रश्नांना हात घालणारे सिनेमे आपण

रत्नागिरी जिल्ह्यावर मळभ व पावसाचे सावट; आंबा-काजू उत्पादन धोक्यात

रत्नागिरी  : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे सावट घोंगावत आहे. जिल्ह्यात पावसाचे

डोंट बी शाय’सह प्राइम व्हिडिओ आणि इटर्नल सनशाइन प्रोडक्शन्सच लँडमार्क कोलॅबोरेशन जाहीर

प्राइम व्हिडिओ × इटर्नल सनशाइन प्रोडक्शन्स: रोमँटिक कॉमेडी चित्रपट ‘डोंट बी शाय’मधून नव्या प्रवासाची