राष्ट्रवादीच्या भवितव्याबाबत लवकरच निर्णय - प्रफुल्ल पटेल

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी पक्षाच्या भवितव्याबाबत तसेच अजित पवार यांच्या खात्यांबाबत लवकर निर्णय होण्याची गरज व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की, अजित पवार यांच्या खात्यांबाबत तसेच राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित निर्णयांबाबत अनिश्चितता कायम राहू नये, ही आमची भूमिका आहे. राज्यातील सध्याची परिस्थिती, कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता आणि जनतेच्या भावना लक्षात घेता विलंब न करता ठोस निर्णय घेणे आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर आम्ही आमची भूमिका मांडली आहे.

ते पुढे म्हणाले की, अजितदादा हे अनुभवी नेते होते, त्यांनी राज्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे त्यांच्या खात्यांबाबत लवकर निर्णय होणे हे केवळ पक्षासाठीच नव्हे, तर राज्याच्या प्रशासनासाठीही महत्त्वाचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसबाबतही स्पष्ट भूमिका ठरवली जावी, जेणेकरून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये कोणताही संभ्रम राहणार नाही. येत्या काळात यासंदर्भात लवकरच निर्णय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बैठकीत नेमकी काय चर्चा झाली?

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांनी शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाली. तसेच अजित पवार यांच्याकडे असलेली अर्थ आणि उत्पादन शुल्क ही खाती राष्ट्रवादीकडे कायम ठेवण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबतही या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.

नरेश अरोरा सुनेत्रा पवारांच्या भेटीला

दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी राजकीय सल्ल्यासाठी नरेश अरोरा यांना बारामतीला बोलावले असून, अरोरा हे दुपारी सुनेत्रा पवार यांच्या भेटीला बारामतीला पोहोचले.


Comments
Add Comment

Jalna : कॉलेजचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू आणि चौघे जखमी

जालना : जालना जिल्ह्यातील भोकरदनमध्ये एका कॉलेजच्या नव्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम सुरू असताना

Weather changes in Maharashtra : महाराष्ट्रात पुन्हा बदलले हवामान; शनिवारी अनेक भागांत पावसाचा अंदाज, ७ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी!

मुंबई : महाराष्ट्रामध्ये मान्सूनचे वारे पुन्हा एकदा सक्रिय झाले असून, राज्याच्या विविध भागांत पावसाचा जोर

Boss Scam : अधिकारी बनून पैशांची मागणी; 'बॉस स्कॅम'पासून सावधान राहण्याचे केंद्राचे आवाहन

नवी दिल्ली : व्हॉट्सॲप, ई-मेल किंवा इतर संदेशवहन माध्यमांचा वापर करून आर्थिक फसवणूक करणाऱ्या सायबर

New IT Rules : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससाठी नवीन आयटी नियम कठोर, आक्षेपार्ह मजकूर हटवण्याची मुदत २४ तासांवरून थेट २ तासांवर

नवी दिल्ली : केंद्र सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससाठी आक्षेपार्ह आणि संवेदनशील मजकूर हटवण्याच्या मुदतीत

PM Modi and Sukhbir Singh Badal Meeting : पंतप्रधान मोदी आणि सुखबीर सिंग बादल यांच्या भेटीमुळे चर्चांना उधाण

नवी दिल्ली : पुढील वर्षी होणाऱ्या पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी माजी मित्रपक्ष असलेल्या भारतीय जनता पक्ष (भाजप)

PM Modi : काळजी करू नका, मी तुमच्यासोबत आहे, तृणमूल आणि उबाठाच्या बंडखोर खासदारांना पंतप्रधानांचे आश्वासन

नवी दिल्ली: संसदेत सुरू असलेल्या गदारोळादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या