ऑस्ट्रेलियन ओपन : सबालेन्काने गाठली अंतिम फेरी

मेलबर्न  :जागतिक क्रमवारीत नंबर १ टेनिसपटू अरिना सबालेन्का हिने ऑस्ट्रेलियन ओपन २०२६ च्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात तिने युक्रेनच्या एलिना स्वितोलिनाचा सरळ सेटमध्ये ६-२, ६-३ असा सहज पराभव केला. मेलबर्नमध्ये सलग चौथ्यांदा अंतिम फेरी गाठण्याची ही तिची सर्वोत्तम कामगिरी आहे. पहिल्या सेटमध्ये सामना सुरू असतानाच एक नाट्यमय आणि वादग्रस्त प्रसंग घडला. सामन्याच्या चौथ्या गेमच्या पहिल्याच पॉइंटवर साबालेंकाने बॉल रिटर्न केला, परंतु तिची 'ग्रंट' (आवाज) उशिरा आली. स्वितोलिना शॉट खेळणार असताना हा उशिरा आलेला आवाज झाल्याचे पंचांनी ठरवले. या 'हिंडरन्स' नियमाखाली पंचांनी साबालेंकाला थेट 'पॉइंट पेनल्टी' दिली. सबालेन्काने यावर तीव्र नाराजी व्यक्त केली, मात्र निर्णय कायम राहिला. विशेष म्हणजे, या वादग्रस्त निर्णयामुळे साबालेंका आणखी पेटून उठली. तिने त्याच गेममध्ये स्वितोलिनाची सर्व्हिस ब्रेक केली आणि पहिला सेट सहज जिंकला. या स्पर्धेत अद्याप एकही सेट न गमावणाऱ्या सबालेन्काने आपला दबदबा कायम ठेवला आहे. शनिवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात तिचा सामना एलिना रायबाकिना आणि जेसिका पेगुला यांच्यातील दुसऱ्या उपांत्य फेरीतील विजेत्याशी होईल.

Comments
Add Comment

Sanjay Manjrekar : वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वालच्या आक्रमक वर्तनावर मांजरेकरांचा संताप; BCCI-ICC कडे कारवाईची मागणी

मुंबई : माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी युवा भारतीय क्रिकेटपटूंच्या

Anaya Bangar : पुरूषाची महिला झाल्यानंतर आता अनाया बांगरच्या कमबॅकचा मार्ग मोकळा; 'या' लीगमधून उतरणार मैदानावर

Anaya Bangar WBBL : अनाया बांगरने (Anaya Bangar) क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. क्रिकेट

BWF world rankings : बीडब्ल्यूएफ जागतिक क्रमवारीत त्रिशा आणि गायत्रीची मोठी झेप

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या बॅडमिंटन विश्वचॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर, भारतीय महिला दुहेरी

Rahul Dravid : टीम इंडियाला डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी, पण मार्ग खडतर - राहुल द्रविड

नवी दिल्ली : भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मत आहे की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी)

Kedar Jadhav : क्रिकेटच्या पिचवरून राजकारणाच्या मैदानात; केदार जाधवला भाजपमध्ये मिळाली मोठी जबाबदारी!

Mumbai : टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू केदार जाधव आता राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात एका नव्या भूमिकेत झळकणार आहे.

INDvsSL : भारताविरुद्धच्या कोलंबो कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर श्रीलंका पिछाडीवर

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना कोलंबो