विमान अपघातापूर्वी नेमकं काय घडलं? पायलटने दिलेला 'तो' शेवटचा संदेश आणि प्राथमिक अहवाल समोर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार


बारामती : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. आज, २९ जानेवारी रोजी बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. एका दुर्दैवी अपघातात त्यांचे निधन झाल्याची बातमी समजताच पवार कुटुंबासह संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे. या अंत्यविधीसाठी देशातील आणि राज्यातील दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री (महाराष्ट्र राज्य), केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय नेते, इतर महत्त्वाचे राजकीय पदाधिकारी कालपासूनच त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले असून, आपल्या लाडक्या नेत्याचा अखेरचा निरोप घेण्यासाठी बारामतीत जनसागर लोटला आहे. प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून संपूर्ण शहर सध्या भावनांने डबडबलेले आहे.


पायलटचा शेवटचा संवाद आणि तांत्रिक बिघाड


मिळालेल्या माहितीनुसार, लँडिंगच्या काही सेकंद आधी वैमानिकाचा एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) शी संपर्क झाला होता. प्राथमिक माहितीनुसार, पायलटने विमानाच्या इंजिनमधील बिघाड किंवा तांत्रिक अडचणीबाबत शेवटचा संकेत दिला होता. "आम्ही नियंत्रण गमावत आहोत," अशा आशयाचा संदेश देऊन काही क्षणातच संपर्क तुटला आणि विमानाचा अपघात झाला.


एटीसी (ATC) अहवालातून विमान अपघाताचा थरार उघड


उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या (ATC) हवाल्याने आता अत्यंत महत्त्वाची आणि काळजाचा ठोका चुकवणारी माहिती समोर आली आहे. २८ जानेवारीच्या सकाळी नेमकं काय घडलं, याचा मिनिटा-मिनिटाचा तपशील प्राथमिक अहवालातून स्पष्ट झाला आहे. विमानाचा बारामती एटीसीशी पहिला संपर्क झाला. त्यावेळी हवामान स्थिर होते आणि दृश्यमानता (Visibility) साधारण ३००० मीटर इतकी होती. पायलटने रनवे क्रमांक ११ च्या दिशेने येत असल्याचे सांगितले, मात्र सुरुवातीला त्यांना धावपट्टी स्पष्ट दिसत नव्हती. "रनवे दिसला की पुन्हा कळवतो," असा संदेश वैमानिकाने एटीसीला दिला होता. एटीसीने रनवे क्रमांक ११ लँडिंगसाठी पूर्णपणे सज्ज केला होता. मात्र, याच वेळी पायलटकडून मिळणारा प्रतिसाद अचानक बंद झाला.


एटीसीवरील ड्युटीवर असलेल्या अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, विमानाशी संपर्क तुटल्यानंतर काही सेकंदातच धावपट्टीच्या डाव्या बाजूला भीषण ज्वाळा आणि धुराचे लोट आकाशात उठताना दिसले. रनवे दिसण्याच्या प्रयत्नात असतानाच विमानाचा तांत्रिक बिघाडामुळे किंवा अन्य कारणाने अपघात झाल्याचे प्राथमिक दर्शनी स्पष्ट होत आहे.

Comments
Add Comment

Ajit Pawar Passed Away : 'शरद पवारांचा आधारवड गेला..'; राज ठाकरे यांनी घेतली शरद पवारांची भेट

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर आज म्हणजेच गुरुवारी (दि. २९ जानेवारी) त्यांच्या

Ajit Pawar Passed Away : अजित पवार अमर रहे! साश्रू नयनांनी 'दादां'ना अखेरचा निरोप; बारामतीमध्ये उसळला जनसागर

बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावरील एक

Ajit Pawar Last Rites : संसाराची अन् संघर्षाची साथ सुटली! सुनेत्रा पवारांनी जड अंतकरणाने घेतली अजित पवारांची शेवटची भेट

बारामती : राजकारणाच्या आणि संसाराच्या प्रवासात ज्यांनी सावलीसारखी सोबत दिली, त्या आपल्या पतीला अजित पवारांना

Ajit Pawar Passed Away : "परत या, परत या... अजितदादा परत या"; पार्थिव उचलताच कार्यकर्त्यांचा आक्रोश

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर आज म्हणजेच गुरुवारी (दि. २९ जानेवारी) त्यांच्या

Amit Shah in Ajit Pawar Funeral : 'सहकारचा तारा निखळला'; अमित शहांच्या उपस्थितीत अजितदादांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

बारामतीच्या 'वाघा'ला निरोप देण्यासाठी मान्यवरांची मांदियाळी बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि खंबीर

Ajit Pawar Pink Jacket : 'गुलाबी' वादळ शांत! १८ जॅकेट अन् ४१ आमदारांची भिंत उभी करणारा 'गुलाबी' झंझावात विसावला

मुंबई : राजकारणातील आक्रमक चेहरा ते सामान्यांचा 'हक्काचा दादा' असा अजित पवार (Ajit Pawar) यांचा प्रवास एका वळणावर येऊन