बेपत्ताचा शोध लावण्यात तलासरी पोलीस अग्रेसर

तलासरी :महाराष्ट्र-गुजरात सीमेवर असलेल्या तलासरी तालुक्यातील रोजगाराच्या शोधात परराज्यात गेलेल्या आणि बेपत्ता झालेल्या व्यक्तींना शोधण्यात तलासरी पोलिसांना मोठे यश आले आहे. २०२५ मध्ये दाखल झालेल्या ३६ मिसिंग केसेसपैकी ३४ जणांचा शोध लावून पोलिसांनी त्यांना त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले आहे. पोलिसांच्या या संवेदनशील आणि तत्पर कामगिरीचे तालुक्यात कौतुक होत आहे. तलासरी तालुक्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्याने मोठ्या प्रमाणावर तरुण-तरुणी आणि अल्पवयीन मुली शेजारच्या गुजरात राज्यात कामासाठी जातात. कामाच्या ठिकाणी अनेकदा तरुण-तरुणी प्रेमात पडून घरच्यांना न सांगता निघून जातात. अशा परिस्थितीत हतबल झालेले कुटुंबीय पोलीस स्टेशनमध्ये 'मिसिंग'ची तक्रार दाखल करतात.


या शोध मोहिमेदरम्यान अल्पवयीन मुला-मुलींच्या बेपत्ता होण्याप्रकरणी तलासरी पोलीस ठाण्यात पाच गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. घर सोडून गेलेल्या व्यक्तींचा तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे शोध घेऊन पोलिसांनी अनेकांचे संसार आणि कुटुंब पुन्हा सावरले आहेत. तलासरी पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कुटुंबातील कोणतीही व्यक्ती बेपत्ता झाल्यास त्वरित पोलिसांशी
संपर्क साधावा.


३६ पैकी ३४ बेपत्ता व्यक्तींचा यशस्वी शोध


२०२५ मध्ये एकूण ३६ बेपत्ता तक्रारींची नोंद झाली होती.
त्याचा सविस्तर तपशील :
एकूण तक्रारी : ३६
यशस्वी शोध : ३४
महिला : २४ (तक्रारींपैकी बहुतांश
शोधण्यात यश)
पुरुष : १२
अपहृत मुले व मुली : ४ मुले आणि २ मुली (एकूण ६ जणांचा शोध घेऊन
घरवापसी केली).
प्रलंबित तपास : केवळ १ पुरुष आणि १ महिला यांचा शोध घेणे बाकी आहे.

Comments
Add Comment

प्रभाग समितीच्या रचनेत ‘बविआ’ची बाजी

नियमांच्या गणितात केवळ एक समिती भाजपकडे  विरार : वसई-विरार पालिका क्षेत्रात नऊ प्रभाग समित्यांची रचना

वनजमिनीच्या तांत्रिक पेचात अडकली आदिवासींची घरे

विवेक पंडित यांनी मंत्रालयाचे वेधले लक्ष वसई  : राज्यातील बेघर आदिवासी, विशेषतः आदिम कातकरी समाजाच्या गावठाण

तारापूर औद्योगिक वसाहतीत वायू गळती

बोईसर : पालघर जिल्ह्यातील बोईसरमधील तारापूर औद्योगिक वसाहतीतल्या भघेरिया केमिकल्समध्ये (जुने नाव : झेनित

पालघरमध्ये बंद दगड खाणीत दुर्घटना; दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू

पालघर : पाण्याचा अंदाज न ओळखता आल्याने दोन मुलांचा जीव गेल्याची दुर्दैवी घटना पालघरमध्ये घडली आहे. मनोरजवळील

औद्योगिक क्षेत्रातील समस्यांवर आमदारांनी वेधले लक्ष

विजेच्या अडचणींसह जमिनीचा लीज प्रश्न सोडवा वसई  : वसई-विरार औद्योगिक क्षेत्रातील छोटे मोठे उद्योजक विविध

वसई-विरारचा अर्थसंकल्प ‘वेटिंग’वर!

स्थायी समिती सभापतींची निवड लांबल्याने मार्चचा मुहूर्त विरार : महापौर, उपमहापौर निवडणूक उशिरा होऊनही मुंबई