संसारी असावे सावध

जीवन संगीत,सद्गुरू वामनराव पै


सर्ग, नियम व आपले कर्म यांचा आपल्या जीवनातील घडामोडींशी, आपण भोगणाऱ्या सुख दुःखांशी थेट संबंध आहे. माणूस कर्म करतो व ते तीन प्रकारे करतो. विचार करतो म्हणजे चिंतन करतो. उच्चार करतो म्हणजे बोलतो व प्रत्यक्षात कार्य करतो म्हणजे कृती करतो. हे तीनही प्रकारचे कर्म महत्त्वाचे आहेत. काही लोक म्हणतात, उक्तीची कृती होते. हे जीवनविद्येला मान्य नाही. जीवनविद्या सांगते, उक्ती प्रथम मग कृती. उक्तीच्या आधी वृत्ती म्हणजे विचार. म्हणजेच वृत्ती, उक्ती आणि मग कृती असा योग्य क्रम आहे. आपण जे बोलतो त्याला किती महत्त्वाचे स्थान आहे. सासू-सुनांची भांडणे का होतात ? बोलण्यावरून. पितापुत्रांची भांडणे का होतात? बोलण्यावरून. भावाभावांची, मित्रामित्रांची भांडणे होतात बोलण्यावरून ! तू गाढव आहेस हे म्हटले तरी तो माणूस भांडायला येतो. म्हणून शब्द महत्वाचे आहेत, हे तुम्ही कधीही विसरू नका. म्हणून वृत्तीतून उक्ती आणि त्यातूनच पुढे कृती ! यासाठी विचार करताना सावध, चिंतन करताना सावध ! संसारी असावे सावध! विचार करताना सावध, चिंतन करताना सावध, बोलताना सावध. बाण एकदा सोडला की परत घेता येत नाही तसे एकदा बोलले गेले की ते परत घेता येत नाही, म्हणून बोलताना, विचार करताना सावध राहा. वृत्ती, उक्ती आणि कृती ह्या तीनही ठिकाणी सावध असले पाहिजे. म्हणून सावध तो सुखी. आपण बेसावध असतो, तेव्हा चूक होते व चूक झाली की त्यातून संकटे निर्माण होतात. दुःख निर्माण होते. त्यासाठी चूक होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. नियती आपणच निर्माण करतो. कशातून ? विचारातून. कशी? निसर्गनियमांना गती देऊन. ही नियती दोन प्रकारची असते. चांगल्या कर्मातून शुभ नियती व अनिष्ट कर्मातून अशुभ नियती निर्माण होते. शुभ नियती सुख देते व अशुभ नियती दुःख देते हे गणित किती सोपे आहे. म्हणून सतत शुभ नियती निर्माण करण्यासाठीच सावध असले पाहिजे. शुभ नियती निर्माण करण्यासाठी कुठेही जायला नको. विचार, उच्चार व आचार ह्याठिकाणी सावध राहिलो आणि बोलताना शुभच बोलणार. विचार करताना शुभच असतील एवढी काळजी घेतली की काळजी करण्याचे कारण नाही. Take care of pens and pounds will take care of themselves. तसे मी म्हणतो तुम्ही सत्कर्माची काळजी घ्या,नियतीची काळजी करण्याचे कारण नाही. फक्त सत्कर्म करीत राहायचे. विचार, उच्चार व आचार यांच्याद्वारे फक्त सत्कर्म करीत राहायचे. ह्या सत्कर्मातून शुभ नियती निर्माण होते ही गोष्ट ध्यानांत आली की आपण जीवनांत कसे वागावे हे कळेल ! ही नियती प्रत्यक्षात कशी निर्माण होते. गंमत अशी, की आपण विचार, उच्चार, आचार यांच्याद्वारे जेव्हा एखादी कृती करतो

Comments
Add Comment

नरदेहाचे महत्त्व

परमेश्वराने सारासारविवेकसंपन्न, सर्वोत्कृष्ट, दुर्लभ असा जो नरदेह दिला त्यात, प्रत्येक मानवाने स्वस्वरूपाचे

शंभरी ऋतुराजाची

ऋतुराज,ऋतुजा केळकर मी एक ‘साधी स्त्री’ जीवनाच्या आकडेमोडीत हरवलेली. संसार, लग्न, मुलं या साऱ्या घटना जशा एका

माणूस आणि मन

मर्थ रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक हे खूप प्रसिद्ध आहेत. मनाचे श्लोक माहीत नाहीत असा माणूस निराळाच. त्यांच्या

महर्षी याज्ञवल्क्य

कदा जनकराजाने आपल्या दरबारात शास्त्रचर्चेसाठी विद्वानांची सभा आयोजित केली होती. त्यावेळी त्याने घोषणा केली की

सुप्रभात

बोलिले जे ऋषी । साच भावे वर्ताया ॥ झाडू संतांचे मारग। आडराने भरले जग ॥ उच्छेदाचा भाग । शेष ठरला तो सेवू ।| अर्थ

संत नामदेव

देव दाखवी ऐसा नाही गुरु देव दाखवी ऐसा नाही गुरु। जेथे जाय तेथे दगड शेंदरू॥ देव दगडाचा बोलेल