दादांना बारामतीत आज अखेरचा निरोप

कर्मभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार


मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरुवारी (दि. २९ जानेवारी) त्यांच्या कर्मभूमीत अर्थात बारामती येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या दु:खद प्रसंगी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा बारामतीत उपस्थित राहणार आहेत.


२९ जानेवारी रोजी अजित पवार यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा निघणार आहे. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर आणले जाणार आहे. अंत्यसंस्कारावेळी त्यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ देऊन मानवंदना दिली जाणार आहे. पवार कुंटुंबानी त्यांच्या कार्यकर्त्यांना अजित पवार यांच्या अंत्यदर्शनासाठी विद्या प्रतिष्ठान मैदानावर उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.


अजित पवार यांचे भाऊ राजेंद्र पवार यांनी अजित दादांच्या पार्थिवावर गुरुवारी अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती दिली आहे. अजित पवार यांचे पार्थिव विद्या प्रतिष्ठानला ठेवणार आहेत. सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. रात्री उशिरापर्यंत नागरिकांना पार्थिवाचे दर्शन घेता येणार आहे. गुरुवारी सकाळी गदिमा सभागृहापासून अंत्ययात्रेला सुरुवात होणार आहे. यावेळी पार्थिव गदिमा चौक, विद्यानगरी चौक पुढे विद्याप्रतिष्ठानचा आतील रस्त्याने मैदानावर नेण्यात येणार आहे.


महाराष्ट्रात अजित पवार यांची ओळख ‘लाडके दादा’ म्हणून होती. लाडक्या दादांना निरोप देण्यासाठी महाराष्ट्रातून लाखो जनता बारामतीत उपस्थित राहण्याची शक्यता आहे.


अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती मिळताच काही जण बारामतीच्या दिशेने रवाना झाले आहे. बारामती शहरात शोकाकूल वातावरण तयार झाले असून, असंख्य कार्यकर्त्यांच्या डोळ्यांतून अश्रूंचा बांध फुटला आहे.

Comments
Add Comment

धावपट्टीचे आधुनिकीकरण होण्यापूर्वीच काळाची दादांवर झडप

विमानतळावर आधुनिक यंत्रणा बसवण्याचे चार महिन्यांपूर्वीच निर्देश पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या

मेट्रो-११ मार्गिकेसाठी होणार सल्लागाराची नियुक्ती, निविदा प्रक्रियेत तीन कंपन्यांचा प्रतिसाद

मुंबई : वडाळा ते गेट वे ऑफ इंडिया अशा मेट्रो ११ मार्गिकेसाठी अंतरिम प्रकल्प सल्लागाराची नियुक्ती करण्यासाठी

गोरेगाव मुलुंड जोड रस्त्याचा खर्च वाढला

संजय गांधी उद्यानातील दुहेरी बोगद्याच्या पर्यायी कामांसाठी वाढला एक हजार कोटींचा खर्च मुंबई : गोरेगाव मुलुंड

मुंबई महापौर,उपमहापौर पदाची निवडणूक फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात ?

मुंबई  : मुंबई महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात

कमी दृश्यमानता ठरली अपघाताचे कारण ?

पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांचे आज म्हणजेच बुधवार २८

Ajit Pawar Passed Away : कमी दृश्यमानतेमुळे अजित पवारांच्या विमानाचा अपघात; नागरी उड्डाण मंत्र्यांचे स्पष्टीकरण

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त केली जात असतानाच, या भीषण