सोन्याचांदीचा तर 'कहर' सोने प्रति ग्रॅम ११७७ रूपयांनी उसळत चांदी तर ४ लाख पार 'हे' आहेत आजचे नवे दर

मोहित सोमण: आज जागतिक अस्थिरतेच्या तोंडावर युएस अर्थकारणातील अनिश्चितता व आगामी युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरातील अपेक्षित निर्णयाची प्रतिक्षा, कमकुवत डॉलर व युएस व इराण यांच्यातील वाढलेला तणाव यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात सोने चांदी उसळले असून आणखी एक नवा विक्रम या दोन्ही कमोडिटीने केला आहे. आज तर सोन्याने १७००० रूपयांचा टप्पा पार केला असून चांदीनेही ४००००० लाखांची पातळी पार केली. गुड रिटर्न्स संकेतस्थळावरील माहितीनुसार २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात थेट ११७७, २२ कॅरेट प्रति ग्रॅम दरात १०८०, १८ कॅरेट प्रति ग्रॅम दरात ८८३ रूपयांची वाढ झाल्याने प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी १७८८५, २२ कॅरेटसाठी १६३९५, १८ कॅरेटसाठी १३४१४ रूपयांवर पोहोचले आहेत. तर संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा दरात ११७७०, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा दरात १०८००, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा दरात ८८३० रूपयांनी वाढ झाली. त्यामुळे आता प्रति तोळा दर आज २४ कॅरेटसाठी १७८८५०, २२ कॅरेटसाठी १६३९५०, १८ कॅरेटसाठी १३४१४० रूपयांवर पोहोचले आहेत.


मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील सोन्याचे प्रति ग्रॅम सरासरी दर आज २४ कॅरेटसाठी १७८८५, २२ कॅरेटसाठी १६३९५, १८ कॅरेटसाठी १३४१४ रुपयांवर पोहोचले आहेत. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये (Multi Commodity Exchange MCX) सोन्याच्या निर्देशांकात दुपारपर्यंत ५.७८% वाढ झाल्याने दरपातळी १७५४९९ रूपयांवर पोहोचली. जागतिक स्तरावर सोन्याच्या गोल्ड फ्युचर निर्देशांकात दुपारपर्यंत थेट ३.९७% वाढ कायम राहिल्याने त्याचा फटका भारतीय बाजारातही होताना दिसत आहे.
आज एकूणच युएस गोल्ड स्पॉट सोन्याच्या दरात २.१% वाढ होऊन तो प्रति औंस ५५११.७९ प्रति डॉलर या विक्रमी स्तरावर पोहोचला असून दिवसाच्या सुरुवातीला त्याने ५५९१.६१ प्रति डॉलर या विक्रमी पातळीला स्पर्श केला. सोन्याचा भाव सोमवारी प्रथमच ५००० डॉलरचा टप्पा ओलांडून पुढे गेला होता. जागतिक अहवालानुसार सोन्याच्या दरात फक्त आठवड्यात आतापर्यंत त्यात १०% पेक्षा जास्त वाढ झाली आहे.२०२५ मध्ये ६४% वाढ झाल्यानंतर, या वर्षी सोन्याच्या दरात २७% पेक्षा जास्त वाढ झाली आहे.


चांदीचा दर ४ लाख पार !


चांदीच्या दरानेही आज विक्रमी स्तर ओलांडला आहे. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, चांदीच्या प्रति ग्रॅम दरात ३० रूपये, प्रति किलो दरात तब्बल ३०००० रुपयांनी वाढ झाली. त्यामुळे चांदीचे दर प्रति ग्रॅमसाठी ४१०, प्रति किलोसाठी ४१०००० रूपयांवर पोहोचले आहेत. मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील चांदीचे प्रति १० ग्रॅम सरासरी दर ४१००, प्रति किलो दर ४१०००० रूपयांवर पोहोचले आहेत. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये चांदीच्या निर्देशांकात दुपारपर्यंत थेट ५.५८% वाढ झाल्याने दरपातळी ४०६८७७ रूपयांवर पोहोचली आहे. आज स्पॉट चांदीच्या दरात १.३% वाढ होऊन तो ११८.०६१ डॉलर प्रति औंसवर पोहोचला, यापूर्वी चांदीच्या दरानेही $११९.३४ या विक्रमी उच्चांकाला स्पर्श केला होता. सोन्याला स्वस्त पर्याय शोधणाऱ्या गुंतवणूकदारांकडून असलेली मागणी, तसेच वाढलेल्या मागणीच्या तुलनेत घसरलेला पुरवठा, तसेच प्रमाणाबाहेर वाढलेली वैयक्तिक व औद्योगिक मागणी या कारणांमुळे चांदीच्या दराला सातत्याने आधार मिळत आहे. याचा परिणाम म्हणून आजही चांदीच्या दरात दिवसभरात तुफान वाढ झाली आहे. आतापर्यंत चांदीच्या दरात या वर्षी आतापर्यंत ६०% पेक्षा जास्त वाढ झाली असून मौल्यवान धातूंच्या किमतींमधील ही वाढ सुरक्षित गुंतवणुकीची वाढलेली जोरदार मागणी, मध्यवर्ती बँकांची मजबूत खरेदी आणि कमकुवत डॉलर यामुळे झाली आहे.

Comments
Add Comment

मराठी शाळांबाबतच्या धोरणाविषयी काय म्हणाली मुंबई महापालिका ?

मराठी शाळांबाबत चुकीची माहिती; महापालिका प्रशासनाने मराठी अभ्यास केंद्राच्या शिष्टमंडळासमोर मांडली

RSS च्या शताब्दीनिमित्त ‘शतक : संघाचे १०० वर्ष’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) स्थापनेच्या शंभर वर्षांच्या निमित्ताने तयार करण्यात आलेल्या ‘शतक : संघाचे १००

काय सांगता ? सोन्याचांदीच्या दरात झाली घसरण ?

मुंबई : मागील काही दिवसांपासून सोन्याचांदीच्या दरात वाढ होत आहे. पण आज म्हणजेच शुक्रवार ३० जानेवारी २०२६ रोजी

शीव उड्डाणपूल येत्या पावसाळ्यात होणार वाहतुकीसाठी खुला

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : शीव (सायन) उड्डाणपुलाच्या कामांना अपेक्षित गती प्राप्त होत आहे. पादचा-यांना पूर्व -

रेल्वे मार्गावर धुराचे लोट येताच उडाला गोंधळ, पसरले भीतीचे वातावरण; नेमका कसला होता 'तो' धूर जाणून घ्या

ठाणे : शुक्रवारी संध्याकाळी गर्दीच्या वेळी पसरलेल्या धुरामुळे नागरिकांची घाबरगुंडी उडाली होती. मध्य रेल्वेवर

तब्बल ४६ वर्षांनंतर भांडुप संकुला २००० दलशक्ष लिटर क्षमतेचा जलशुध्दीकरण प्रकल्प येत्या एप्रिल २०२९ पर्यंत होणार प्रकल्प पूर्ण

मुंबई :  भांडुप संकुल येथे मुंबई महानगरपालिकेमार्फत २,००० दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेचा अत्याधुनिक जलशुद्धीकरण