Ajit Pawar : अजित पवारांच्या विमान अपघातानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांचे केंद्र सरकारला पत्र; हवाई वाहतूक मंत्र्यांनी घेतली गंभीर दखल

कालबद्धरितीने चौकशी पूर्ण करणार


मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राकडे तातडीने हस्तक्षेपाची मागणी केली असून, या दुर्घटनेच्या कारणांची सखोल व पारदर्शी चौकशी केली जाईल, असे केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.


बुधवारी अजित पवार मुंबईहून बारामतीकडे जात असताना त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. विमान धावपट्टीवर उतरत असतानाच नियंत्रण सुटले आणि ते थेट जमिनीवर आदळले. या दुर्घटनेनंतर मोठा स्फोट होऊन विमानाला आग लागली. या अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली असून, गुरुवारी बारामतीत शोकाकूल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अनेक गावांमध्ये बंद पाळून नागरिकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.



या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेच्या कारणांची चौकशी व्हावी आणि भविष्यात अशा घटना टळाव्यात, यासाठी तातडीची पावले उचलावीत, अशी मागणी करत केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री नायडू यांना पत्र पाठवले होते. अजित पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यासह इतर चार जणांचा मृत्यू हा अत्यंत गंभीर प्रकार असून, अपघात नेमका कशामुळे झाला याचा सखोल तपास होणे आवश्यक असल्याचे फडणवीस यांनी पत्रात नमूद केले होते.


दरम्यान, या पत्राला उत्तर देताना केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री नायडू यांनी विमान अपघात तपास ब्युरो (एएआयबी) कडून तपास सुरू करण्यात आल्याची माहिती दिली आहे. अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स ताब्यात घेण्यात आला असून, नियमांनुसार सर्वंकष तपास केला जात आहे. तांत्रिक नोंदी, ऑपरेशनल तपशील आणि घटनास्थळावरील सर्व तथ्यांची पडताळणी करण्यात येत असून, ही चौकशी पारदर्शी आणि कालबद्ध पद्धतीने पूर्ण केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.


भविष्यात अशा दुर्घटना होऊ नयेत, या दृष्टीने राज्य सरकारच्या सूचनेची मंत्रालयाने गंभीर दखल घेतली असून, चौकशी अहवाल प्राप्त होताच आवश्यक उपाययोजना केल्या जातील. या प्रक्रियेत महाराष्ट्र सरकारचे सहकार्य महत्त्वाचे असून, स्थानिक प्रशासनाची मदतही अपेक्षित असल्याचे नायडू यांनी नमूद केले. संपूर्ण चौकशी अहवाल राज्य सरकारलाही सादर करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

विद्याविहार रेल्वे पूल येत्या ३१ मे २०२६ पर्यंत होणार पूर्ण, पूर्व दिशेकडील कामे २८ फेब्रुवारी पर्यंत पूर्ण होणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : पूर्व उपनगरातील पूर्व व पश्चिम यांना जोडणारा विद्याविहार रेल्वे स्थानकावरील

सोशल मीडिया वापरासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना निर्बंध, फेसबुक-एक्सवर पोस्ट कर्मचाऱ्यांना महागात पडणार

मुंबई : राज्य शासनाचे कर्मचारी आपल्या वैयक्तिक सोशल मीडिया अकाऊंटवर गणवेशातील फोटो, कार्यालयाचे लोगो, पदनाम,

कोकणातील कोळीवाड्यांच्या जमिनी अधिकृत होणार!

सीमांकनासाठी समिती गठीत; तीन महिन्यांच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश मुंबई : कोकण किनारपट्टीवरील

दादरमधील वाढत्या फेरीवाल्यांच्या समस्येवर महापालिकेचा तोडगा

मुंबई : दादर पश्चिममधील वाढत्या फेरीवाल्यांच्या समस्येबाबत वारंवार तक्रारी होत असतानाच आता मुंबई महापालिकेने

वांद्रे पूर्व स्कायवॉकची देखभाल, सुरक्षेत महापालिकेची कसोटी

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने वांद्रे पूर्व रेल्वे स्थानकाशेजारी नव्याने आकाशमार्गिका अर्थात स्कायवॉकचे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मंत्रालयात अधिकाऱ्यांनी वाहिली श्रद्धांजली

मुंबई : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल मंत्रालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या