Shashi Tharoor : 'आमच्यात सर्वकाही अलबेल',राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांना भेटल्यानंतर शशी थरूर यांचं विधान

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी आज, गुरुवारी (२९ जानेवारी) पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेऊन त्यांच्या तक्रारींचे निवारण केले. तसेच केरळ विधानसभा निवडणुकीपूर्वी आमच्यात सर्वकाही अलबेल असल्याचेही त्यांनी सांगितले.


आम्ही एकत्र वाटचाल करत आहोत : 


संसद भवन संकुलातील खरगे यांच्या दालनात झालेली ही बैठक तब्बल १ तास ४५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ चालली. या भेटीविषयी बोलताना शशी थरूर म्हणाले की; " राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे  यांच्यासोबत माझी चर्चा झाली. आमची चर्चा खूप चांगली, रचनात्मक, आणि सकारात्मक झाली, पुढे बोलताना त्यांनी सांगितले की; आमच्यात सर्व काही अलबेल आहे आणि आम्ही एकत्र वाटचाल करत आहोत. मी आणखी काय सांगू."







यावेळी पत्रकारांनी केरळ निवडणुकीसाठी मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावर चर्चा झाली का, असे विचारले असता थरूर म्हणाले, "तो मुद्दा कधीच नव्हता. मला कोणत्याही गोष्टीचा उमेदवार होण्यात रस नाही. सध्या मी खासदार आहे, तिरुवनंतपुरममधील माझ्या मतदारांचा माझ्यावर विश्वास आहे. संसदेत त्यांचे हित जपण्याचे काम मला करावे लागेल, तेच माझे काम आहे."







केरळमधील पक्ष नेत्यांनी थरूर यांना बाजूला केल्याच्या कथित घटनेमुळे थरूर नाराज होते अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या.  तसेच भारत-पाकिस्तान संबंध आणि राजनैतिक संपर्काबद्दलच्या त्यांच्या टिप्पण्यांवरून आणि यापूर्वी झालेल्या मतभेदांमुळेही तणाव निर्माण झाला होता.

Comments
Add Comment

Supreme Court On UGC: सर्वोच्च न्यायालयाकडून यूजीसीच्या नवीन नियमांना स्थगिती

सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्रीय विद्यापीठ आयोगाच्या  म्हणजेच यूजीसीच्या नवीन नियमांना स्थगिती देण्यात आली

भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नाबाबत 'महाराष्ट्र पॅटर्न'चे सर्वोच्च न्यायालयाने केले कौतुक

अन्य राज्यांच्या उपाययोजनांवर ओढले ताशेरे नवी दिल्ली :देशातील भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या आणि नागरिकांना

भारतीय उद्योगांसाठी युरोपीयन बाजारपेठ

९० टक्के वस्तूंवर शुल्क माफ करारामुळे दोन्ही देशांच्या आर्थिक संबंधांना बळ नवी दिल्ली : भारत आणि युरोपीयन

भारताला नुकसान पोहोचवणे, हाच पाकिस्तानचा अजेंडा

नवी दिल्ली : भारताने संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढवला आहे. ‘पाकिस्तानने नेहमीच विनाकारण

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात

१ फेब्रुवारीला सादर होणार अर्थसंकल्प गुरुवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आर्थिक सर्वेक्षण सादर

‘मदर ऑफ ऑल डील’वर स्वाक्षरी

भारत व युरोपियन युनियनमध्ये मुक्त व्यापार कराराची अधिकृत घोषणा नवी दिल्ली : भारत आणि युरोपियन युनियनमध्ये